२०२२ वर्ष संपत आलं या या वर्षात मनोरंजन सृष्टीत अनेक बदल झाले आहेत. कधीकाळी बॉक्स ऑफिसवर आपली हुकूमत असणारे बॉलिवूड चित्रपट यावर्षी मात्र चांगलेच आपटले. तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली. अशातच ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा हॅशटॅग इतका व्हायरल झाला आहे की आता शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाला बसणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसून येत आहे.

‘पठाण’ चित्रपटाची झलक प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावरून सध्या अनेकांनी संपत व्यक्त केला आहे. या गाण्यात दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसत आहे. शाहरुख खान आणि दीपिकावर हे गाणे चित्रित झाले आहे. मात्र या गाण्यात दीपिकाने एक केशरी रंगाची बिकनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत ‘बेशरम रंग’, यामुळे हिंदू महासभेने यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे.

विश्लेषण : ‘तांडव’ या वादग्रस्त वेबसीरिजबाबत ‘अ‍ॅमेझॉन प्राईम इंडिया’ला मोठा दिलासा; नेमकं प्रकरण काय?

चित्रपटातील शाहरुख दीपिकाच्या केमिस्ट्रीमुळेदेखील नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दीपिकाची या गाण्यातील अदा या मादक आणि अश्लील पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत असे काहींचे मत आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीदेखील अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

गाणे चोरले :

हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाचे कौतुक झाले मात्र अनेकांनी हे गाणे चोरले आहे असा आरोप केला आहे. ‘मकीबा’ या गाण्यावरून चोरले आहे असं अनेकांचं मत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची खिल्ली उडवली जात आहे. तसेच हृतिक रोशन वाणी कपूरच्या ‘वॉर’ चित्रपटातील ‘घुंगुर’ गाण्याशी बेशरमची तुलना केली जात आहे.

हेही वाचा – ‘पठाण’च नाही, तर दीपिका पदुकोणचे ‘हे’ चित्रपट रिलीजच्या आधीच अडकले होते वादाच्या भोवऱ्यात

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर यशराज बॅनर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Story img Loader