पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच १४ जुलै रोजी आय२यू२ (I2U2) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. व्हर्च्युअल पद्धतीने होणारी आय२यू२ ची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड, यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील सहभागी होणार आहेत.

आय२यू२ म्हणजे काय?

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
News About Mahayuti
Mahayuti : महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही गोंधळाची स्थिती का आहे? काय आहेत कारणं?
GST Council Meeting (1)
जीएसटी परिषदेची बैठक संपन्न! देशात काय स्वस्त, काय महागणार?

आय२यू२ शिखर परिषदेला पश्चिम आशियाचे क्वाड म्हटले जात आहे. या गटात ‘आय२’ म्हणजे भारत आणि इस्रायल. तर, ‘यू२’ म्हणजे अमेरिका आणि यूएई. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे बायडेन तेल अवीव येथून या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पहिल्या परिषदेत भारत, अमेरिका, इस्रायल आणि यूएई अन्न सुरक्षा संकट आणि परस्पर सहकार्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील.

आय२यू२ सुरु करण्याचे उद्दिष्ट काय आहे?

“आपल्या संबंधित क्षेत्रांमध्ये आणि त्यापलीकडे व्यापार आणि गुंतवणुकीतील आर्थिक भागीदारी मजबूत करण्यासाठी, परस्पर हिताच्या समान क्षेत्रांवर चर्चा करणे” हे त्याचे नमूद केलेले उद्दिष्ट आहे.

यातील देशांनी परस्पर सहकार्यातून सहा क्षेत्रांमध्ये सहकार्यातून काम करण्याचे ठरवले आहे. यामध्ये पाणी, ऊर्जा, वाहतूक, अंतराळ, आरोग्य आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रांमध्ये संयुक्त गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. खाजगी क्षेत्रातील भांडवल आणि कौशल्याच्या मदतीने हे देश पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, उद्योगांसाठी कमी कार्बन विकासाचे मार्ग शोधण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि गंभीर उदयोन्मुख आणि हरित तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देतील.

ही संघटना इस्रायलसह पश्चिम आशियातील देशांसोबत भारताच्या वाढत्या प्रतिबद्धतेकडे देखील निर्देश करते, ज्यांच्याशी भारताने गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली घनिष्ठ संबंध विकसित केले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी जी७ शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी यूएईला एक छोटा दौरा देखील केला होता. त्याआधी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे देखील यूएई दौऱ्यावर होते.

२०२० च्या अब्राहम करारामुळे इस्रायलने यूएई आणि इतर दोन देशांशी औपचारिकपणे राजनैतिक संबंध सामान्य केले. याममुळे इस्रायलबद्दल पश्चिम आशियाई देशांच्या भूमिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला.

२०२१ मध्ये झाली होती पहिली बैठक

गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये आय२यू२ देशांची पहिली बैठक इस्रायलमध्ये झाली. या बैठकीला चारही सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या बैठकीत सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा आय२यू२ ची बैठक २०२२ मध्ये होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत चार सदस्य देशांचे प्रमुख सहभागी होत आहेत. ज्यामध्ये रशिया युक्रेन युद्ध, कच्च्या तेलासह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

आय२यू२ मध्‍ये भारताचा सहभाग कलाटणी देणारा ठरू शकतो

या बैठकीबाबत इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणाले की, आय२यू२ गटात भारताचा सहभाग ही एक कलाटणी देणारा ठरू शकतो. इस्रायलचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल याकोव्ह अमिडोर यांनी पीटीआयला सांगितले की, “भारत नवीन देशांचा समावेश करून अब्राहमिक कराराची व्याप्ती वाढविण्यात मदत करू शकतो. हे जगाच्या हिताचे असल्याचे सांगून इतर देशांना पटवून देण्याची क्षमता भारतामध्ये आहे.”

Story img Loader