अभय नरहर जोशी
विविध देशांतील हजारो स्थलांतरितांचा तांडा सोमवारपासून मेक्सिकोतून अमेरिकेकडे पायी निघाला आहे. योगायोगाने याच काळात अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये एक परिषद झाली. स्थलांतरितांच्या समस्येवरही या परिषदेत चर्चा झाली. ही परिषद सुरू असतानाच हे स्थलांतर सुरू करण्यात आले. हे स्थलांतरित कोण आहेत? ते अमेरिकेत का जात आहेत? या परिषदेला त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे, या विषयी…

स्थलांतरित कोणत्या देशातील?

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Big Action on Illegal Bangladeshis Intruders in mumbai
मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगलादेशी येतात कसे? त्यांना कागदपत्रे मिळतात कशी?
karjat jamkhed latest news in marathi
कर्जत : जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Himalayan breed dog now becomes India fourth registered indigenous breed
‘हिमालयन शेफर्ड डॉग’ ठरली चौथी अस्सल भारतीय श्वान प्रजाती… याचे महत्त्व काय?
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू

दक्षिण मेक्सिकोतून विविध देशांच्या हजारो स्थलांतरित नागरिकांचा तांडा सोमवारपासून (६ जून) अमेरिकेकडे निघाला आहे. अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. अलीकडच्या काळातील अमेरिकेकडे स्थलांतरित होणारा सर्वांत मोठा तांडा आहे. सोमवारी पहाटेच दक्षिण मेक्सिकोतील ग्वाटेमाला सीमेजवळील तपचुला शहरातून सुमारे सहा हजार स्थलांतरितांनी अमेरिकेकडे पायी वाटचाल सुरू केली. यामध्ये बहुतांश व्हेनेझुएला, क्युबा व हैती देशांचे नागरिक असल्याचे समजते. गुरुवारी ‘एएफपी’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या तांड्यात आणखी सुमारे ११ हजार स्थलांतरित सामील झाले आहेत व ही संख्या १५ हजारांवर जाण्याचा अंदाज आहे.

हे स्थलांतर का सुरू आहे?

अमेरिका खंडातील प्रामुख्याने दक्षिण व मध्य भागातील देशांतील नागरिक प्रामुख्याने अमेरिका देशाकडे (यूएसए) ठराविक काळाच्या अंतराने २०१८ पासूून हजारोंच्या संख्येने स्थलांतरित होत आहेत. होंडुरास, ग्वाटेमाला, निकाराग्वा व एल साल्वादोर देशांतील नागरिक आपापल्या देशांतील सामाजिक-राजकीय अस्थिरता, हिंसाचार, वाढत्या गरिबीला कंटाळून मेक्सिकोत स्थलांतरित होतात. तेथून अमेरिकेस जाण्याचा त्यांचा मानस असतो. गेल्या अनेक वर्षांपासून ग्वाटेमाला व मेक्सिकोच्या प्रशासनाने अशी स्थलांतरे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते रोखण्यात त्यांना आतापर्यंत तरी अपयशच आले आहे.

कोणत्या देशातील स्थलांतरित जास्त?

या स्थलांतरितांमध्ये व्हेनेझुएलाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. खरे तर मेक्सिकोने जानेवारीत केलेल्या नव्या धोरणानुसार व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मेक्सिकोत प्रवेशासाठी ‘व्हिसा’  अनिवार्य करण्यात आला आहे. याआधी पर्यटक म्हणून व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मेक्सिकोत सहज प्रवेश मिळत असे व ते अमेरिकेच्या सीमेपर्यंत जात असत. तरीही स्थलांतरितांमध्ये व्हेनेझुएलाचे नागरिक जास्त संख्येने आहेत. अलीकडच्या काही वर्षांत व्हेनेझुएलाचे सुमारे साठ लाख नागरिक शेजारच्या देशांत स्थलांतरित झाल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे.

मेक्सिकोत स्थलांतरित कसे पोहोचतात?

चांगल्या जीवनमानाच्या आशेने या स्थलांतरितांचा तांडा अत्यंत अनिश्चित, खडतर, जोखमीचा प्रवास करत मेक्सिकोत पोहोचत असतो. दक्षिण अमेरिका खंडातील देशांतील स्थलांतरितांना दक्षिण व मध्य अमेरिका खंडास जोडणारा डॅरियन गॅप हा भौगोलिक प्रदेश आहे. या प्रांतात पाच हजार चौरस किलोमीटरचा दलदलीचा प्रदेश, घनदाट जंगल, उंंच पर्वत आहेत. विषारी सापांचा येथे धोका असतो. येथे तस्करांकडून लुटालूट, शारीरिक व लैंगिक हिंसाचाराचा कायम धोका असतो. मात्र, तरीही ‘गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, १३ हजार अवैध स्थलांतरित कोलंबियातून पनामामध्ये डॅरियन गॅपमधून खडतर प्रवास करत यंदा म्हणजे २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत आले आहेत.

स्थलांतरितांना मेक्सिको का सोडायचे?

‘एपी’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या अनेक महिन्यांपासून मेक्सिकोच्या स्थलांतरित प्रतिबंधक धोरणामुळे अमेरिकेपासून दूरवर असलेल्या मेक्सिकोच्या दक्षिण टोकाला स्थानबद्ध केल्याची या स्थलांतरितांची तक्रार आहे. तेथे त्यांना अत्यंत प्रतिकूलतेत व हलाखीत दिवस कंठावे लागत आहेत. स्थलांतर करताना त्यातील अनेकांचा खूप खर्च झाल्याने त्यांच्याकडील पैसे संपले आहेत. तपाचुला शहरात त्यांना रोजगाराच्या संधीही फारशा उपलब्ध नाहीत. मेक्सिकोत आलेल्या स्थलांतरितांनी आश्रयासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून ‘व्हिसा’ मागितला आहे. मात्र, ‘अल जझिरा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या स्थलांतरितांना मेक्सिकोच्या दक्षिण टोकाकडील च्यापास राज्यातच थांबावे लागत आहे. येथे तपाचुला शहर आहे.

अमेरिकेतील परिषदेशी संबंध कसा?

लॉस एंजेलिस येथील परिषदेत पर्यावरणातील बदल, अर्थव्यवस्थेसह स्थलांतरितांच्या प्रश्नावरही चर्चा केली गेली. अमेरिकेतील स्थलांतरितांच्या प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रादेशिक नेत्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. ८ जूनला बायडेन यांनी आपल्या भाषणात या जाहीरनाम्याचे संकेत दिले. हा स्थलांतरितांसंंदर्भात अमेरिकेचा सामायिक जबाबदारीच्या भावनेतून नवा एकात्मिक दृष्टिकोन असेल, असे त्यांंनी सांगितले. या स्थलांतरितांच्या तांड्याच्या समन्वयकांनी सांगितले, की अमरिकेतील या परिषदेच्या वेळीच आम्ही हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. त्यामुळे स्थलांतरित कोणत्या भीषण प्रश्नांना तोंड देत आहेत, याकडे संबंधित नेत्यांचे लक्ष जाईल. हे स्थलांतर करण्यास मदत करणारे ‘सेंटर फॉर ह्युमन डिग्निटी’चे लुईस गार्सिया व्हिलाग्रन यांनी सांगितले, की स्थलांतरित स्त्रिया-बालके व अवघे कुटुंबीय हे वैचारिक आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी वापरावयाचे सौदेबाजीचे चलन नव्हे, हा संदेश आम्हाला स्थलांतरितांच्या या हजारोंच्या तांड्याद्वारे द्यायचा आहे.

जाहीरनाम्याच्या मसुद्यात काय आहे?

या जाहीरनाम्याच्या मसुद्यात अवैध स्थलांतराला आळा घालण्याचा संकल्प करण्यात आला असून, ज्या देशांत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे, अशा देशांना या प्रश्नी मदत करण्याचे नमूद केले आहे. जो बायडेन यांनी जानेवारी २०२१ ला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. आधीच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारची स्थलांतरितांच्या अमेरिकेतील कायमच्या वास्तव्यासंदर्भातील अनेक कठोर धोरणे बायडेन शिथिल करत आहेत.

abhay.joshi@expressindia.com

Story img Loader