मनोरंजन क्षेत्रात चित्रपट, मालिका यापेक्षा अभिनेत्यांची प्रेमप्रकरण जास्त चर्चेत येत असतात. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान चित्रपटापेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो, ऐश्वर्या रायबरोबरचे त्याचे प्रेमप्रकरण बॉलिवूडमध्ये चांगलेच गाजले. सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. यातील एका अभिनेत्रीने त्याच्यावर काही गंभीर आरोप केलेत, नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोप कोणते?

सोमी अलीने फ्री प्रेस जर्नल या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यात तिने असे सांगितले की “सलमानने माझी फसवणूक केली होती, सलमानची गर्लफ्रेंड असतानादेखील तो माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होता.” मुलाखतीनंतर तिने सोशल मीडियाद्वारे सलमान खानवर गंभीर आरोप केलेत. पोस्टमधून तिने सांगितले की ‘सलमानने माझे शारीरिक शोषण तर केलंच तसेच मला मारहाणदेखील करत असे. तसेच मला त्याने सिगरेटचे चटकेदेखील दिले आहेत.’ सोमीने सलमानला बॉलिवूडचा ‘हार्वे वाइनस्टीन’ म्हटलं होतं. हॉलिवूड अभिनेता हार्वे वाइनस्टीन याच्यावर अनेक महिला आणि अभिनेत्रींना धमक्या देण्याव्यतिरिक्त बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. सलमान तिच्याशी जे वागला आहे ते ती अजूनही विसरलेली नाही, आजही ते विचार तिची झोप उडवतात असंही तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. सलमानला महिलांनी डोक्यावर घेणं थांबवायला हवं असंही तिने पोस्टमधून सांगितले आहे. याबाबत सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सोमी अली कोण आहे?

नव्व्दच्या दशकात अनेक अभिनेते अभिनेत्रींच्या करियरला सुरवात झाली. अभिनेत्री सोमी अली मूळची पाकिस्तानातील, सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहून त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानसोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन ती भारतात आली. वयाच्या १६ वर्षी तिने आपल्या करियरला सुरवात केली. तिने ९०च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. ते दोघेही एकमेकांना १९९१ ते १९९९ पर्यंत डेट करत होते. १९९९मध्ये सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला, सध्या ती अमेरिकेत स्थायिक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is the controversy of salman khan and somy ali what alligation on actor spg