साधारणपणे २००८-०९ च्या सुमारास भारतीय क्रिकेट वर्तुळात अशी एक चर्चा परसली होती की, राजस्थान रॉयल्सचा अतुल शर्मा नावाचा गोलंदाज प्रत्येक चेंडू ताशी १५० किमीच्या वेगाने टाकतो. अतुल शर्माच्या मुलाखतींचे व्हिडीओ अजून यु ट्यूबवर बघायला मिळतील ज्यात तो जिममध्ये आपले स्नायू फुगवताना, कुऱ्हाडीनं लाकडं तोडताना आणि भालाफेक करावी त्या प्रकारे धावत जाऊन चेंडू कसा टाकतो ते दाखवताना दिसेल. अर्थात, अतुल शर्माचं वलय लवकरच कमी झाले आणि तितक्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची प्रतीक्षा सुरू राहिली. पण, तब्बल एका दशकानंतर उमरान मलिकने सातत्याने ताशी १५० किमीच्या गतीने चेंडू टाकले आणि भारतीयांना पुन्हा अतुल शर्मा मिळाल्याचा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे जम्मूतील एका फळविक्रेत्याचा मुलगा असलेला उमरान काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातल्या लाखो क्रिकेटर्सप्रमाणे फक्त टेनीस क्रिकेट खेळायचा, त्यामुळे बालपणापासून प्रख्यात प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण वगैरे घेऊन तयार झालेला हा गोलंदाज नाहीये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय आहे तेजतर्रार चेंडूफेकीचे गुपित किंवा सीक्रेट?
आयपीएलच्या या हंगामात उमरान मलिकला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर हैदराबाद संघाचा प्रशिक्षक असलेल्या हेमांग बदानी या माजी क्रिकेटपटूने काढलेले उद्गार महत्त्वाचे आहेत. बदानी म्हणतो उमरानचा खेळ अत्यंत नैसर्गिक असून तो एक रेडीमेड प्रॉडक्ट आहे. तर, काय आहे फास्ट बॉलिंगचे सीक्रेट किंवा गुपित? कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय उमरानला असं काय मिळालंय जे प्रशिक्षित अतुल शर्माकडे नव्हतं? उमरान मलिकने केवळ यष्टीच हवेत उडवलेल्या नसून फास्ट बॉलिंग संदर्भात असलेल्या काही अफवाही हवेत उडवल्या आहेत.
फास्ट बॉलिंग टाकायला बलदंड बाहू लागतात का?
खरेतर परिस्थिती उलट आहे. शोएब अख्तरमुळे असा समज झालेला की ताशी १५० किमीच्या वेगाने चेंडू टाकायचा तर तुम्ही एखाद्या मल्लासारखे बलदंड हवेत. ही बाब अख्तरसाठी लागू पडली पण याचा अर्थ असा नाही की वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ही मुलभूत गरजच आहे. आताशा, अनेक प्रशिक्षक तासन तास जिममध्ये पडून राहू नका असा सल्ला खेळाडूंना देतात. त्यांना भीती असते की त्यामुळे त्यांचं शरीर कडक होईल, आणि आखडले गेलेले स्नायू शरीराच्या हालचालींवरती मर्यादा आणतील. क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगवान चेंडूची नोंद ऑस्ट्रेलियाच्या जेफ थॉमसनच्या नावे आहे. प्रत्येक फास्ट बॉलरसाठी थॉमसनचा ताशी १६० किमी वेगाचा चेंडू हे ध्येय असतं. जाणकारांचे मत आहे की थॉमसनच्या गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे तसा वेग निर्माण करणे शक्य होत असे. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांच्या मते थॉमसनच्या शरीराची लवचिकता असा वेगवान चेंडू टाकण्यायोग्य होती. तुम्ही थॉमसनची बॉलिंगची अॅक्शन नीट बघाल तर लक्षात येईल की त्याच्या अवयवांचे सांधे अशा एकजिनसीपणे पूर्ण शरीरासोबत काम करत की चेंडू फेक लयबद्ध वाटायची आणि जणू काही क्षेपणास्त्रच फेकण्यात येत आहे. एकदा गमतीनं अॅलन बॉर्डर म्हणाला होता, की थॉमसनची लवचिकता अशी आहे की, कदाचित तो त्याचा पाय त्याच्या डोक्याच्या मागेही लावू शकेल.
असं म्हणतात ना की फास्ट बॉलर्स जन्मालाच येतात!
सर्वोत्कृष्ट फलंदाज असो वा फिरकी गोलंदाज असो वा तेज गोलंदाज असो, ते जन्मालाच तसे येतात असं म्हटलं जातं. अशावेळी म्हणतात, की तो गिफ्टेड आहे म्हणजे हे कौशल्य घेऊनच जन्माला आलाय. अर्थात, याचा अर्थ या दिग्गजांना मेहनत करावी लागत नाही असं नाहीये. गिफ्टेड तेज गोलंदाजांनाही प्रचंड मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. नेट्समध्ये गोलंदाजीचा जितका जास्त सराव होतो तितकं शरीर सामने खेळायला सज्ज होतं व स्नायूंना सवयच होऊन जाते. असं म्हणतात, की तेज गोलंदाजांना एक गोष्ट शिकवणं कठीण आहे ती म्हणजे रिस्ट पोझिशन किंवा मनगटाची स्थिती. ज्या गोलंदाजांकडे चांगली ग्रिप किंवा चेंडूवर पकड असते, ते चेंडूला अधिक जोर देऊ शकतात आणि इथे फरक पडतो ताशी १४० नी १५० किमीच्या गतीमध्ये. ब्रेट लीच्या शब्दात सांगायचं झालं तर, जन्माला येतानाच तुम्ही नॅचरल रिस्ट पोझिशन शिकून येता किंवा येत नाही. रिस्ट पोझिशन शिकवणं व शिकणं सोपं नाही ते नैसर्गिकच असायला हवं असा ब्रेट लीचा अनुभव आहे. ब्रेट ली पुढे म्हणतो, की अनेक जण कोपरातून ताकद काढून चेंडूफेक जोरात करतात, त्यामुळे काहिसा फरक पडतो, परंतु मनगटाचा योग्य रीतीने वापर झाल्यामुळे मिळणारी ताकद या पद्धतीत होत नाही. तसंच जिममध्ये जाऊन मनगटात ताकद वगैरे आणता येते, पण रिस्ट पोझिशन व त्यामुळे मिळणारी गती शिकवता येत नाही ती जन्मत:च घेऊन यावी लागते.
वेगवान गोलंदाजीसाठी मोठ्ठा रन अप हवा का?
उमरान मलिकचा रन अप जास्त आहे, परंतु तो शोएब अख्तर वा ब्रेट ली यांच्यापेक्षा कमीच आहे. अनेक वेस्ट इंडिजचे बॉलर्सही सुरुवातीला सावकाश धावतात व क्रीजजवळ येताना त्यांचा वेग वाढतो. उलट, सध्या दिसणारं उत्क्रांत झालेले रूप म्हणजे तेज गोलंदाजांचा कमी झालेला रन अप. शरीरातल्या ऊर्जेचे व्यवस्थापन, लक्ष्यावर मनाचं पूर्ण केंद्रीकरण आदी तंत्रांमुळे भरपूर मोठा रन अप घ्यायची गरज नसल्याचं समोर आलंय. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराह तर अक्षरश: चालत जातो, पण तोही ताशी १५० किमीच्या जवळपास वेगाने चेंडू टाकतो. पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज आकिब जावेदनं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, गोलंदाज जेव्हा क्रीझशी पोचतो त्यावेळी शरीराला अत्यंत योग्य असं मॉमेंटम किंवा चालना हवी. तुम्ही ४० पावलं धावत आलात पण क्रीझशी पोचताना चालना नसेल ती लय नसेल तर एवढं धावण्याला काही अर्थ नाही. बुमराह जेव्हा क्रीझशी पोचतो तेव्हा तो अन्य गोलंदाजांएवढाच जोरात असतो, योग्य लय त्याचा शरीराला मिळालेली असते परिणामी कमी रन अप असूनही चेंडू चांगलाच वेगवान असतो. बुमराह अनेक पावलं चालत जातो मग हळू हळू गती पकडतो व शेवटची चार पावलंच तो संपूर्ण वेगात धावत असतो. शेवटची तीन पावलं अत्यंत वेगात हवीत, जे अत्यंत महत्त्वाचं आहे, जावेद सांगतो. त्यामुळे आकिब जावेदच्या सांगण्याचं मर्म आहे की तुम्ही रन अप किती मोठा घेता, किती वेगात धावता हे महत्त्वाचं नसून जेव्हा धाव संपायला येते तेव्हा तुमचा वेग किती आहे व शरीराला चालना योग्य मिळालीय का हे महत्त्वाचं आहे.
सोपी अॅक्शन असलेले बॉलर्स फास्ट बॉल कसा टाकू शकतात?
जोफ्रा आर्चर अत्यंत रिलॅक्स किंवा निवांतपणे धावत येतो परंतु शरीरातून तो ऊर्जा अशा प्रकारे संक्रमित करतो की चेंडू अत्यंत वेगाने जातो. असं म्हणतात की ऊर्जेचा प्रवास खालपासून सुरू होतो आणि जिथं बॉल हातातून सुटतो तिथपर्यंत जाऊन थांबतो. आकिब जावेदच्या सांगण्यानुसार वेगवान गोलंदाजाची शारीरिक ताकद २० टक्के असते तर ग्राउंड फोर्स, जमिनीवरून मिळालेली ऊर्जा ८० टक्के असते. ज्यावेळी बॉल हातातून सुटतो त्यावेळी गोलंदाजाचा पाय जमिनीवर किती भक्कम रोवलेला आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. जर तुमचा पाय व्यवस्थित स्थितीत असेल तर कमाल ग्राउंड एनर्जी वापरली जाते. त्यापुढेही गुडघा वाकलेला नसून एकदम ताठ असेल तर ती ग्राउंड एनर्जी तुमच्या अवयवांमधून वर सरकत चेंडूफेकीवर अपेक्षित परिणाम करते. जर तुमचा गुडघा वाकत असेल तर तुम्ही ऊर्जा फुकट घालवताय असा त्याचा अर्थ आहे.