दाढी आणि पगडी असणाऱ्या शीखांना आता अमेरिकेत मरीनमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने नौदलास शिखांना दाढी आणि पगडी घालण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर न्यायमूर्तींनी हा आदेश देताना असा युक्तीवादही नाकारला की, धार्मिक सूट दिल्याने सामंजस्य कमी होईल. अमेरिकन आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि कोस्ट गार्ड सर्वच शीख धर्माच्या धार्मिक मान्यातांना सामावून घेतात. जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण? आणि अमेरिकन नौदलाचे काय म्हणणे होेते.
अमेरिकन न्यायालयाने आदेश दिल आहे की, नौसेना आता दाढी असणाऱ्या आणि पगडी परिधान करणाऱ्या शिखांना प्रवेश नाकारू शकत नाही. ही त्या शीख पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे, जे अमेरिकन नौदलात निवड होऊनही आपल्या धार्मिक मान्यतांना सोडल्याशिवाय प्रशिक्षण घेऊ शकत नव्हते.
आकाश सिंह, जसकीरत सिंह आणि मिलाप सिंह चहल या तीन शीख जवानांनी अमेरिकन नौदलात निवडीनंतर त्या मरीन ग्रूमिंग नियमातून सूट मागितली होती, ज्यामध्ये पुरुषांना आपली दाढी करण्याची आणि पगडी न ठेवण्याची गरज होती, मात्र त्यांना तशी परवानगी देण्यात आली नव्हती.
अगोदर दाढीसह नौदलात प्रवेश मिळत नव्हता –
मरीन कॉर्प्सने तीन शीख जवानांना स्पष्ट केले होते की, ते केवळ तेव्हाच काम करू शकतात जेव्हा ते प्रशिक्षणाच्या अगोदर आपली दाढी काढतील. यानंतर त्या तिघांनी सप्टेंबर महिन्यात अमेरिकन न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर यूएस कोर्ट ऑफ अपील्सच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शुक्रवारी आपला निर्णय सुनावला.
या तीन जणांची बाजू मांडणाऱे वकील बॅक्सटर यांनी ट्वीद्वारे सांगितले की, न्यायालयाने निर्णय दिला आहे की अमेरिकन मरीन कॉर्प्समध्ये देशाची सेवा करताना, शीख आपल्या धार्मिक मान्यता कायम ठेवू शकतात. आता हे तिन्ही शीख आपल्या दाढीसह प्रशिक्षणात प्रवेश करू शकतात. हा धार्मिक स्वातंत्र्याचा मोठा विजय आहे. वर्षानुवर्षे मरीन कॉर्प्सकडून दाढीवाल्या शिखांना निवडीनंतर प्रशिक्षणास प्रवेशापासून रोखले जात होते, मात्र आता असे होणार नाही.
नौदलाचे काय म्हणणे होते? –
याप्रकरणी नौदलाचे मत आहे की, दाढीचा सैन्यातील समानतेवरवर आणि नव्या भरतींवर परिणाम होईल. परिणामी राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. शीख धर्मात पुरुषांना केस कापायचे नसतात, याचबरोबर दाढी वाढण्यासह अनेक नियामांचे पालन करावे लागते. अमेरिकन नौदलाने महिलांना पुरुषांच्या तुलनेत अनेक प्रकरची सूट दिलेली आहे.