पावसाळी अधिवेशनापूर्वी, लोकसभा सचिवालयाने ‘असंसदीय शब्द २०२१’ नावाची शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली आहे. ज्यानुसार त्या शब्दांचा वापर सभागृहाच्या कामकाजात केला जाणार नाही. भ्रष्टाचार, बालीशपणा, मगरीचे अश्रू, हुकूमशहा असे दैनंदिन संभाषणात वापरले जाणारे अनेक शब्द लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अशा शब्दांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर आक्षेप घेतला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत यादी स्वीकारण्यास नकार दिला. “संसदेचे अधिवेशन काही दिवसांत सुरू होणार आहे. खासदारांवर बंदी घालणारा आदेश जारी करण्यात आला आहे. आता संसदेत भाषण करताना लज्जास्पद, शिवीगाळ, फसवणूक, भ्रष्ट, दांभिक हे मूळ शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. मी हे शब्द वापरेन. मला निलंबित करा मी लोकशाहीसाठी लढणार आहे,” असे खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ‘आंदोलनजीवी’ हा शब्द वापरला होता. पण, ‘जुमलाजीवी’ हा शब्द असंसदीय मानला गेला आहे. मोदी सरकारच्या कारभारावर टिप्पणी करताना विरोधक वापरत असलेले शब्दच असंसदीय मानले जात असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आता विश्वगुरू हा शब्दही असंसदीय ठरवणार का, असा सवाल काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. ‘‘आम्ही तर आता विश्व ठगगुरू असे म्हणू’’, अशी टिका काँग्रेसच्या शक्तिसिंह गोहील यांनी केली.
असंसदीय शब्द कोणते?
१८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाने एक पुस्तिका जारी करून काही शब्द असंसदीय घोषित केले आहेत. ‘असंसदीय शब्द २०२१’ या पुस्तिकेत शब्द आणि वाक्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लज्जित, विश्वासघात, नाटक, ढोंगी, जुमलाजीवी, बालबुद्धी, कोविड स्प्रेडर, स्नूपगेट, अराजकतावादी, शकुनी, हुकूमशाही, तानाशाह, तानाशाही, जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, खून से खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, रक्तपात, रक्तरंजित, लज्जास्पद, अपमानित, फसवणूक, चमचा, चमचागिरी, चेला, बालिशपणा, भित्रा, गुन्हेगार, गाढव, नाटक, लबाडी, गुंडागर्दी, ढोंगी, अकार्यक्षमता, दिशाभूल, खोटे, गद्दार, अपमान, असत्य, अहंकार, भ्रष्ट, खरीद फारोख्त, दलाल, दादागिरी, विश्वासघात, मूर्ख, लैंगिक छळ या शब्दांचा समावेश आहे.
पाहा व्हिडीओ –
नियमांनुसार, हे शब्द असंसदीय मानले जातील आणि रेकॉर्डमधून काढून टाकले जातील. या यादीत असे काही शब्द देखील समाविष्ट केले गेले आहेत, जे खूप सामान्य आहेत आणि ते रोजच्या बोलण्यात तितकेच वापरले जातात.
काय आहे नियम?
सभागृहात अनेकवेळा खासदार असे शब्द आणि वाक्य वापरतात, जे नंतर सभापती किंवा सभापतींच्या आदेशाने रेकॉर्डमधून काढले जातात. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत तेच शब्द आणि वाक्ये आहेत, ज्यांना लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभेत २०२१ मध्ये असंसदीय घोषित करण्यात आले होते.
लोकसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण
लोककसभेच्या सचिवालयाने सूचिबद्ध केलेले असंसदीय शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जातील. मात्र, संसदेच्या सभागृहांमध्ये कोणत्याही शब्दावर बंदी घातली जाणार नाही, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.