इंटरनेट-ऑफ-थिंग्ज (आयओटी) उपकरणांसाठी युनिव्हर्सल ओपन स्टँडर्ड्स तयार करणाऱ्या आणि विकसित करणाऱ्या ‘द कनेक्टिव्हिटी स्टँडर्ड अलायन्स’ (सीएसए) या कंपनीनं 3 नोव्हेंबर रोजी ‘मॅटर’ची घोषणा केली. आयओटी उपकरणांच्या इंटरऑपरेबिलिटीसाठी एक सामान्य मानक तयार करण्यासाठी ‘मॅटर’ हा एक नवीन प्रोटोकॉल अर्थात नियम आहे. सर्वात प्रथम २०१९ मध्ये ‘मॅटर’च्या कल्पनेबाबत चर्चा करण्यात आली होती. आता अ‍ॅपल, गुगल, सॅमसंग, आइक्या या मोठ्या ब्रँड्ससह २०० हून अधिक कंपन्या या नवीन मानकांना पाठिंबा देत आहेत. आता हे ‘मॅटर’ म्हणजे काय? ते कशा प्रकारे काम करतं? याबद्दल तंत्रज्ञानाची आवड असलेल्या काहीजणांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं याठिकाणी देण्यात आली आहेत.

हेही वाचा – विश्लेषण: नाकात बोट घातल्याने अल्झायमरचा धोका वाढतो का? स्मृतिभ्रंशाचा धोका व लक्षणे जाणून घ्या

Teacher Teach The Arm Span To Height Ratio In Class
VIRAL VIDEO : विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनोखा अंदाज, उंची मोजण्यासाठी दाखवला हा जबरदस्त हॅक, एकदा पाहाच
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO
sangeet manapman teaser release
Video : दिवाळीच्या मुहूर्तावर ‘संगीत मानापमान’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ तारखेला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
ai in Indian Institute of Science
कुतूहल : भारतीय विज्ञान संस्था आणि खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था

‘मॅटर’ म्हणजे काय?

स्मार्ट होम डिव्‍हाइसेस आणि आयओटीचा वापर सोपा करण्‍यासाठी ‘मॅटर’ हे एक सार्वत्रिक कनेक्टिव्हिटी मानक आहे. हा एक ओपन-सोर्स प्रोटोकॉल आहे. यामुळे वापरकर्त्यांना विविध स्मार्ट होम डिव्हाइसेस आणि मोबाइल अ‍ॅप्स एकमेकांशी कनेक्ट करण्याची परवानगी मिळले. ‘मॅटर’ स्टँडर्डचा समावेश करणाऱ्या उत्पादनांवर एक अद्वितीय लोगो दिसेल.

हेही वाचा – विश्लेषण: हवेचे प्रदूषण कमीत कमी असले तरी जीवघेणेच?

‘मॅटर’ कशा प्रकारे काम करते?

‘मॅटर’चे मूलभूत नेटवर्क तंत्रज्ञान हे वाय-फाय आणि थ्रेडवर आधारित आहे. वाय-फायमुळे ‘मॅटर’चा समावेश असलेली उपकरणं उच्च-बँडविड्थ लोकल नेटवर्कशी तर, स्मार्ट होम उपकरणं क्लाउडशी संवाद साधण्यास सक्षम होतात. थ्रेडमुळे घरात ऊर्जा-कार्यक्षम आणि अत्यंत विश्वासार्ह मेश नेटवर्क मिळते. शिवाय, यामुळे एनक्रिप्टेड पद्धतीने वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित व स्थिर राहते. तुमच्‍या स्‍मार्ट होम उपकरणांपैकी एखादे उपकरणाने काम करणे थांबवल्‍यास, नेटवर्क आपोआप अ‍ॅडजस्‍ट होईल.

हेही वाचा – विश्लेषण : ऑक्सफॅम संस्थेचा चिंता वाढवणारा अहवाल, श्रीमंत व्यक्तीच पर्यावरण ऱ्हासाचे मुख्य कारण?

‘मॅटर’ची आवश्यकता का?

वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्पादित केलेली स्मार्ट होम उपकरणे एकत्र काम करतीलच याची शाश्वती नाही. एका ब्रँडनं तयार केलेलं स्मार्ट असिस्टंट हे एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या स्मार्ट बल्बसह काम करू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, तुम्ही व्हॉइस कमांड वापरून तुमच्या घरातील स्मार्ट बल्ब चालू करू शकत नाही. यामुळे ग्राहकांना दोन पर्यायांची निवड करावी लागते. एकतर त्यांना आपल्या गरजांसाठी विविध ब्रँडच्या सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्मार्ट होम उत्पादनांची निवड करावी लागते किंवा एकाच विशिष्ट ब्रँडकडून सर्व स्मार्ट होम उत्पादने खरेदी करावी लागतात. जेणेकरून सर्व उपकरणं एकत्र काम करू शकतील. याबाबत, अ‍ॅपल होम कीटचं उदाहरण घेता येईल. या कीटमधील सर्व उत्पादनं एकमेकांशी जोडलेली असतात आणि ती एकत्र काम करतात.

‘मॅटर’ प्रोटोकॉलमुळे वरील सर्व समस्या सुटू शकतात. मॅटर-प्रमाणित असलेली उत्पादने भिन्न ब्रँडची असली तरीही अखंडपणे एकत्र काम करू शकतात. याचा अर्थ, एक ग्राहक म्हणून, तुम्हाला सर्व स्मार्ट होम उपकरणांसाठी एकाच ब्रँडवर अवलंबून राहण्याची गरज नाही. मॅटरच्या आगमनामुळे तुम्ही आता अ‍ॅपल स्मार्ट होम उत्पादनांसह फिलिफ्स ह्युचे दिवेही वापरू शकता. याशिवाय, ‘मॅटर’ आपल्या वापरकर्त्यांना वैयक्तिक अ‍ॅप्समधून सर्व आयओटी उपकरणे नियंत्रित करण्याची परवानगी देते. म्हणजेच, गुगल होममध्ये सेट केलेले उपकरणं सॅमसंग स्मार्टथिंग्ज अ‍ॅपमध्येही दिसेल. यामुळे वापरकर्त्यांना कोणते अ‍ॅप घरातील दिवे नियंत्रित करते आणि कोणते स्मार्ट स्पीकर नियंत्रित करते, हे लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा – विश्लेषण: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीला महत्त्व का? ही २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीची रंगीत तालीम आहे का?

साधनांतील सुसंगतेसाठी ‘मॅटर’

स्मार्ट होम उपकरण निर्मात्यांना त्यांचे उपकरण अधिक सुसंगत बनविण्यासाठी ‘मॅटर’ प्रमाणपत्र आवश्यक असेल. एकदा प्रमाणित झालेलं उपकरण सॉफ्टवेअर अपडेटसह अपग्रेड करता येईल. सध्या, विजेचे स्मार्ट दिवे, स्मार्ट प्लग आणि स्विचेस, हीटिंग आणि कूलिंग उपकरणे, विंडो कव्हरिंग्ज आणि शेड्स, दरवाजाचे कुलूप आणि टीव्हीसह इतर मीडिया उत्पादनांसाठी ‘मॅटर’ प्रमाणपत्र उपलब्ध आहे. सुरक्षा कॅमेऱ्यांसारख्या इतर उत्पादनांना मात्र, मॅटर मानकांच्या पुढील आवृत्तीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. गुगल होम अ‍ॅप आणि अ‍ॅपल होम अ‍ॅप सारख्या स्मार्टफोन अ‍ॅप्सलादेखील मॅटरद्वारे सपोर्ट दिला जाईल.