बॉलिवूडच्या चित्रपटांमागे टाकत सध्या ऑफिसवर धुमाकूळ घालणारा चित्रपट म्हणजे ‘कांतारा’, मूळ कन्नड चित्रपट असला तर तो आता हिंदी भाषेत डब केला असल्याने प्रेक्षकदेखील हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ३० सप्टेंबर रोजी कन्नड हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आज IMDb वर देखील या चित्रपटाला ९. ३ रेटिंग देण्यात आले आहे. कर्नाटकातील एका लोकसंस्कृतीवर या चित्रपटाची कथा बेतली आहे. हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेला अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूत कोला प्रथा :

‘भूता कोला’ हा कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनार पट्टीवरील कलाप्रकार म्हणून चांगलाच प्रचलित आहे. या प्रथेत त्या भूताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे.ही लोककला सादर करणारे कलावंत एका विशिष्ट समाजातील विशिष्ट कुटुंबातील असतात. वाड वडिलांपासून या समाजात एखादे कुटुंब ही कला सादर करत आते. बऱ्याचदा या उत्सवाला आणि लोककलेला काही लोकं विरोध करतात आणि हे थोतांड आहे असं म्हणतात, पण त्यावेळी मात्र त्या देवतेचा प्रकोप होतो असं इथले गावकरी मानतात. दक्षिण कर्नाटकतील काही गावात आजही हा उत्सव साजरा केला जातो.

विश्लेषण : बॉलिवुडसमोर दाक्षिणात्य चित्रपटांचं मोठं आव्हान; कोण ठरतंय वरचढ? बॉक्स ऑफिसची आकडेवारी काय सांगते?

नेमका वाद काय :

आजकाल कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की त्या संदर्भात वाद निर्माण होतो. अनेक वेळा कथा चोरल्याचे आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर होत असतात. मात्र इथे परिस्थिती वेगळी आहे. अभिनेता चेतन कुमारने या चित्रपटातील भूत कोला परंपरेबद्दल विधान केले केले होते. ‘भूत कोला ही परंपरा हिंदू धर्माचा भाग नाही. हिंदू धर्माच्या अस्तित्वात येण्यापूर्वी ती प्रथा सुरु होती. त्यामुळे ज्याप्रमाणे हिंदू भाषा ही कोणावर लादता येत नाही. त्याचप्रमाणे हिंदुत्वही कोणावर लादता येत नाही. भूत कोला ही देशातील मूळ रहिवाशांची परंपरा आहे. ती हिंदू धर्मात येणार नाही’. असे त्याचे मत होते. चेतन दीर्घकाळापासून सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर आवाज उठवत आहे आणि शेतकरी, कामगार, दलित आणि आदिवासींच्या कल्याणासाठीच्या चळवळींचा तो चेहरा आहे. हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध टिपण्णी केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

एका हिंदू संघटनेने चेतन अहिंसेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चेतनविरुद्ध कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या भूत कोला या परंपरेबद्दल असलेल्या संवादावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. श्री रामा सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक म्हणाले की ‘कांतारा हिंदू संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करते चेतनला तेथील संस्कृती आणि परंपरा माहीत नाही. तो नास्तिक आणि कम्युनिस्ट आहे. देशाच्या संस्कृतीवर टीका करणार्‍या ‘बुद्धिजीवी’ लोकांपैकी ते एक आहेत. तो समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले’.

चेतनला एकीकडून तीव्र विरोध होत असताना त्याच्या पाठीशी काही दलित संघटना उभ्या राहिल्या आहेत. दलित नेते आणि म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनचे माजी महापौर पुरुषोथामा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘दलित आणि मागासवर्गीय समाज चेतनच्या पाठीशी उभा आहे’. प्रख्यात कन्नड केएस भगवान यांनी शनिवारी सांगितले की ‘पूजा करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही तो आर्यांकडून ३,५०० वर्षांपूर्वी मध्य आशियातून आला आहे’. ते पुढे म्हणाले की ‘चेतन बरोबर आहे स्थानिक किंवा मूळ वंशजांनी भूत कोलाची प्रथा पाडली नसून वैदिक प्रथा भारतात आल्यावरच याची सुरवात झाली आहे’.

आज आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास. आजही देशात विविध रूढी परंपरा सुरु आहेत. त्याचा उगम कधी झाला हे सांगणे थोडे कठीण आहे. आज भारतातील खेडोपाड्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. कोकण, गोव्याच्या पट्यात दरवर्षी शिमगा उत्सव साजरा केला जातो. यामागे एकच उद्देश असतो तो म्हणजे समाजाने एकत्र येणे. याच कांतारा चित्रपटाची भुरळ आता परदेशात लोकांना पडली आहे. लवकरच हा चित्रपट व्हिएतनाममध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is bhoot kola tradition shown in film kaantara and its controversy spg
Show comments