प्रसिद्ध पॉप गायिका शकीरा ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. शकीरावर कर चोरीचा आरोप करण्यात आल्याने ती चर्चेत आली आहे. तिच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे तिला आठ वर्षांची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते, असे बोललं जात आहे. स्पेनच्या एका सरकारी वकिलाने तिच्यावर कर चोरीचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिला ८ वर्षांची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणही त्यांनी केली आहे. त्यासोबत तिने २३ मिलियन युरो म्हणजे जवळपास २.४ कोटी रुपये दंड भरावा, अशी मागणीही केली आहे.

एकीकडे स्पेनचे सरकारी वकील अशी मागणी करत असताना दुसरीकडे तिने मात्र ही याचिका फेटाळून लावली आहे. शकीराच्या मते ती निर्दोष आहे. मी काहीच गुन्हा केलेला नाही याबाबत मी ठाम होती, म्हणूनच तिनं हे प्रकरण कोर्टात जाऊ दिलं नव्हतं. शकीराला विश्वास आहे की ती गुन्हेगार नाही हे ती कोर्टात सिद्ध करेल, असे म्हणत तिनं कर चुकवल्याच्या याचिकेला फेटाळून लावलं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय? याबद्दल जाणून घेऊया.

BJP’s predecessors’ burn Babasaheb’s effigy
भाजपाच्या पूर्वसुरींनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला होता का? जयराम रमेश यांनी भाजपावर काय आरोप केले?
Ukraine spy agency Sluzhba bezpeky Ukrainy SBU
विश्लेषण : युक्रेनची गुप्तचर संघटना इस्रायलच्या ‘मोसाद’पेक्षा धोकादायक?…
Indian stock market , Sensex, NSE Nifty Index
विश्लेषण : अपेक्षेप्रमाणे अमेरिकेत व्याजदरात कपात, तरी शेअर बाजार, रुपया पडण्याचे काय?
kailash mansarover yatra
भारत-चीन संघर्ष मिटणार? कैलास मानसरोवर यात्रा अन् सीमा व्यापार पुन्हा सुरू; ‘या’ सहा मुद्द्यांवर झाले एकमत
russia cancer vaccine
आता कॅन्सरवरील उपचार शक्य? रशियाचा दावा काय? नवीन लस कसे कार्य करते?
reasearcher obc fellowship delay by government
ओबीसी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपला केंद्र सरकारकडून विलंब, विद्यार्थी अडचणीत; कारण काय?
Saudi Arabia host fifa World Cup 2034
तेल निर्यातदार, वाळवंटी सौदी अरेबियाचा क्रीडा क्षेत्रातील दरारा कसा वाढला? फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद मिळण्यामागे काय कारण?
विश्लेषण : माहिती अधिकार कायदा लालफीतशाहीत अडकला आहे का? (प्रातिनिधीक छायाचित्र)
विश्लेषण : माहिती अधिकार कायदा लालफीतशाहीत अडकला आहे का?
Why did Ravichandran Ashwin suddenly retire while series against Australia was underway
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका सुरू असतानाच रविचंद्रन अश्विनने तडकाफडकी निवृत्ती का घेतली? संघ सहकाऱ्यांनाही धक्का?

नेमकं प्रकरण काय?

शकीरावर २०१२ ते २०१४ मध्ये केलेल्या कमाईचा कर न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा कर जवळपास १४.५ मिलियन युरो म्हणजे ११७ कोटी रुपये इतका आहे. हा कर चुकवल्याचा आरोप स्पेनच्या एका सरकारी वकीलानं केला आहे. यामुळे ती अडचणीत सापडली आहे.

स्पेनच्या एका सरकारी वकीलानं केलेल्या आरोपानुसार, शकीराने २०१२ ते २०१४ या काळात कमाई केलेल्या रक्कमेचा आयकर अद्याप भरलेला नाही. या काळातील आयकर आणि मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केल्याने १४.५ मिलियन युरो म्हणजेच ११७ कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. यामुळे देशाच्या आयकर विभागाची फसवणूक झाली आहे. या आरोपांतर्गत तिला आठ वर्षाची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच तिने २३ मिलियन युरो म्हणजे जवळपास २.४ कोटी रुपये दंड भरावा, अशी मागणीही केली आहे. यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे.

शकीरा २०११ मध्ये स्पेनला शिफ्ट झाली होती, त्यानंतर तिने प्रसिद्ध फुटबॉलपटू गेराड पिक याच्यासोबतचे रिलेशनशिप जगजाहीर केले होते. पण त्यानंतरही २०१५ पर्यंत तिने बहामासमध्ये टॅक्स रेसीडन्सी कायम ठेवली होती. त्यानंतर मात्र ते दोघेही विभक्त झाले.

कोण आहे शकीरा?

शकीरा ही प्रसिद्ध पॉप गायिका म्हणून ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. ही सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. हिप्स डोन्ट लाय, ब्यूटीफुल लायर यासारख्या अनेक गाण्यांसाठी तिला ओळखले जाते. लॅटिन म्युझिकची राणी अशीही तिची ओळख आहे. तिने आतापर्यंत तीन ग्रॅमी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. त्यासोबतच अनेक रेकॉर्डवरही तिच्या नावाची नोंद पाहायला मिळते. पण शकीराला २०१० च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे ‘वाका-वाका’ यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे शकीराला जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली.

शकीराचा दावा काय?

स्पेनच्या एका सरकारी वकीलाच्या आरोपानंतर शकीराच्या वकिलाने एक निवेदन जारी केलं. या निवेदनानुसार, २०१२ ते २०१४ या काळात तिने स्पेनमध्ये दीर्घकाळ वास्तव्य केलेले नाही. ती फक्त २०१५ याच वर्षी स्पेनमध्ये राहिली होती. शकीरा २०१३ ते २०१४ दरम्यान एका सिंगिंग कॉम्पिटिशन शो मध्ये व्यस्त होती. तिच्या वकीलांचे म्हणणे आहे की २०१४ पर्यंत तिनं जास्त पैसा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या दौऱ्यांमधून कमावला आहे.

२०१५ मध्ये ती स्पेनला गेली आणि तिनं आपला सगळा कर वेळेत भरला. शकीराच्या म्हणण्याप्रमाणे तिनं स्पॅनिश कर अधिकाऱ्यांना तब्बल १७.२ मिलियन युरो इतका कर दिलेला आहे. त्यामुळे माझ्यावर आता कोणतंही कर्ज शिल्लक राहिलेलं नाही, असा दावा तिने केला आहे.

शकीराला तिच्या निर्दोषतेबद्दल पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच तिने हे प्रकरण न्यायालयात जाऊ दिले. मी निर्दोष असल्याचं सिद्ध होईल, असेही तिने यात म्हटलं आहे.

शकीरा आणि जेरॉर्डचे नाते संपुष्टात

दरम्यान शकीरा ही ‘वाका-वाका’ विशेष प्रसिद्ध झाली. या गाण्यात फुटबॉलपटू जेरार्ड पिकही दिसला होता. शकीरा जेरार्डपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म १९७७ मध्ये कोलंबियामध्ये झाला होता, तर जेरार्ड पिकचा जन्म १९८७ मध्ये बार्सिलोना, स्पेनमध्ये झाला होता. शकीरा आणि जेरार्ड यांना दोन मुले आहेत. मात्र, या दोघांनी अद्याप विवाह केलेला नाही. शकीराने २०१३ मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोन वर्षांनी २०१५ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात ‘पॉवरफुल कपल’मध्ये शकीरा आणि जेरार्डचे नाव सहभागी होते. पण काही दिवसांपूर्वी प्रेमात फसवणूक झाल्याचं कळताच शकीराने जेरार्कसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader