इराक देशात मोठी अस्थितरता निर्माण झाली आहे. येथ शिया मुस्लिमांचे धर्मगुरू तथा नेते अल सद्र यांचाया समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. या लोकांनी येथील संसदेवर मोर्चा काढला. विशेष म्हणजे या मोर्चामधील जमावाने चक्क संसद ताब्यात घेतल्याचे पाहायले मिळाले. श्रीलंका देशात ज्या प्रमाणे आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ताब्यात घेतले होते. अगदी तशाच पद्धतीने इराकमध्येही नागरिकांनी संसद ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले. इराकमधील याच संघर्षाबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा >>> विश्लेषण : गुगल स्ट्रीट व्ह्यू फिचर काय आहे? भारतात हे लॉन्च का केलं जातंय? 

इराकमध्ये लोक रस्त्यावर का उतरले आहेत?

मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर उतरलेले लोक मुक्तादा अल सद्र या इराकमधील नेत्याचे समर्थक आहेत. बुधवारी (२७ जुलै) रोजी सद्र यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तथा माजी पंतप्रधान नुरी अल-मलिकी यांनी युतीने उमेदवार म्हणून इराणचे समर्तक तथा इराकचे माजी कामगार आणि सामाजिक व्यवहार मंत्री मोहम्मद अल-सुदानी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. याच घोषणेच्या विरोधात अल सद्र यांचे समर्थक रस्त्यावर उतरले असून त्यांनी संसद ताब्यात घेतली. अल सद्र यांना विचारात घेतल्याशिवाय इराकमध्ये सरकारची स्थापना केली जाऊ शकत नाही, असा संदेश या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मुंबईतले खड्डे भरण्यासाठी चार नवीन पद्धती परिणामकारक ठरतील?

ऑक्टोबरमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत अल सद्र यांच्या युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र इराकमध्ये पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असणारे दोन तृतीयांश बहुमत सद्र मिळवू शकले नाहीत. पुढे वाटाघाटी शक्य न झाल्यामुळे त्यांनी सरकार स्थापनेच्या चर्चेतून माघार घेतली.

हेही वाचा >>> विश्लेषण : धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरेंना, जाणून घ्या शिवसेनेतील संघर्ष आणि निवडणूक आयोगाची भूमिका

याच कारणामुळे मागील दहा महिन्यांपूर्वी इराकमध्ये राष्ट्रीय निवडणुका घेण्यात आल्या होत्या. निवडणुका घेऊनदेखील इराकमध्ये अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. २००३ साली अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर सर्वात जास्त काळ हा देश कोणत्याही सरकारवीना चालवला जातोय.

हेही वाचा >>> विश्लेषण: चीनच्या वुहानमधूनच करोनाची उत्पत्ती? नव्याने समोर आलेला अभ्यास काय सांगतोय?

दरम्यान, आता अल-मलिकी यांनी मोहम्मद अल-सुदानी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. सनदशीर मार्गाने ही घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र या घोषणेनंतर सद्र यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्णाम झाला. हेच समर्थक सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत.

Story img Loader