१० ऑक्टोबर रोजी दिल्लीत हिंदू संघटनांनी आयोजित केलेल्या सभेतील प्रक्षोभक भाषणांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी ( २१ ऑक्टोबर ) सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या पोलीस प्रमुखांना प्रक्षोभक भाषण देण्याऱ्यांविरोधात तक्रारीची वाट न बघता स्वत:हून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजाणी करण्यात कोणी दिरंगाई केल्यास हा न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल, असेही न्यायालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. मात्र, आपल्या कायद्यात प्रक्षोभक भाषणाची कायदेशीर व्याख्या नसताना भारतीय दंड विधानातील कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल होतो आणि कारवाई करण्यात येते? जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा