पंकज भोसले

जगाला सुरस आणि चमत्कारिक गोष्टींची देणगी देणारा अरब भवताल सध्या एका भलत्याच गोष्टीमुळे ढवळून निघाला आहे. आधुनिक जगाला दृश्यकहाण्यांचे सुरस आणि चमत्कारिक अनुभव देणाऱ्या ‘नेटफ्लिक्स’ या नवमनोरंजनी फलाटाने गेल्या महिन्यात इथल्या मातीतील पहिला चित्रपट काढून आपले बस्तान बसविण्याचा आरंभ केला. चित्रउद्योगाच्या दृष्टीने सुमारे २२ देशांच्या टापूत ‘नेटफ्लिक्स’कडून मनोरंजनाची ‘वखार’ तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तोही २०१६ मधील इटालियन चित्रपटाच्या एकविसाव्या रूपांतराद्वारे. म्हणजे आधी समृद्ध पहिल्या जगातील राष्ट्रांपासून ते प्रगतीशील आशियाई अशा २० राष्ट्रांमध्ये या इटालियन चित्रपटाचे रूपांतर बिनदिक्कत आनंदाने पाहिले गेले. मात्र इजिप्तमधील तारांकित कलाकारांना सोबत घेऊन तयार झालेला हा चित्रपट अरब देशांतील नागरिकांनी पाहिला, तेव्हा इथली भव्य-दिव्य संस्कार, मूल्ये, कुटुंबसंस्था, नैतिकता यांच्याविरोधात ‘नेटफ्लिक्स’ काम करीत असल्याचा ओरडा व्हायला सुरुवात झाली. इतकेच नाही, तर एका लोकप्रतिनिधीने नेटफ्लिक्सला देशातून हद्दपार करण्याचाही विडा उचलला. स्वाक्षऱ्यांच्या राष्ट्रव्यापी मोहिमा आणि वृत्तमाध्यमांवरून चर्चांच्या फैरी फक्त या एकट्या चित्रपटाने केल्या. पूर्णवस्त्रांकित कलाकारांचे आक्षेपार्हशून्य दृश्य असतानाही हे कसे झाले, याची कहाणी वृत्तवर्तुळासाठी सुरस आणि तितकीच चमत्कारिक बनली.

Sharad Pawar Reaction on saif ali khan
Sharad Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; गृहमंत्र्यांकडे बोट दाखवत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Muramba
Video: एकीकडे माही रमाचे रूप घेणार, तर दुसरीकडे रमा जिवंत…; ‘मुरांबा’ मालिकेत नवीन वळण
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Same Sex marriage
Same Sex Marriage : “समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नाहीच”, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली; नेमकं कारण काय?

नेमके काय झाले?

२० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सचा पहिला अरब मातीतील चित्रपट प्रदर्शित झाला. ‘परफेक्ट स्ट्रेन्जर’ या विनोदी चित्रपटाच्या कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटात सात व्यक्तींची कथा आहे. प्रीतीभोजनाच्या कार्यक्रमात फक्त संवादाद्वारे चालणाऱ्या या कथानकात एका शाळकरी मुलीकडे गर्भनिरोधक साधने सापडतात. एक तरुण आपण समलिंगी (गे) असल्याची कबुली देतो आणि एक दाम्पत्य त्यातल्या आधुनिक विचारांच्या पत्नीमुळे ठळक होते. केवळ या दोन-तीन घटकांमुळे हा चित्रपट अरबी मूल्यांचा ऱ्हास करणारा, समलिंगी संबंधांना आणि अनैतिकतेला प्रोत्साहन देणारा असल्याची ओरड झाली.

इटालियन विचारांचे पडसाद…

मूळ इटालियन चित्रपटात चंद्रग्रहणाच्या रात्री एकत्र जमलेले भोजनभाऊ आणि भगिनी एकमेकांच्या मोबाइलमधील तपशील पाहण्याचा विचित्र खेळ खेळतात. मोबाइलमध्ये आपापले खासगी विश्व जपणाऱ्या नवरा-बायकोमध्ये देखील हा तपशील पाहून काडीमोड होऊ शकेल, या दाव्यातून या खेळाला सुरुवात होते आणि विनोदाची खाण प्रेक्षकासमोर उलगडत जाते. या चित्रपटाची २०१९मध्ये गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, ती फक्त सर्वाधिक रूपांतरे होण्यासाठी. तोपावेतो १८ देशांनी या इटलीतील सुरस कथेला आपल्या देशी भाषेत पाहिले होते.

चित्रउद्योगात अरब कुठे?

इजिप्त, लेबनॉन, इराक, सिरिया, कुवेत, अल्जीरिया, मोरोक्को आणि ट्युनिशिया आदी राष्ट्रांमधील चित्रपट हा अरबी सिनेमा म्हणून ओळखला जातो. यातील काही राष्ट्रे कट्टर धार्मिकता बाळगून आहेत, तर काही पाश्चात्य आधुनिक विचार आपल्या राष्ट्रांत नको म्हणून प्रयत्नशील आहेत. १९२८ साली अरब राष्ट्रांत पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनविला गेला. या राष्ट्रांतील राजकीय स्थित्यंतरे आणि क्रांत्या यांमध्ये त्यांचा चित्रउद्योग निर्यातक्षम कधीच राहिला नाही. स्थानिक पातळीवर धर्म, राजकीय विचारांचा प्रचार हाच चित्रनिर्मितीचा उद्देश राहिला.

आक्षेप आणि पाठिंबाही…

परदेशातील चित्रपटांत असले विचार ठीक दिसतात, आपल्या देशात अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे या विचारांचे तरुण-तरुणी निपजले, तर अरबी कुटुंबसंस्थाच नष्ट होईल, असे विरोधक म्हणत आहेत. नेटफ्लिक्स आपली कुटुंबव्यवस्था मोडत असल्याचे सांगून या संस्थेवर तात्काळ बंदी घालावी यासाठी एका लोकप्रतिनिधीने चक्क स्वाक्षरी मोहीम राबविली. तर तुम्हाला विचार पटत नसल्यास नेटफ्लिक्सचे सदस्यत्व टाळा, पण अशा प्रकारे नेटफ्लिक्सवर बंदी आणून जागतिक मनोरंजनाचा नळ बंद करू नका, अशी भूमिका या राष्ट्रांतील तरुणाई घेत आहे.

संवेदनशील…

समलैंगिक संबंध हे काही अरब राष्ट्रांमध्ये निषिद्ध मानले जातात. पकडले गेल्यास तुरुंगवास अथवा मृत्युदंडाची तरतुदही काही राष्ट्रांनी करून ठेवली आहे. गेल्या दशकात एका अरबी चित्रपटात समलैंगिक व्यक्तिरेखा दाखविण्यात आली आहे. मात्र कथानकात या व्यक्तिरेखेचा ईश्वरीमर्जीने मृत्यू होताना दाखविला आहे. १९५० ते ६० च्या दशकात काही अरबी चित्रपटांत आधुनिक विचारांच्या स्त्रिया रंगविण्यात आल्या होत्या. आखुड विजारांतील या नायिका १९८० नंतरच्या धर्मवादी विचारसरणीमुळे चित्रपटांतून हद्दपार झाल्या. संपूर्ण वस्त्रे हाच खरा स्त्रियांचा दागिना आणि सौंदर्य मानले जाऊ लागले.

थोडे इतिहासातून…

रिचर्ड बर्टन या एका और डोक्याच्या ब्रिटिशाने ‘अरेबियन नाईट्स’या ग्रंथाचा जगाला परिचय करून दिला ते सर्वज्ञात आहे. पण त्याने रात्रीसंबंधित आणखी एका महान अरब ग्रंथाचा अनुवाद केला होता, त्याची फारशी चर्चा होत नाही. शेख नेफ्झुई या लेखकाचा चौदाव्या-पंधराव्या शतकात लिहिला गेलेला ‘परफ्युम गार्डन’ हा तो ग्रंथ. ज्यात अरबांचे सखोल कामशास्त्र रंगवून सांगण्यात आले आहे. संभोगसुखाची साधना कशी करावी, याची महती सांगणारी या ग्रंथातील चौदाव्या-पंधराव्या शतकातील अरबी राष्ट्रे किती पुढारलेली होती, हे नेटफ्लिक्सने गेल्या महिन्यात काढलेल्या तिथल्या सिनेमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Story img Loader