सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९-२०२१ दरम्यान सर्वाधिक भारतीय मजुरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. संसदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. सौदी अरेबियात २०२० मध्ये ३५७३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये ही संख्या कमी होऊन २३२८ वर पोहोचली आहे. दोन्ही वर्ष करोनाचं संकट होतं हेदेखील लक्षात घेणं महत्वाचं आहे. याशिवाय आरोग्याच्या समस्या आणि रोजगाराचा प्रश्नदेखील होता.

आखाती देशांमध्ये काय स्थिती?

संयुक्त अरब अमिराती, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, कतार आणि बहारीन यांच्यासहित आखाती देशांमध्ये भारतीय मजुरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

turkistan surgical strike on iraq
विश्लेषण: तुर्कस्तानकडून इराक, सीरियावर ‘सर्जिकल स्ट्राइक’! तुर्कस्तानातील दहशतवादी हल्ल्यामागे कुर्दिश बंडखोर? त्यांची मागणी काय आहे?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
college youth died, bullet hit the divider in pune,
पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी
Dombivli Nigerian citizen committed suicide by jumping from 15th floor
डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
Gulmarg Terrorist Attack
Gulmarg Terrorist Attack : काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद, २ कुली ठार, ३ जवान जखमी
dead body cantonment
पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला
Two people including a woman committed suicide under a running train in Pune railway station
पुणे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली महिलेसह दोघांची आत्महत्या

संयुक्त अरब अमिरातीमध्ये सर्वाधिक ३५ लाखाहून जास्त भारतीय वास्तव्यास असून २०१७ ते २०२१ दरम्यान दिवसाला पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०२० मध्ये ही संख्या २४५४ होती. २०२१ मध्ये ही संख्या वाढून २७१४ वर पोहोचली. याचदरम्यान, कतारमध्ये २०२० मध्ये ३८५ आणि २०२१ मध्ये ४२० जणांचा मृत्यू झाला.

ओमानमध्ये गेल्या पाच वर्षात भारतीयांच्या मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे. ओमानमध्ये २०१७ ला ४९५ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर २०२० मध्ये ६३० आणि २०२१ मध्ये ही संख्या ९१३ वर पोहोचली. बहारीनमध्ये २०२१ ला ३५२ आणि २०२० मध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला.

विश्लेषण: झोमॅटोच्या शेअरच्या दरानं अक्षरश: तळ गाठलाय; काय कारण आहे?

आगामी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेशी संबंधित विकासकामांमुळे कतारमध्ये भारतीय मजुरांची संख्या वाढत आहे. २०२० मध्ये देशात ३८५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही संख्या २०२१ मध्ये ४२० वर पोहोचली.

बहारीनमध्ये २०२१ मध्ये ३५२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. २०२१. कुवेतमध्ये २०२१ मध्ये १२०१ भारतीय मजुरांना आपला जीव गमवावा लागला.

मृत्यूची कारणं काय?

अनेक भारतीय मजूर धोकादायक स्थितीत काम करत असून मृत्यूसाठी यासाठी इतर कारणंही जबाबदार आहेत. २०१८ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचं सामान्य कारण आहे. याशिवाय, हृदयाशी संबंधित समस्या, रस्त्यावरील वाहतूक अपघात, उंचावरून खाली पडणं, बुडणं, आत्महत्या, पक्षाघात आणि संसर्गजन्य रोग यांचाही समावेश आहे.

विश्लेषण : हेटरोपेसिमिझम म्हणजे काय? तुम्हालाही त्याचा त्रास आहे?

कुवेतमध्ये मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूसाठी करोनाव्यतिरिक्त तेथील राहणीमान, कामासंबंधी कठोर निर्बंध, शारिरीक आणि मानसिक तणाव तसंच वैद्यकीय जागरुकता नसणं कारणीभूत आहे. याशिवाय कर्ज आणि तणाव हीदेखील आखाती देशांमध्ये महत्वाची कारणं आहेत.

दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील कामगारांचे मृत्यू

द गार्डियनमध्ये प्रसिद्ध एका लेखानुसार, आखाती देशांमध्ये एका वर्षात दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील तब्बल १० हजाराहून अधिक स्थलांतरित कामगारांचा मृत्यू होतो. यामधील अर्ध्याहून जास्त मृत्यूंचं कारण स्पष्ट नसून नैसर्गिक किंवा ह्रदयविकाराचा झटका म्हणून त्यांची नोंद आहे. स्थलांतरित कामगारांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास करण्यात आखाती देश अपयशी ठरले आहेत.

आखाती देशांमध्ये, कमी पगार असणाऱ्या स्थलांतरित मजुरांना उष्णता व आर्द्रता, हवा प्रदूषण, अतिरिक्त काम, अपमानास्पद वागणूक, खराब व्यावासयिक आरोग्य आणि सुरक्षा पद्दती, मानसिक तणाव अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.

खरं तर, उच्च तापमानात दीर्घकाळ शारीरिक श्रम केल्याने ताण वाढण्याची आणि त्यामुळे अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जवळपास तीन कोटी स्थलांतरित कामगार (मुख्यत्वे आशिया आणि आफ्रिकेतील) अरब आखाती देशांमध्ये कामाला आहेत. यामधील ८० टक्के बांधकाम, स्वच्छता, घरकाम अशा क्षेत्रात कमी पगारात काम करणारे आहेत.

भारतीय मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये स्थलांतर का करतात?

संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाच्या लोकसंख्या विभागाने ‘इंटरनॅशनल मायग्रेशन २०२० हायलाइट्स’ शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. , यानुसार, जगात सर्वाधिक स्थलांतर करणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर आहे.

जवळपास १ कोटी ८० लाख भारतीय नागरिक मायदेशात वास्तव्यास नाहीत. मध्य पूर्वेतील निर्वासित भारतीयांची संख्या (७६ लाख) लक्षणीय आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२० मधील माहितीनुसार, १ कोटी ३६ लाख नागरिक भारताबाहेर राहतात. यामधील ३ लाख ४१ हजार नागरिक संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास आहेत. तर सौदी अरेबियात २ लाखांहून अधिक असून अमेरिकेत ही संख्या १२ लाख ८० हजार आहे. कुवेतमध्ये १० लाख २९ हजार ८६१ भारतीय राहतात, तर ओमानमध्ये ७ लाख ७९ हजार ३५१ आणि कतारमध्ये ७ लाख ५६ जार ६२ नागरिक वास्तव्यास आहेत.

विश्लेषण : सेवा शुल्कासंदर्भातील नव्या नियमांना स्थगिती; ४ नोव्हेंबरपर्यंत रेस्तराँ, हॉटेलमध्ये ग्राहकांना द्यावं लागणारं सेवा शुल्क?

भारतीय नागरिक शिक्षण किंवा कामासाठी आणि खासकरुन नोकरीच्या संधींसाठी आखाती देशांमध्ये स्थलांतरित होतात. १९७० मध्ये आखाती देशांमध्ये तेलामुळे आलेली भरभराट आणि वाढत्या पैशामुळे पायाभूत सुविधा, विकासकामांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली. विकासासोबत रोजगाराच्याही अनेक संधी उपलब्ध झाल्या.

भारत, पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशातून स्थलांतरित कामगारांचा खासकरुन अर्धकुशल आणि अकुशल कामगारांचा ओघ वाढला. निम्नवर्गीय भारतीयांनाही यामधून पैसे कमावण्याची संधी दिसली.

सध्याच्या घडीला, कामगारांचा पुरवठा हा फक्त अर्धकुशल आणि अकुशल कामगारांपुरता मर्यादित राहिलेला नाही. डॉक्टर, इंजिनिअर, वास्तुविशारद यांनाही मागणी आहे.