सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना इथून पुढे सेन्सॉरची कात्री लागणार नाही, असा धाडसी निर्णय संयुक्त अरब अमिरातीने रविवारी जाहीर केला. आखाती देशांचा हा निर्णय आपल्या भागातल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसंच परदेशातल्या चित्रपटप्रेमीचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपला दृष्टीकोन व्यापक आणि उदारमतवादी करण्यासाठी घेतल्याची चर्चा आहे.IGN मिडल इस्टच्या मते, अलीकडेच, अॅडम ड्रायव्हर आणि लेडी गागा स्टारर ‘हाऊस ऑफ गुच्ची’ ला त्याच्यामधील लैंगिकतेवर आधारित सीन्समुळे असंख्य कट मिळाले आहेत, तर मार्वल स्टुडिओजच्या ‘एटरनल्स’ च्या रिलीजला अशाच कारणांमुळे विलंब झाला. परंतु यासारखे चित्रपट नवीन रेटिंग प्रणाली अंतर्गत पुन्हा प्रदर्शित केले जातील की नाही हे स्पष्ट नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलावरील अवलंबित्व कमी करून आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करून आपल्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत असल्याने सेन्सॉरिंग थांबवण्याचे पाऊल देशासाठी महत्त्वाचे आहे. अलीकडे, या देशाने काही सामाजिक किंवा “धर्मनिरपेक्षसुधारणा” देखील केल्या आहेत ज्यात दारुचे सेवन गुन्हेगारीमुक्त करणे आणि विवाहबाह्य सहवासाला परवानगी देणे समाविष्ट आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, देशाने जाहीर केले की सरकारी कार्यालयांमध्ये साडेचार कामाचे दिवस असलेला आठवडा असेल. 2022 पासून शनिवार आणि रविवार आठवड्याचे शेवटचे दिवस मानतील. हा निर्णयही पाश्चात्य पद्धतीच्या कामाच्या स्वरुपाशी साधर्म्य साधणारा आहे.

सौदी अरेबियाच्या चित्रपटविषयक धोरणात काय बदल होतील?

संस्कृती आणि युवा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या देशाच्या माध्यम नियामक कार्यालयाने ट्विटरवर जाहीर केले की ते त्यांच्या मोशन पिक्चर कंटेंट रेटिंग सिस्टममध्ये २१+ वयोगटाची श्रेणी समाविष्ट करत आहेत. या वर्गीकरणानुसार, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट हे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा विचार करून तयार केलेले असतील. याचा असा की, पूर्वीच्‍या सिस्‍टमच्‍या अंतर्गत आक्षेपार्ह वाटणारी काही दृश्‍ये संपादित केली जाणार नाहीत.

यापूर्वी देशाच्या सेन्सॉरशिप कायद्यानुसार, चुंबनदृश्य तसंच लैंगिक संबंध दाखवणाऱ्या दृश्यांना कात्री लावली जायची. तसंच गैर-हलाल पदार्थ जसं की डुकराचे मांस अशा पदार्थांची चित्रे, नावे ब्लर केली जात होती. मात्र आता या नव्या धोरणामुळे या नियमांमध्ये निश्चितच बदल होतील

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained the uaes decision to stop censoring films shown in cinemas vsk
Show comments