रशियाने आक्रमक हल्ले सुरूच ठेवले असताना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि त्यांची पत्नी ओलेना झेलेन्स्का खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. युक्रेनमधील लोकांना त्या केवळ पाठिंबाच देत नाही तर टेलीग्राम चॅनलद्वारे युद्धग्रस्त भागातील लोकांना मदत करण्याचे काम करत आहेत.
ओलेना या राजकारणात सक्रिय नाहीत. त्या व्यवसायाने आर्किटेक्ट आणि पटकथा लेखक आहे. ओलेना या क्रिवी रिह नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्टच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी आर्किटेक्ट म्हणून फारसे काम केले नसले तरी त्यांचा कल कलाविश्वाकडे होता. यानंतर, जेव्हा झेलेन्स्कीने क्वार्टल ९५ स्टुडिओ सुरू केला, तेव्हा त्यांनी झेलेन्स्का यांना पटकथा लेखक म्हणून नियुक्त केले. दरम्यान, ओलेना आणि व्होलोडिमिर यांच्यात जवळीक वाढली. या जोडप्याने सप्टेंबर २००३ मध्ये लग्न केले.
या स्टुडिओमध्ये ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ नावाचा एक अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम होता ज्यामध्ये झेलेन्स्कीने शाळेतील शिक्षकाची भूमिका केली होती. शाळेतील शिक्षक देशाचा राष्ट्रपती कसा होतो हे या शोमध्ये दाखवण्यात आले होते. शोची पटकथा लिहिणाऱ्यांमध्ये झेलेन्स्का देखील होत्या. यानंतर, व्होलोडिमिरच्या लोकप्रियतेने त्यांना देशाचे राष्ट्रपती बनवले, पण ओलेना पूर्वीप्रमाणेच पडद्यामागे काम करत राहिल्या आणि प्रत्येक संकटात पतीला प्रोत्साहन देत राहिल्या.
युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना देखील शालेय पोषण प्रणालीसाठी काम करत आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत. रशियाच्या हल्ल्यादरम्यान, ओलेना या आपल्या देशातील महिला आणि मुलांना आधार देण्याचे काम केले आहे. युक्रेन हा शांतता शोधणारा देश असून आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. पण आम्ही शस्त्र ठेवणार नाही. आपण शांततेसाठी लढतोय हे सारे जग पाहत आहे. त्यांना अलेक्झांड्रा आणि किरिल ही दोन मुले आहेत. अलेक्झांड्रा असे या मुलीचे नाव असून ती अभिनेत्री आहे.