अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी आणि मॅनेजर सध्या दबक्या आवाजात एकत्र राजीनामा देण्यासंबंधी चर्चा करत आहेत. युकेमध्ये २०२१ मध्ये नोकरी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. याशिवाय अनेकांनी चांगला पगार आणि समाधान मिळवण्यासाठी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पण जर तुम्ही कामावर असामाधानी आहात, पण नोकरी सोडण्याचा पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध नाही किंवा इतर कोणते चांगले पर्याय उपलब्ध नसतील तर तुम्ही “quiet quitting” हा पर्याय तपासून पाहू शकता. कामाच्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याप्रमाणे किमान काम करण्याचा हा ट्रेंड टिकटॉकवर सुरु झाला आणि आता तरुणांमध्ये रुजला आहे.
यामुळे अनेक व्यवस्थापक चिंतेत आहे. काहींना आपले कर्मचारी कामात आळशीपणा करतील अशी चिंता आहे. पण ‘क्वाइट क्विटिंग’ म्हणजे आपल्या कामाकडे दुर्लक्ष करणं असं होत नाही, तर कामामुळे बाहेरील आपल्या सुंदर आणि अर्थपूर्ण आयुष्याकडे दुर्लक्ष करु नये असा आहे.
हेही वाचा – विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?
गेल्या २० वर्षांमध्ये अनेक लोक कामाचा अतीभार असणाऱ्या पद्धतीच भाग झाले आहेत. याशिवाय वेतन न मिळालेले श्रम हा अनेक नोकऱ्यांचा अपेक्षित भाग बनला आहे. मंदी आणि जागतिक महामारीनंतर, अनेक तरुणांकडे त्यांच्या पालकांप्रमाणे नोकरीच्या संधी आणि आर्थिक सुरक्षा नाही आहे.
व्यावसायिक नोकरी करणाऱे अनेक तरुण ज्यांना सरळमार्गे प्रगतीची अपेक्षा असते त्यांना अनिश्चित करार, नोकरीतील अनिश्चितता यांचा सामना करावा लागतो. अनेकजण आपल्याला बढती आणि बोनस मिळावा यासाठी अतिरिक्त तास काम करतात, मात्र तरीही त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागतं.
कदाचित या निराशेची प्रतिक्रिया म्हणून, डेलॉइटने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात तरुण आपल्या कामात लवचिकता आणि उद्देश तसंच जीवनात संतुलन आणि समाधान शोधत असल्याचं आढळून आलं आहे. अनेक तरुण आता कामासाठी जगा ही पद्धत नाकारत आहेत. आपल्या कामाचं नियंत्रण खासगी आयुष्यावर येणार नाही असा त्यांचा प्रयत्न आहे.
किमान क्षमतेवर काम करणं थोडं विचित्र आणि परकेपणाची भावना निर्माण करु शकतं. पण तुम्ही (आणि तुमची कंपनी) ‘क्वाईट क्विटिंग’ला घाबरु नका. हे तुमच्या भल्याचं असू शकतं.
कमी काम करणं मानसिक आरोग्यासाठी उत्तम
काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणं हे मानसिक आरोग्यासाठी उत्तम असतं असं अभ्यासात आढळून आलं आहे. २०२१ मध्ये युकेमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये, २०१७ पैकी अर्ध्या लोकांना आपलं काम आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन योग्य नसल्याचं वाटत होतं. हेच संतुलन राखण्याचा ‘क्वाईट क्विटिंग’चा मुख्य उद्देश आहे, जिथे कामाने तुमच्या वैयक्तिय आयुष्यात घुसखोरी केली आहे.
या माध्यमातून तुम्हाला कामापासून आपलं मूल्य वेगळं करता येतं. जेव्हा तुमच्याकडे फक्त काम असतं, तेव्हा त्यातून आपल्या मूल्याची भावना प्राप्त करणं कठीण असतं.
विश्लेषण : आपण खूप विचार केल्यानंतर थकवा का येतो? नेमकं घडतं काय? अभ्यासातून समोर आली नवी माहिती!
कामाच्या ठिकाणी मिळणारं अपयश अनेकदा वैयक्तिक जीवनातील अपयश म्हणून पाहिलं जातं. मग यामध्ये बढती न मिळणं, तुम्ही केलेल्या कामाची दखल न घेणं अशा गोष्टी असतात. यामुळे चिंतेत वाढ होऊ शकते. आपण आपली कामगिरी अजून चांगली कशी करावी याबद्दल सतत विचार मनात येत राहतात. याचं उत्तर म्हणून अनेकदा लोक जास्त काम करतात आणि यासोबतच जास्त काम आणि कमी आत्मसन्मानाचे दुष्टचक्र आणखी वाढतं.
बर्नआऊटचे धोके
जेव्हा गोष्टी खरोखरच हाताबाहेर जातात, तेव्हा त्याचं रुपांतर ‘बर्नआऊट’मध्ये होऊ शकतं. २०१९ मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे बर्नआउट ही एक व्यावसायिक घटना असल्याचं सांगितलं आहे, ज्यामध्ये कमीपणा, थकवा, निंदकपणा, कामापासून मानसिक अंतर आणि खराब कामगिरी अशा भावना आहेत. बर्नआउट म्हणजे अतीकामाचा धोका आहे आणि यामुळे दीर्घकाळासाठी शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.
व्यक्ती आणि कंपनीसाठी ‘बर्नआऊट’ फार कठीण आणि महागडं ठरु शकतं. बर्नआऊटचा सामना कऱणारे अनेकजण कामातून विश्रांती घेतात किंवा क्षमतेपेक्षा कमी काम करतात. ‘क्वाईट क्विटिंग’ काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखतं, जेणेकरुन ‘बर्नआऊट’ होण्याआधी तुमचं रक्षण होईल.
कामाच्या ठिकाणी चांगले संबंध
अभ्यासातून समोर आलं आहे की, आनंदी कर्मचारी हे जास्त कार्यक्षम आणि व्यस्त असतात. यामुळे त्यांच्यात विचलित होण्याची किंवा काही करुन दाखवण्याची इच्छा नसल्याच्या भावना कमी असतात.
जेव्हा लोक आनंदी असतात तेव्हा ते मैत्रीपूर्ण तसंच मोकळ्या मनाचे असतात, यामुळे कामाच्या ठिकाणी मैत्री होण्यास मदत होते. याचा परिणाम, म्हणजे इतर कर्मचारी कामाच्या ठिकाणी आपल्या आनंदात त्यांचा महत्वाचा वाटा असल्याचं सांगतात. ‘क्वाईट क्विटिंग’ फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करतं. तसंच आपल्या सहकाऱ्यांसोबत सतत असणाऱ्या स्पर्धेमुळे येणारा नकारात्मक प्रभावही दूर करतं.
कामाच्या ठिकाणी असणारी मैत्री आपल्या हक्काचं कोणीतरी असावं ही आपली मुलभूत गरज पूर्ण करतं. याचा परिणाम कामाप्रती तुमची निष्ठा वाढण्यास आणि कामगिरी उंचावण्यास मदत होते. या सर्वांचा परिणाम अधिक कार्यक्षमेतमध्ये होऊ शकतो, म्हणजे अर्थातच जास्त नफा मिळतो.
मोठ्या प्रमाणात राजीनामे दिले जात असताना ‘क्वाईट क्विटिंग’ हे त्याचं उत्तर असू शकतं. लोक अतीकाम आणि बर्नआऊट नाकारत असून समतोल आणि आनंद स्वीकारत आहेत. लोक आपली ओळख आणि अभिमान यांची सांगड कामावरील कार्यक्षमतेशी घातली जाऊ नये यासाठी लक्ष्मणरेखा आखत आहेत.
कार्यक्षमता कमी होईल याची भीती बाळगण्याऐवजी, कंपन्यांनी ‘क्वाईट क्विटिंग’ मोहिमेचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी पाठिंबा दिला पाहिजे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखण्याला प्रोत्साहन दिल्यास कर्मचाऱ्यांमध्ये आपलं मूल्य असल्याची भावना निर्माण होईल, ज्यामुळे सहभाग, उत्पादकता आणि निष्ठा वाढेल. याप्रकारे प्रत्येकजण जिंकू शकतो.