अमरावती शहरातील सुमारे २,००० पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना गेल्या महिन्यात कॅनाइन पार्व्होव्हायरस विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर शहरातील पशुवैद्यकांनी पाळीव प्राण्यांच्या मालकांना गंभीर उद्रेकापासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. अमरावती शहरातील जवळपास २,००० पाळीव आणि भटक्या कुत्र्यांना गेल्या महिन्यात या विषाणूची लागण झाली होती. अमरावतीस्थित भटक्या कुत्र्यांसाठी असलेल्या WASA या संवर्धन संस्थेने याबाबत माहिती दिली. सरकारी दवाखान्यात दररोज किमान २० कुत्र्यांना विषाणूची लागण झाल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.

तज्ञांनी असा संशय व्यक्त केला आहे की पाळीव प्राण्यांमध्ये पार्व्होव्हायरसच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ कोविड-१९च्या विषाणूमुळे झाली आहे. ज्यामुळे अनेक पाळीव प्राणी मालकांना त्यांच्या कुत्र्यांचे वेळेवर लसीकरण करण्यास भाग पाडले आहे. भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या, कुत्र्यांचे लसीकरण आणि रेबीजवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणाऱ्या प्राण्यांच्या जन्म नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी न केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत रस्त्यावरील कुत्र्यांमधील पार्व्होव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Golden fox and stray dogs coexist in Kharghar Mumbai print news
खारघरमध्ये सोनेरी कोल्हा आणि भटक्या कुत्र्यांचा एकत्र वावर
yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
career animal love
चौकट मोडताना : प्राणिप्रेमाची धास्ती
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?

पार्व्होव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी प्राणी बचाव संस्थेच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात १७ भटक्या कुत्र्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Parvovirus म्हणजे काय?

हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे जो कुत्र्याच्या पिल्लांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये देखील जीवघेणा ठरू शकतो. पार्व्होव्हायरस कुत्र्याच्या आतड्यांसंबंधी मार्गावर परिणाम करतो. अतिसार, उलट्या, वजन कमी होणे, निर्जलीकरण आणि सुस्ती ही काही लक्षणे आहेत. या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण ९० टक्के आहे.

कुत्र्यांमध्ये विषाणू कसा पसरतो?

पार्व्होव्हायरस संसर्गजन्य विषाणू संक्रमित कुत्र्याच्या थेट संपर्काने किंवा संक्रमित कुत्र्यांना हाताळणाऱ्या लोकांच्या हात आणि कपड्यांसह दूषित वस्तूच्या अप्रत्यक्ष संपर्काने पसरतो. कुत्रे प्रत्येक वेळी वास घेतात, चाटतात किंवा संक्रमित विष्ठा खातात तेव्हा त्यांना पार्व्होव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. संक्रमित कुत्र्याच्या संपर्कात आलेली एखादी व्यक्ती जेव्हा पिल्लाला स्पर्श करते किंवा जेव्हा पिल्लाला अन्न किंवा पाण्याची वाटी, कॉलर आणि पट्टा यासारख्या दूषित वस्तू आढळतात तेव्हा अप्रत्यक्ष संक्रमण होते.

कुत्र्यांना संसर्गापासून कसे सुरक्षित ठेवायचे?

पार्व्होव्हायरसवर कोणताही इलाज नाही पण कुत्र्याच्या पिल्लाला किंवा कुत्र्याला लसीकरण केल्याने त्यांना संसर्गापासून लढण्याची संधी मिळते. पहिला डोस जन्माच्या ४५ दिवसांनी आणि दुसरा डोस पहिल्या डोसनंतर २१ दिवसांनी दिला जातो. कुत्र्यांचे योग्य रीतीने संरक्षण करण्यासाठी, पिल्ले असताना त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे आणि नंतर ते दरवर्षी करत राहणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील इतर कुत्र्यांना स्पर्श करणे टाळा

पशुवैद्यांनी पाळीव प्राण्यांच्या मालकांना त्यांच्या कुत्र्याच्या पिलांना पूर्ण लसीकरण न केल्यास बाहेर काढू नये असे सांगितले आहे. त्यांना कुत्र्याला जमिनीला स्पर्श करु देऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे. पार्व्होव्हायरस, एक प्रतिरोधक विषाणू असल्याने, वातावरणात सहजतेने जगतो आणि पाने आणि गवतासह काहीही दूषित होऊ शकते. पशुवैद्य देखील पाळीव प्राण्यांच्या मालकांना घराबाहेरील इतर कुत्र्यांना स्पर्श करू नये अशी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. कारण संसर्ग झालेल्या कुत्र्यांना स्पर्श केलेल्या लोकांच्या स्पर्शातून आणि कपड्यांद्वारे पार्व्होव्हायरस प्रसारित होऊ शकतो.

Story img Loader