प्रेषित मोहम्मद यांच्यावर एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नूपुर शर्मा यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. नुपूर शर्मा यांना पोलिसांनी २२ जूनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंब्रा, पायधुनी आणि ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नुपूर शर्मा यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ अ, १५३ ब, २९५ अ, २९८ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अर्थ नुपूर शर्मा यांच्याविरोधात द्वेष वाढवणे, धार्मिक भावना भडकावणं, एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने केलेलं वक्तव्य, एखाद्या समुदायाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करत भावना दुखावण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक व आक्षेपार्ह कृत्यं केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय इतर गुन्हेही दाखल केले आहेत.

financial intelligence unit imposes rs 54 lakh fine on union bank of india for pmla violations
युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड; मुंबईतील शाखेतील संशयास्पद व्यवहारांच्या देखरेखीत अपयशाचा ठपका
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
avinash jadhav bjp
टोलमुक्तीनंतर श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ
mahayuti ladki bahin yojana
निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींना’ सरकारची भावनिक साद
unidentified person tearing of political parties navratri banners
कल्याणमध्ये राजकीय फलक फाडून राजकीय,सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न
police officer beats son, police officer family dispute,
कौटुंबिक वादातून पोलीस अधिकाऱ्याची मुलास मारहाण, गुन्हा दाखल
frozen sperm to 60 year old parents (1)
मृत अविवाहित मुलाचे वीर्य पालकांच्या स्वाधीन करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश; नेमके प्रकरण काय?

भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नुपूर शर्मांवर कारवाई कशासाठी?; पक्षाचं नेमकं म्हणणं काय?

यामधील २९५ अ कलमसंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. हा कायदा काय सांगतो? तसेच यापूर्वी सुप्रीम कोर्टाने या कलमासंदर्भात काय भाष्य केले आहे याबद्दल जाणून घेऊयात.

कलम २९५ अ नुसार, एखाद्या व्यक्तीने शब्दातून, वक्तव्यामधून, लिखाणातून, गाण्याद्वारे किंवा व्हिडीओच्या माध्यमातून देशातील कोणत्याही वर्गातील नागरिकांच्या धार्मिक भावना भडकावल्यास अथवा धर्माचा अपमान किंवा तसा प्रयत्न केल्यास त्याला कारावासाची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. तसंच दंडही ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात.

विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का?

कलम २९५ अ हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तक्रारीच्या आधारे पोलीस देशभरात कुठेही गुन्हा नोंद करु शकतात.

याआधी कोणत्या प्रकरणांमध्ये हे कलम वापरण्यात आलं होतं?

इंदूरमधील कॅफेमध्ये नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्यासह इतर चार चौघांवर कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.

मध्य प्रदेश पोलिसांनी नेटफ्लिक्सच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सीरिजमध्ये मंदिर परिसरात चुंबनाचं दृश्य चित्रित करण्यात आल्याने धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांडव वेब सीरिजच्या निर्मात्यांनाही धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि धर्माचा अपमान केल्याबद्दल कलम १५३ अ आणि १९५ अंतर्गत फौजदारी खटल्यांचा सामना करावा लागला होता.

उत्तर प्रदेश, ग्रेटर नोएडा आणि शहाजहानपूर अशा तीन ठिकाणी वेब सीरिजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेश पोलीस कर्मचारी, देवता आणि मालिकेत पंतप्रधानांची भूमिका साकारणाऱ्या पात्राचे अयोग्य चित्रण केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला आहे?

रामजीलाल मोदी विरुद्ध उत्तर प्रदेश प्रकरणी घटनापीठाने निकाल देताना म्हटलं होतं की, “हेतूपरस्पर आणि आक्षेपार्ह टिप्पणी करत एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्यास हे कलम वापरत कडक शिक्षा दिली जाऊ शकते. हा प्रकार सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारा आहे. या कलमांतर्गत दिली जाणारी शिक्षा ही व्यक्तीस्वातंत्र्याचं कलम १९ (१) (अ) उल्लंघन करणारी नाही”.

२०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिलासा देताना सांगितलं होतं की, “नकळतपणे किंवा निष्काळजीपणे अथवा संबंधित वर्गाच्या धार्मिक भावना न दुखावण्याच्या, आक्षेपार्ह हेतूशिवाय केलेला धर्माचा अपमान या कलमात येत नाही”.