अमित जोशी

शनिवारी अवघ्या राज्याने मराठी नव वर्षाचे दमदार स्वागत केले. करोनावरील सर्व निर्बंध उठवल्यानंतरचा आणि मास्क मुक्तीचा हा पहिला दिवस होता. हा दिवस संपत असतांना विदर्भातील काही भागात रात्री आठच्या सुमारास प्रकाशमय गोष्ट अग्नी गोळ्याच्या स्वरुपात आकाशात एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जातांना अनेकांनी बघितली. अनेकांचे याचे मोबाईलमध्ये चित्रणही केले. सुरुवातील तो उल्का वर्षाव वाटला. त्यानंतर वर्धा आणि चंद्रपुरमध्ये काही ठिकाणी अग्नी गोळ्याच्या स्वरुपातील ही गोष्ट जमिनीवर पडल्याचं लोकांनी सांगितलं. काही तासातच या गोष्टी धातूच्या असल्याचं स्पष्ट झालं. काही ठिकाणी थातूच्या रिंग सापडल्या तर काही ठिकाणी धातूचे गोळे सापडले. या धातू सदृश्य वस्तुंवरुन हे रॉकेटचे अवशेष असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात या वस्तुंना अवकाश कचरा – Space debris म्हणून ओळखले जाते.

shilphata road cash 5 crore rupees seized
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट
Thieves run away carrying bullets by pretending to take test drive in Kondhwa
रपेट मारण्याची बतावणी; बुलेट घेऊन चोरटा पसार, कोंढवा भागातील घटना
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

अवकाश कचरा – Space debris म्हणजे काय ?

४ ऑक्टोबर १९५७ ला सोव्हिएत रशियाने स्फुटनिक नावाचा ८४ किलो वजनाचा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवला आणि कृत्रिम उपग्रहाचे युग सुरु झाले. हा उपग्रह पृथ्वीपासून २१५ ते ९४० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीभोवती फिरत होता.काही दिवसांनंतर हा उपग्रह निकामी झाला आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीकडे खेचला जात पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट झाला. १९५७ पासनू आत्तापर्यंत आठ हजार पेक्षा जास्त विविध आकाराचे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले असून यापैकी एक हजारपेक्षा जास्त उपग्रह सध्या कार्यरत आहे.उर्वीरत उपग्रहांपैकी काही उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट झाले असले तरी अनेक उपग्रह हे विविध उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहेत. यालाच अवकाश कचरा असं म्हणतात.

फक्त कृत्रिम उपग्रहांमुळे अवकाश कचरा तयार होतो असं नाही तर हे उपग्रह नियोजित उंचीवर नेण्यासाठी, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर नेण्यासाठी अत्यंत शक्तीशाली रॉकेटचा – प्रक्षेपकांचा वापर केला जातो. रॉकेट जरी एकसंध दिसत असलं तरी ते वेगवेगळ्या टप्प्यात काम करत असतं. ठराविक उंची गाठल्यावर रॉकेटच्या काही भागाचे काम संपते आणि तो भाग हा मुख्य रॉकेटपासून वेगळा होतो आणि रॉकेटच्या पुढचा टप्पा कार्यन्वित होत असतो. तेव्हा निकामी झालेले रॉकेटचे भाग हे पृथ्वीभोवती वेगाने काही काळ फिरत रहातात. काही वेळा हे रॉकेटचे भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचले जात वातावरणात घर्षणाने नष्ट होतात. तर काही भाग हे जळत जमिनीवर येऊन आदळतात. तेव्हा विदर्भात रात्री आकाशात जो अग्नीचा गोळा, प्रकाशमय वस्तू बघाला मिळाली तसंच वर्धा- चंद्रपूरमध्ये जे थातूचे भाग सापडले ते वापर झालेल्या रॉकेटचे भाग – अवशेष असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

असे निकामी झालेले उपग्रह, रॉकेटचे निकामी भाग वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतांना एकमेकांवर आदळले तर त्याचे आणखी तुकडे तयार होतात आणि अवकाश कचऱ्यात आणखी भर पडते.

अवकाश कचरा हा फक्त काही उपग्रहामुळे, रॉकेटमुळेच तयार होतो असं नाही तर उपग्रहभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळेही अवकाश कचरा तयार होतो. उदा..भारताने एप्रिल २०१९ मध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी केली. म्हणजे काय तर जमिनीवरुन क्षेपणास्त्र डागत पृथ्वीभोवती वेगाने फिरणारा सुमारे ३०० किलोमीटर उंचीवरचा स्वतःचाच एक उपग्रह नष्ट केला. यामुळे या उंचीवर असंख्य तुकडे तयार झाले जे वेगाने पृथ्वीभोवती फिरायला लागले. अर्थात या उंचीवर कोणतेही उपग्रह नसल्याने उपग्रहांना धोका नव्हता आणि हे तुकडे काही दिवसांतच वातावरणात जळून नष्ट झाले. चीनने मात्र गेल्या दहा वर्षात अशा दोन चाचण्या केल्या ज्यामुळे मोठ्या प्रमाणात उपग्रहांचे तुकडे होत अवकाश कचरा निर्माण झाला आहे.

अवकाश कचरा का धोकादायक ?

अवकाश कचरा वेगवेगळ्या उंचीवर फिरत आहे. पृथ्वीपासून सुमारे १२०० किलोमीटर उंचीपर्यंत याचे प्रमाण खूप जास्त आहे. एका बॉल बेअरिंगच्या आकापासपासून ते लहान चार चाकी गाडी एवढा आकार असं याचे स्वरुप आहे. असे साधारण काही लाख तुकडे असावेत असा एक अंदाज आहे. या कचऱ्याचा वेग हा सरासरी सात किलोमीटर प्रति सेकंद एवढा प्रचंड आहे. म्हणजे बॉल बेअरिंगच्या आकाराची वस्तू ही अख्खा उपग्रह निकामी करु शकते. एवढंच नाही तर सध्या ४२० किलोमीटर उंचीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मानवी मोहिमा सातत्याने सुरु आहे. या अवकाश स्थानकाला नेहमीच अवकाश कचऱ्यापासून सावध रहावे लागत आहे. भविष्यात मानवाच्या अवकाश मोहिमा वाढणार असून त्यात भारताचीही भर पडणार आहे. तेव्हा मानवी मोहिमांसाठी अवकाश कचरा हे नेहमीच एक मोठे आव्हान ठरणार आहे. हाच जर कचरा अवकाशातून जमिनीवर मानवी वस्तीवर पडला तर त्यामुळे होणारे नुकसान हे अर्थात मोठे असू शकते.

अवकाश कचऱ्यावर नियत्रंण ठेवता येईल का ?

अवकाश कचरा निर्माण होऊ नये यासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय नियम, कायदा अस्तित्वात नाही. उपग्रहांची मागणी वाढली असल्याने उपग्रह प्रक्षेपणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अवकाश कचऱ्यात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. तेव्हा कार्यकाल संपलेल्या उपग्रहांना पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट करणे, रॉकेटच्या भागांचा पुर्नवापर असे काही यावर उपाय आहेत ज्यामुळे कमीत कमी अवकाश कचरा निर्माण होईल. अब्जाधीश ‘एलॉन मस्क’ची ‘स्पेस एक्स’सारखी कंपनी हे पाऊल काही प्रमाणात उचलतही आहे.

अवकाश कचऱ्यावर लक्ष ठेवता येते का ?

विविध रडारच्या माध्यमातून अमेरिकेचतील नासा सारख्या काही संस्था या अवकाश कचऱ्यावर लक्ष ठेवून आहेत. अशा संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाश कचऱ्याचे स्थान बघुन उपग्रह प्रक्षेपित केला जातो.