मंगल हनवते
वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अशात येथील लोकसंख्या वाढत असून भविष्यात पाणी टंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याची आणि भविष्यातील या दोन्ही पालिका क्षेत्रातील २७ गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प प्रस्तावित होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हा प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील वसई-विरार अशा पहिल्या टप्प्यातील ८३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून वसई-विरारला सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरू होणार आहे. मीरा-भाईंदर या दुसऱ्या टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून हा टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यास मीरा-भाईंदरला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या दोन पालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविणारा सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्प नेमका आहे तरी काय, याचा हा आढावा…

पाणी पुरवठ्याची समस्या काय?

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अशात येथील लोकसंख्या वाढत असून भविष्यात पाणी टंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्याची आणि भविष्यातील या दोन्ही पालिका क्षेत्रातील २७ गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प प्रस्तावित होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हा प्रकल्प राबविण्यात येत असून आतापर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील वसई-विरार अशा पहिल्या टप्प्यातील ८३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून वसई-विरारला सूर्या प्रकल्पातून पाणी पुरवठा सुरू होणार आहे. मीरा-भाईंदर या दुसऱ्या टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून हा टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यास मीरा-भाईंदरला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या दोन पालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविणारा सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्प नेमका आहे तरी काय, याचा हा आढावा…

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Action plan for water transport in Mumbai news
मुंबईतील जलवाहतुकीसाठी कृती आराखडा
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?

मुंबई महानगर प्रदेशातील वसई-विरार आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी येथील पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पालिका क्षेत्रात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने येथे पाणी टंचाई जाणवते. वसई विरार शहराला सध्या एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतो. मात्र शहराची गरज ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची आहे. असे असताना केवळ २२० दशलक्ष लिटर पाणी मिळते. कारण पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे १५ टक्क्यांहून अधिक आहे.

त्यामुळे नागरिकांना केवळ १९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. दररोज ४३ दशलक्ष लिटर पाणी कमी असल्याने नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दुसरीकडे मीरा- भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. यात स्टेम प्राधिकरणकडून ८६ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो आणि एमआयडीसीकडून १३५ दश लक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठाही अपुरा आहे.

सूर्या प्रकल्प काय आहे ?

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला १९ ऑक्टोबर २०१६ मध्ये तसेच १९७७.२९ कोटी रुपयांच्या खर्चास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या आराखड्यानुसार सूर्या धरणाजवळील कवडास बंधाऱ्यातून उचलण्यात आलेले पाणी सूर्यानगर येथील प्रस्तावित जलप्रक्रिया केंद्रात शुद्ध करण्यात येईल. शुद्ध केलेले पाणी राज्य महामार्ग, जिल्हा परिषद रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ च्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीद्वारे वसई-विरार पालिकेकरिता काशिदकोपर येथील जलाशय तसेच मिरा-भाईदर पालिकेकरिता घोडबंदर-चेने येथील जलाशयापर्यत पाठविण्यात येईल. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वसई-विरार आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील २७ गावांना या प्रकल्पाद्वारे प्रतिदिन ४०३ दशलक्ष लिटर क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. वसई-विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर तर मीरा-भाईंदरला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर अशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

प्रकल्प कधी पूर्ण होणार ?

प्रकल्पास मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. निविदा प्रक्रिया अंतिम करून मेसर्स एल ॲन्ड टी. लि. या कंपनीला ४ ऑगस्ट २०१७ कार्यादेश दिले. या कार्यादेशानुसार कामाला सुरुवात झाली. निविदेप्रमाणे ३४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार होता. त्यानुसार २०२० मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आता जुलै २०२२ उजाडले तरी हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. तर हा प्रकल्प १०० टक्के पूर्ण करण्यास जून २०२३ उजाडणार आहे. मुळात प्रकल्प काम संथगतीने पुढे सरकत असल्याने २०२०मध्ये प्रकल्प पूर्ण करता आला नाही. त्यात मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट आले आणि त्याचा कामावर परिणाम झाला. काही महिने काम बंद असल्यामुळे प्रकल्प रखडल्याचे सांगून एमएमआरडीएने आता प्रकल्प पूर्णत्वासाठी जून २०२३ ची तारीख जाहीर केली आहे.

आतापर्यंत किती काम पूर्ण?

पाच वर्षाच्या काळात प्रकल्पाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. वसई-विरार या पहिल्या टप्प्याचे ८३ टक्के तर मीरा-भाईंदर या दुसऱ्या टप्प्याचे केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत कवडास येथील उद्ंचन केंद्राचे बांधकाम सुरू असून आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उदंचन केंद्राची सर्व काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सूर्या नगर येथील जलशुद्धीकरण केंद्राची सर्व कामे सुरू असून आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ही कामेही ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कवडास उद्ंचन केंद्रापासून ते काशिदकोपर जलकुंभापर्यंत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम प्रगती पथावर असून ५७ कि.मी पैकी ५६ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जलवाहिनीचे कामही ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तुंगारेश्वर बोगद्याचे काम सुरू असून ४.४ कि.मी. लांबीपैकी ०.९५ कि.मी. लांबीचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काशिदकोपर येथे बांधण्यात येणाऱ्या संतुलन टाकीचे खोदकाम सुरू असून आतापर्यंत ५२ टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. टाकीचे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चेने येथे बांधण्यात येणाऱ्या संतुलन टाकीच्या राफ्टचे काम प्रगती पथावर आहे. सद्यःस्थितीत टाकीचे २० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काशिदकोपर जंक्शन ते चेने जलकुंभापर्यंत टाकण्यात येणाऱ्या २२ कि. मी. पैकी ४.३ कि.मी. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. जलवाहिनीचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

वसई-विरार आणि मीरा-भाईंदरला कधीपासून मुबलक पाणी?

करोना काळात प्रकल्पाच्या कामाला मोठा फटका बसला. मात्र मागील वर्षभरापासून एमएमआरडीएने कामाला गती दिली आहे. त्यानुसार जून २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार काम पूर्ण होत आहे का याचा आढावा नियमितपणे महानगर आयुक्त घेतात. त्यामुळे आता कामाने वेग घेतला असून आतापर्यंत प्रकल्पाचे एकूण ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरपासून वसई-विरारला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल, तर मीरा-भाईंदर हा टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे या पालिका क्षेत्राला जुलै २०२३ पासून मुबलक पाणी पुरवठा होईल.

Story img Loader