पंजाबी गायक-राजकारणी शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मूसेवाला (२८) यांची २९ मे रोजी झालेल्या हत्येने पंजाबला हादरवून सोडले. जगभरातून श्रद्धांजली वाहताना मुसेवाला यांना मोठ्या प्रमाणावर टिब्बेयां दा पुत्त म्हटले जात आहे. मुसेवालांसाठी वापरल्या जाणार्या या विशेषणाचे पंजाबच्या भूगोल, साहित्य आणि संगीताशी सखोल आणि महत्त्वाचा संबंध आहे. तसेच या भागातील लोक ज्या संघर्षातून गेले त्या संघर्षाचे ते प्रतीक आहे.
टिब्बेयां दा पुत्त : शब्द आणि पंजाबचा भूगोल
पंजाबी आणि हिंदी या दोन्ही भाषेत वापरला जाणारा ‘टिब्बे’ हा शब्द प्रामुख्याने वाळूचे ढिगारे किंवा टेकड्यांशी संबंधित आहे. पंजाबमध्ये, भटिंडा, मानसा, फाजिल्का, मुक्तसर आणि फरीदकोट आणि फिरोजपूरचा काही भाग रखरखीत आणि उष्ण असल्याने, एकेकाळी वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी ओळखला जात होता. वाळवंटासारखी परिस्थिती, कमी पर्जन्यमान, असमान आणि वालुकामय जमीन आणि सिंचनाचे निकृष्ट स्त्रोत यांमुळे येथील जमीन जवळजवळ नापीक होती आणि कापूस, बाजरी, सरसों (मोहरी) आणि हरभरा यांसारखी काही पिके सोडली तर येथे फारसे पीक घेतले जात नव्हते. येथील शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले होते. या भागात विकास आणि पायाभूत सुविधांचाही अभाव होता.
“भटिंडा, मानसा,फाजिल्का ते राजस्थान आणि हरियाणाचे काही भाग चार दशकांपूर्वीपर्यंत वाळूच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेले होते. येथे शेती करणे अवघड होते आणि त्यामुळे लोकांचे जीवन अत्यंत कठीण होते. पाणी नसल्यामुळे आणि माती वालुकामय असल्याने काही भागात गहू पिकला तर भातपिक नगण्य होते. म्हणून जेव्हा ‘टिब्बेयां दी धरती’ (वाळूच्या ढिगाऱ्यांची जमीन) म्हणतो तेव्हा आपण प्रामुख्याने पंजाबमधील भटिंडा, मानसा आणि फाजिल्काचा संदर्भ येतो. या भागांमध्ये काही दशकांपूर्वी जमीन सुपीक नसल्यामुळे जगणेही कठीण होते. हरितक्रांतीच्या उदयानंतरही या जिल्ह्यांपर्यंत कालव्याचे पाणी आणि इतर स्रोत योग्य प्रमाणात पोहोचण्यास बरीच वर्षे लागली. हळूहळू आणि स्थिरपणे, जमीन लागवडीयोग्य बनली. पण तरीही, भटिंडा आणि मानसाच्या काही भागात अजूनही वाळूचे ढिगारे आहेत,” असे मोगाचे वनस्पती संरक्षण अधिकारी जसविंदर सिंग ब्रार यांनी म्हटले.
विश्लेषण : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सूड घेण्याची घोषणा केलेली बंबिहा गॅंग कोणाची आहे?
पंजाब अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी (PAU) च्या मृदा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. ओ पी चौधरी म्हणाले की, टिब्बे किंवा वाळूचे ढिगारे जमीन नापीक करतात आणि या जिल्ह्यांतील माती वालुकामय आणि खडबडीत असल्याने लागवड करणे कठीण होते. बहुतेक भाग खाऱ्या पाण्याखाली आणि वालुकामय जमिनीखाली होते. शेतकऱ्यांनी वाळूचे ढिगारे सपाट करण्यास सुरुवात केली आणि नंतर पाणी, उत्तम प्रकारचे बियाणे, सिंचन, खते इत्यादींमुळे येथील जमीन लागवडीयोग्य बनली.”
सिद्धू मूसेवाला यांचा संघर्ष
सिद्धू मूसेवाला हे मानसा जिल्ह्यातील सरदुलगढ ब्लॉकमधील मूसा गावचे होते. हा राज्यातील सर्वात मागासलेला जिल्हा आहे जिथे एकेकाळी संपूर्ण जमीन वाळूच्या ढिगाऱ्यांनी व्यापलेली होती. मुसेवाला हे जरी शस्त्रे आणि हिंसेचा गौरव करणाऱ्या त्याच्या गाण्यांसाठी ओळखले जात असले तरी, त्यांच्या टिब्बेयां दा पुत्त या गाण्यात एका अत्यंत मागासलेल्या गावातून जगभरातील लाखो फॉलोअर्ससह सर्वात लोकप्रिय गायक-रॅपर कसा बनला याबद्दल लिहिले आहे.
“सिद्धू मुसेवालांना त्यांच्या गावातील त्यांच्या जीवनाचा खूप अभिमान होता आणि त्यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये तेच लिहिले होते. इतर गायकांनी आलिशान कार आणि शहरी जीवनातील झगमगाट यांचा अभिमान बाळगला असताना, त्यांनी आपल्या गाण्यांमध्ये ग्रामीण पंजाबमधील लोकांना स्टार बनवले. त्यांना शस्त्रे, शेती, ट्रॅक्टर आणि गावात आई-वडिलांसोबत राहणाऱ्या साध्या जीवनाची आवड होती. गाण्यांमध्ये शस्त्रास्त्रांचा प्रचार करूनही, त्यांना आपल्या ग्रामीण, जीवनाचा अभिमान आहे. गावकऱ्यांना हिरो बनवून त्यांनी आपल्या गाण्यांद्वारे पंजाबी ग्रामीण जीवन जगाच्या नकाशावर आणले,” असे त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितले.
मूसेवाला यांना श्रद्धांजली वाहताना काही व्यक्तींनी “टिब्बेयां दा पुट, टिब्ब्यां च ही रोल गया (तो ज्या मातीचा मुलगा होता त्याच मातीत सामावला) आणि ओहनु टिब्बेयां दा पुट्ट हुन ते मान सी” (नापीक भूमीचा मुलगा असल्याचा त्याला अभिमान होता)” असे म्हटले आहे.
पंजाबी विद्यापीठ, पटियाला येथील पंजाबी विभागाचे प्राध्यापक सुरजित सिंग म्हणतात की, “लोक, विशेषत: पंजाबमधील शेतकरी जे या जिल्ह्यांमध्ये राहत होते, जेथे जमीन टिब्बेने व्यापलेली होती. त्यांचे जीवन खडतर होते आणि या याचे प्रतीक म्हणून साहित्य आणि संगीतात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.”
विश्लेषण : एखाद्या गुन्हेगाराला गॅंगस्टर कसे घोषित केले जाते?
“या भागात शेती नसल्याने आणि फारसा विकास नसल्यामुळे येथील लोक संघर्ष करून खडतर जीवन जगत होते. त्यांची राहणी अतिशय सामान्य आणि खाण्याच्या सवयी अतिशय साध्या होत्या. पिके मर्यादित असल्याने त्यांच्या खाण्यातही फारसे पर्याय नव्हते. बहुतेक माळवा पट्ट्यातून उदयास आलेल्या लेखक आणि गायकांनी त्यांचे बालपण आणि त्यांना आलेल्या संघर्षांचे वर्णन करताना त्यांच्या लेखनात ‘टिब्बे’ वापरला आहे. वाळूचे ढिगारे आणि वाळवंट हे बहुतेक राजस्थानशी संबंधित असताना पंजाबचा हा भाग एकेकाळी वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी आणि खडतर जीवनासाठी ओळखला जात होता,” असे सुरजित सिंग म्हणाले.
एका मुलाखतीत मूसेवाला म्हणाले होते की, ते एका गावातील आहेत जिथे बसचीही सोय नाही. “आई-वडिलांच्या संघर्षाबद्दल बोलताना ते म्हणाला की त्यांचे वडील लष्करात ड्रायव्हर होते आणि अपघातात त्यांच्या कानाच्या पडद्यांना दुखापत झाली जेव्हा मी जीएनडीईसी लुधियानाला अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पोहोचलो तेव्हा माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. कारण माझ्या जिल्ह्यातील मुले अशा कॉलेजमध्ये क्वचितच जातात,” असे मुसेवाला म्हणाले होते.