व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांसाठीही वापरले जाते. यावर अनेक जण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामासाठी ग्रुपदेखील तयार करतात. तुमच्यापैकी अनेकजण अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी असाल किंवा तुम्ही काही ग्रुपचे अ‍ॅडमिनही असाल. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला अटक होऊ शकते. या संदर्भातील नेमके काय नियम आहेत? जाणून घेऊयात सविस्तर…

व्हॉट्सअ‍ॅप वापरासंदर्भातील पाच महत्त्वाचे नियम

कोणत्याही ग्रुपवर देशविरोधी मजकूर शेअर केल्यास केवळ शेअर करणाऱ्यालाच नाही तर ग्रुप अ‍ॅडमिनलाही दोषी ठरवले जाते. अशा परिस्थितीत दोघांनाही तुरुंगवास होऊ शकतो. तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन असल्यास, ग्रुपवर अशा कोणत्याही प्रकारचा मजकूर दिसणार नाही, याची खात्री करणे तुमची जबाबदारी आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Rape on Minor Girl and then Accused Killed Her
Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या, मृतदेह बापगाव भागात फेकला; आरोपी विशाल गवळीला अटक
mage of a laptop or mobile phone with a red "X" symbol, or a Supreme Court building photo
Right To Privacy : नागरिकांच्या गोपनीयतेला ‘सर्वोच्च’ स्थान, आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
16-year-old boy runs away from home after mother gets angry over mobile phone use
पालकांनो सावध व्हा… मोबाईलचे व्यसन मुलांसाठी ठरू शकते घातक; वाचा काय घडलं ते…

एखाद्याचे फोटो किंवा व्हिडिओ त्या वक्तीच्या परवानगीशिवाय शेअर करणे बेकायदेशीर आहे. जर ग्रुपमधील एखाद्या सदस्याने एखाद्या व्यक्तीचे त्याच्या परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडिओ शेअर केले तर ग्रुप अ‍ॅडमिनलाही दोषी धरले जाते.

हेही वाचा – विश्लेषण: सुशोभित ‘कर्तव्यपथ’ कसा असेल? सेंट्रल व्हिस्टामध्ये कोणत्या सोयीसुविधा असतील?

ग्रुपमधील एखाद्या सदस्याने कोणत्याही समुदाय आणि धर्माबद्दल आक्षेपार्ह मजूकर किंवा ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात वा कायदा व्यवस्था बिघडू शकते, असा मजकूर शेअर केल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाऊ शकते. तसेच त्याला अटकही होऊ शकते.

हेही वाचा – विश्लेषण: बुद्धिबळ जगज्जेत्या कार्लसनने सिनक्वेफिल्ड स्पर्धेतून तडकाफडकी माघार का घेतली?

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अश्लील मजकूर, फोटो, व्हिडीओ शेअर करण्यावर बंदी आहे. विशेषत: चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कोणताही मजकूर, फोटो किंव्हा व्हिडीओ कोणत्याही ग्रुपवर शेअर केल्यास ग्रुप अ‍ॅडमिनला तुरुंगात जावे लागू शकते.

भारत सरकारने फेक न्यूज आणि फेक कंटेंटच्या विरोधात काही नियम केले आहेत. या संदर्भात कायदाही करण्यात आला आहे. त्यामुळे फेक न्यूज शेअर केल्यास शेअर करणाऱ्याला आणि ग्रुप अ‍ॅडमिनला अटक होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप कसे सुरू झाले?

व्हॉट्सअ‍ॅप हे जेवढं लोकप्रिय आहे, तेवढीच त्याची सुरूवातही रंजक आहे. वर्ष २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन आणि जॉन कॉम यांनी हे अ‍ॅप्लिकेशन सुरू केले होते. हे दोघेही यापूर्वी याहू ( Yahoo ) मध्ये काम करत होते. मात्र, इथली नोकरी सोडल्यानंतर दोघांनी फेसबुकमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. पण फेसबुकने त्यांना नाकारले. दरम्यानच्या काळात जॉन कॉमने आयफोन वापरण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, येणाऱ्या काळात अ‍ॅप्लिकेशन नावाचा प्रकार प्रचंड लोकप्रिय होणार आहे. तिथूनच त्याच्या डोक्यात व्हॉट्सअ‍ॅपची कल्पना रंगू लागली. जॉन कॉमने ब्रायन अ‍ॅक्टनच्या मदतीने याहूतील आणखी पाच सहकाऱ्यांना आपल्या सोबतील घेतले. त्यांनी एका रशियन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपरला शोधून त्याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप सुरू केले.

व्हॉट्सअ‍ॅपच्या लोगोचा इतिहास काय?

व्हॉट्सअ‍ॅपचा लोगो हा जॉन कॉम आणि ब्रायन अ‍ॅक्टन या दोघांनी मिळून बनवला आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे संदेश पाठवणे, ऑडिओ/व्हिडिओ कॉल करणे यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे या लोगोत दोन चिन्ह वापरले गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप अत्याधुनिक मोबाइल फोनसाठी तयार केले गेले होते. मात्र, तुम्ही अ‍ॅपचा लोगो नीट पाहिलात तर त्याच्या आतल्या भागात जुन्या लँडलाइन फोनचा लोगो आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये कॉलचे फीचर्स आहे, हे दाखवणं हा त्यामागचा उद्देश होता.

Story img Loader