केंद्रीय तपास यंत्रणा सध्या देशात सक्रीय झाल्या आहेत. केवळ नेतेमंडळींचं नव्हे तर कलाकार मंडळी ईडीच्या कचाट्यात सापडली आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस. कालच पटियाला न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला आहे. २ लाख रुपयांच्या जातमुचकल्यावर तिचा जामीन मंजूर करण्यात आला. सुकेश चंद्रशेखरबरोबर २०० कोटींच्या मनी लाँडरींग प्रकरणात नाव आल्याने जॅकलिन चांगलीच अडचणीत सापडली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रसिद्ध लोकांचा नातेवाईक, महागड्या वस्तू भेट म्हणून देणे यामुळे सुकेशने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याने संपूर्ण देशात अफरातफर लोकांची फसवणूक केली आहे. इतकंच नव्हे तर आपण स्वतः तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचा नातू असल्याचे लोकांना भासवून फसवले आहे. भारतीय शहरांमधील अनेक गुन्ह्यांचा भाग असल्याचा आरोप आहे. २०१७ सालापासून तो तुरंगात जातो आणि बाहेर येतो. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी AIADMK चे बंडखोर नेते टी. टी व्ही. दिनकरन यांच्याकडून पैसे घेतले होते. या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली. मात्र तेव्हा लक्षात आले सुकेशवर याआधीच ३० एफआयआर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच सुकेशने दिल्लीमधील एक व्यावसायिकेला ‘कायदा सचिव’ असल्याचे भासवत तिच्याकडून पैसे उकळले, अखेर त्या महिलेने २०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप सुकेशवर केला.
विश्लेषण : मिलते है ब्रेक के बाद! आमिर खानमुळे चर्चेत आलेला ‘हायट्स’ ट्रेंड नेमका आहे तरी काय?
स्पेशल सेलमध्ये खंडणी व तोतयागिरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनीनंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सुपूर्त केलं आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (MCOCA) कलमे जोडली आहेत. इतकंच नव्हे तर त्याने तुरुंगात सामान्य कैद्यांप्रमाणे न राहता कारागृहातील स्वतंत्र बॅरेकसाठी तो दरमहा दीड कोटी रुपये देत होता आणि स्वतःचा मोबाईल घेऊन मुक्त फिरत होता.
तपासादरम्यान गोळा केलेल्या कागदपत्रे, तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे, दिल्ली पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की हे पैसे सर्व कर्मचार्यांना लाच म्हणून दिले गेले, त्यांच्या कर्तव्याची पर्वा न करता, ते शांत राहिले म्हणून सुकेश आणि ८२ तुरुंग कर्मचार्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आणि तुरुंगातील आठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. सुकेशबद्दल सांगायचं झालं तर तो मूळचा कर्नाटकचा असून वयाच्या १७ व्या वर्षापासून लोकांची फसवणूक करू लागला आहे.
विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?
जॅकलिनवर आरोप कोणते?
मनी लॉंडरिंगप्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप तिच्यावर आहे. सुकेशची संपूर्ण माहिती जॅकलिनला होती, असे ईडीने आरोपपत्रात म्हंटले आहे. तसेच जॅकलिनच्या मॅनेजर प्रशांतकडून ८ लाखांची एक डुकाटी स्पोर्ट्स बाइक जप्त केली आहे. शिवाय ही मोटरसायकल सुकेशनेच प्रशांतला भेट म्हणून दिल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी अभिनेत्री नोराची चौकशी झाली होती. नोरालाही सुकेशने अशाच महागड्या भेटवस्तू देण्याचे कबूल केले होते, पण चौकशी दरम्यान आपण त्यापैकी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारल्या नसल्याचं नोराने स्पष्ट केलं आहे.