राखी चव्हाण
दोन महिन्यांपूर्वी फ्रान्सने उच्च तापमानाचा मे महिना अनुभवला. तर जून महिन्यात स्पेन, इटली आणि इतर देशांवरही उच्च तापमानाचे संकट ओढवले. जुलै महिन्यात पूर्व युरोपचा काही भाग व पोलंडमध्ये तापमान उच्च पातळीवर आहे. इंग्लंडमध्ये तापमानवाढीमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करावी लागली. संपूर्ण युरोपमध्येच तापमान प्रचंड वेगाने वाढत असून अनेक देशांमध्ये वणवे पेटले आहेत. उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असतानाच तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे संपूर्ण युरोप होरपळला आहे. हे कशामुळे घडते आहे, याचा आढावा –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
युरोपात उष्णतेच्या लाटेमागील कारणे काय?
जगभरातील सर्वसामान्य तापमान हे गेल्या काही दशकांमध्ये एक अंशाने वाढले आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. उष्णतेची लाट येणे ही नवीन गोष्ट नसली तरीही हवामान अभ्यासकांच्या मते जगभरात वाढलेले तापमान हे उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढवत आहे. उष्णतेच्या लाटेचे प्रमाणदेखील वाढत आहे. पोर्तुगाल, स्पेन, उत्तर आफ्रिका यांच्याकडून येणारे उष्ण वारे प्रचंड दाबासह युरोपच्या उत्तरेकडील भागात आल्यास उष्णतेची लाट वाढते. त्यामुळे तापमानात वाढ होऊन आर्द्रता वाढते. यावर्षी मात्र सहारा वाळवंटाकडून आलेल्या उष्ण वाऱ्यामुळे ही उष्णतेची लाट आली आहे.
तापमान वाढीसाठी माणूस किती कारणीभूत?
हवामानात होणारे बदल हे उष्णतेच्या लाटेसाठी कारणीभूत असले तरीही हे बदल घडवून आणण्यात माणसाचा मोठा वाटा आहे. मानवी कृत्यामुळेच हवामानात बदल होत असून त्याचे परिणामही माणसांवरच होत आहे, हे युरोपमधील उष्णतेच्या लाटेने दाखवून दिले आहे. मात्र, त्यानंतरही माणूस त्याच्या वर्तनात बदल करताना दिसून येत नाही. घरी, कारखाना आणि वाहतुकीसाठी केला जाणाऱ्या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. युरोपमधील वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन समूहाने वैज्ञानिकरित्या उष्णतेच्या लाटेमागची कारणे शोधली तेव्हाही वातावरणातील बदल आणि तापमान वाढीसाठी मानवी कृत्य कारणीभूत असल्याचे त्यांना लक्षात आले.
उष्णतेची लाट, त्याची कारणे आणि त्याचे दुष्परिणाम काय?
जगभरातील वाढणाऱ्या, कमी होणाऱ्या तापमानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतातही यावर्षी उष्णतेच्या लाटेचे प्रमाण गेल्या १०० वर्षांच्या तुलनेत प्रचंड वाढले होते. विशेषकरून महाराष्ट्रात एरवीच्या तुलनेत उष्णतेच्या लाटेंची संख्या वाढली होती. उष्णतेमध्ये होणारी प्रचंड वाढ म्हणजेच कमाल तापमानात पाच किंवा त्याहून अधिक अंशाने होणारी वाढ असेल, तर साधारण उष्णतेची लाट आली असे म्हणतात. आर्द्रता आणि वाऱ्याचा कमी वेग यामुळे देखील उष्णतेची लाट वाढू शकते. शहरातील रस्ते आणि इमारतीसहीत होणारे सिमेंटीकरण हे देखील उष्णतेच्या लाटेसाठी कारणीभूत ठरत असून त्याचे मोठे दुष्परिणाम घडून येतात. युरोपातील उष्णतेची लाट हे त्याचेच उदाहरण आहे.
उष्णतेची लाट माणसांसाठी व निसर्गासाठीही धोकादायक कशी?
उष्णतेच्या लाटेचे आरोग्यावर मोठे परिणाम होतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन उष्माघातासारख्या आजाराला सामोरे जावे लागू शकते. प्रामुख्याने हृदयविकार, किडनीचा, श्वसनाचा आजार असणाऱ्या व्यक्तीसोबतच ज्येष्ठ नागरिक व चिमुकल्यांवर देखील त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. ही उष्णतेची लाट मृत्यूला देखील आमंत्रण देणारी असू शकते. तसेच मोठे पूर, जंगलातील वणवे, रेल्वेचे रुळ वितळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीदेखील उष्णतेच्या लाटेमुळे ओढवतात.
युरोपमध्ये याआधी तापमानवाढ झाली होती का?
जुलै १९७७ मध्ये युरोपमध्ये सर्वोच्च ४८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. तर जागतिक हवामान संस्थेनुसार २०१५-२०१८ ही वर्ष सर्वाधिक उष्ण होती. भविष्यात हवामानातील बदल आणि तापमान वाढ रोखण्यात माणूस यशस्वी झाला नाही तर युरोपमध्ये २०४० पर्यंत एक वर्षाआड अशी उष्णतेची लाट येतच राहील. एवढेच नाही तर पुढील काही वर्षात उष्णतेच्या लाटेत एक अंश किंवा त्यापेक्षा अधिकची वाढ झालेली दिसून येईल, असा इशाराही हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
rakhi.chavhan@expressindia.com