करोना व्हायरस, टोमॅटो फ्लू, निपाह आणि स्वाइन फ्लूनंतर आता केरळमध्ये नोरोव्हायरसचे प्रकरण समोर आले आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, दोन मुलांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तिरुवनंतपुरममधील एका शाळेत अन्नातून विषबाधा आणि अतिसाराच्या तक्रारी आल्यानंतर दोन मुलांचे नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये नोरोव्हायरसची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या दोन्ही मुलांची प्रकृती स्थिर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, उलट्या, अतिसार आणि ताप ही लक्षणे आढळल्यानंतर सरकारी विश्लेषणात्मक प्रयोगशाळेत नमुने तपासल्यानंतर निदान झाले. आणखी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत शाळांमध्ये वाटण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे दिसत आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये केरळमध्ये नोरोव्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर वायनाडमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. उलट्या आणि अतिसार ही या विषाणूची प्रमुख लक्षणे आहेत.

कोणालाही संसर्ग होऊ शकतो

कोणालाही त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा नोरोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. कारण त्याचे अनेक प्रकार आहेत. जर तुम्हाला एकदा संसर्ग झाला असेल, तर तुम्हाला या विषाणूचा संसर्ग पुढेही होऊ शकतो.

जर तुम्हाला एका प्रकारच्या नोरोव्हायरसची लागण झाली असेल, तर त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला पुन्हा दुसर्‍या प्रकाराचा संसर्ग होऊ शकतो. एकदा संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकते याबद्दल देखील कोणतीही माहिती नाही.

नोरोव्हायरस काय आहे?

नोरोव्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव सहसा क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होममध्ये आणि इतर बंद जागांवर होतो.

या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मरत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.

नोरोव्हायरसची लक्षणे काय आहेत?

विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी, संक्रमित व्यक्ती उलट्या, अतिसार आणि ओटीपोटात दुखण्याची तक्रार करते. रुग्णांना पोटदुखी, ताप, डोकेदुखी आणि मळमळ सोबत अंगदुखीचा त्रास होतो. संक्रमित व्यक्ती नोरोव्हायरसचे लाखो कण पसरवू शकते. तर संसर्ग पसरवण्यासाठी फक्त काही कण पुरेसे आहेत.

यावर उपाय काय?

या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी काही विशेष खबरदारी देखील फार महत्वाची आहे. यामध्ये शौचालयाचा वापर केल्यानंतर किंवा डायपर बदलल्यानंतर वारंवार साबणाने हात धुणे. जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी हात काळजीपूर्वक धुणे महत्वाचे आहे. विषाणूचा संसर्ग झाल्यास पृष्ठभाग हायपोक्लोराईटने निर्जंतुक करुन घेणे आवश्यक आहे. या विषाणूच्या संसर्गाचं रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ चेन रिअॅक्शनद्वारे निदान केले जाते. या आजारावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. संसर्गाचा अती त्रास होतो त्यावेळेस शरीरामधील पाण्याचं प्रमाण कायम राहील याची काळजी घेणं महत्वाचे आहे. अनेक रुग्णांना रीहायड्रेशन फ्लुइड्स इंट्राव्हेनस पद्धतीने द्यावे लागतात.