आसिफ बागवान
मार्केटिंग कंपन्या, विविध बँकांची कर्जे पुरवणाऱ्या संस्था किंवा आर्थिक फसवणूक करू पाहणारे सायबर भामटे यांच्याकडून येणारे कॉल नेहमीच तापदायक असतात. विशेषत: आपण काहीतरी कामात असताना येणारे हे कॉल उचलल्यानंतर मनस्ताप होतोच. हे टाळण्यासाठी अनेकजण अनोळखी क्रमांक ओळखळण्याची सुविधा पुरवणाऱ्या ॲपचा वापर करतात. मात्र, ही सर्वच ॲप खासगी असल्याने त्यावरही किती भरवसा ठेवावा, हा प्रश्न उरतोच. यालाच पर्याय म्हणून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) स्वत:चे ‘कॉलर आयडी’ ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ट्राय’चे हे ॲप कसे काम करेल, त्याचा खासगी ॲपवर किती परिणाम होईल आणि त्यामुळे वापरकर्त्यांना किती फायदा होईल, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…

कॉलर आयडी म्हणजे काय?

मोबाइलवर कॉल येत असताना त्याबद्दलची जी माहिती पुरवली जाते, त्याला कॉलर आयडी म्हणतात. यामध्ये कॉल क्रमांक, क्रमांक जतन केलेला असल्यास कॉलरचे नाव, ठिकाण आदी माहिती मोबाइलच्या स्क्रीनवर प्रदर्शित केली जाते. जे मोबाइल क्रमांक सेव्ह केलेले असतात, त्यांची नावे आपल्याला मिळतात. मात्र, अनोळखी क्रमांकांची सूचना आपल्या मोबाइलमधील कॉलर आयडी सुविधेतून मिळत नाही. ते पुरवण्याचे काम ट्रू कॉलरसारखे खासगी ॲप करतात.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?
uber shikara
‘Uber’ने आता बोटसुद्धा बुक करता येणार; उबरने सुरू केलेली नवीन सेवा काय आहे?

ट्रू कॉलर हे ॲप कसे काम करते?

ट्रू कॉलर हे एक खासगी ॲप असून गेली अनेक वर्षे भारतात कार्यरत आहे. या ॲपचे भारतीय वापरकर्तेच जवळपास दोन कोटी २० लाखांहून अधिक आहेत. याशिवाय जगभरात या कंपनीच्या ॲपचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. ट्रू कॉलरचे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्यांच्या मोबाइलवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचा क्रमांक ट्रू कॉलरच्या सर्व्हरमध्ये संग्रहित डेटाबेसमधून तपासला जातो. त्यात संबंधित क्रमांकाबद्दलची किंवा त्या क्रमांकाच्या मालकाची जी माहिती उपलब्ध होते, ती मोबाइल स्क्रीनवर दर्शवली जाते. ट्रू कॉलरचा माहितीचा साठा हा वापरकर्त्यांकडूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवला जातो. एखाद्या अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनबाबतची माहिती वापरकर्त्याने ट्रू कॉलरमध्ये नमूद केल्यास तीच माहिती ॲपच्या डेटाबेसमध्ये साठवली जाते. त्यामुळे बहुतांशवेळा ट्रू कॉलर ॲपच्या माध्यमातून स्पॅम किंवा मार्केटिंग कंपन्यांचे कॉल समजणे सोपे जाते.

‘ट्राय’ची सुविधा कशी काम करणार?

‘ट्राय’कडून विकसित करण्यात येणाऱ्या ॲपचे मुख्य कार्यही ट्रू कॉलरप्रमाणे वापरकर्त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकाची माहिती पुरवणे हेच असणार आहे. मात्र, त्याचा आधार हा वापरकर्त्यांकडून मिळालेली माहितीच असेल असे नाही. त्यासाठी ट्राय मोबाइल कंपन्यांकडील माहितीचा आधार घेईल. कोणताही मोबाइल क्रमांक मिळवण्यासाठी संबंधित ग्राहकाने जमा केलेल्या ओळख कागदपत्रांवरील (केवायसी) माहितीतील तपशील ‘ट्राय’च्या कॉलर आयडी सुविधेत दर्शवले जातील.

ही सुविधा सर्वांना मिळणार का?

‘ट्राय’ची कॉलर आयडी सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. मात्र, ती प्रत्येकाला बंधनकारक नसेल. ज्या वापरकर्त्यांना ही सुविधा कार्यान्वित करायची असेल, त्यांनाच ती मिळू शकेल. त्यासोबतच वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्याची माहिती अन्य वापरकर्त्यांना दर्शवली जाणार नाही, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे. ‘ट्राय’ने आधीपासूनच या सुविधेच्या निर्मितीचे काम सुरू केले असून लवकरच ती वापरकर्त्यांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.

याचा फायदा किती?

‘ट्राय’ची ही सुविधा वापरकर्त्यांसाठी अधिक अचूक माहिती देणारी ठरू शकते. कारण त्यामध्ये वापरकर्त्यांच्या केवायसीमधील माहिती दर्शवण्यात येणार आहे. परंतु, माहिती दर्शवण्याची परवानगी ग्राहकांकडून मिळाल्यावरच ‘ट्राय’कडून तिचा वापर केला जाणार असल्याने ही सुविधा मर्यादित ठरू शकते. विशेषत: मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांकडून जाणुनबुजून या सवलतीचा फायदा उचलण्यात येऊ शकतो.

अशा ॲपची गरज किती?

ट्रू कॉलरने २०२१मध्ये जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, सर्वाधिक स्पॅम कॉल येणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. आणखी एका संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, भारतीयांना दिवसभरात ६४ टक्के स्पॅम कॉलना तोंड द्यावे लागते. अशा स्पॅम कॉलच्या माध्यमातूनच ज्येष्ठ नागरिकांची किंवा सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे हे कॉल उचलले जाण्याआधीच त्यांची अचूक ओळख पटल्यास असे फसवणुकीचे प्रकार टाळता येऊ शकतील, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Story img Loader