कुलदीप घायवट
जोरदार पाऊस आणि समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वारे वाहू लागल्याने मुंबईच्या किनाऱ्यांवर अनेक समुद्री जीव येऊ लागले आहेत. यापैकीच एक म्हणजे जेलीफिशसदृश विषारी ‘ब्लू बॉटल’. गेल्या काही वर्षात या ‘ब्लू बॉटल’च्या दंशामुळे अनेक पर्यटकांना इजा झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ब्लू बॉटल’ काय आहे?

‘ब्लू बॉटल’ हा समुद्री जीव आहे. त्याचे नाव त्याच्या आकारावरून आणि दिसण्यावरून पडले आहे. निळ्या रंगाचे असंख्य धागे (शुंडक) आणि त्यावर एक अर्धपारदर्शक फुगा ज्यामध्ये हवा भरलेली असल्याने ते समुद्रावर तरंगते. समुद्रात तरंगणाऱ्या निळ्या बाटलीप्रमाणे हा जीव दिसत असल्याने त्याचे नाव ‘ब्लू बॉटल’ पडले आहे. ‘ब्लू बॉटल’ हा जेलीफिशसदृश असला तरी तो ‘सिफोनोफोर’ कुळातील आहे. याला ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर’देखील म्हटले जाते. मुंबईतील स्थानिक नागरिक, मच्छीमार याला ‘निळा फुगा’ म्हणतात. ‘ब्लू बॉटल’च्या फुग्याची लांबी ही ०.८ ते ६ इंच असते. तर, त्याच्या निळ्या रंगाच्या धाग्यांची (शुंडक) लांबी ही ३० फुटांपर्यंत वाढते. तर, खोल समुद्रातील ‘ब्लू बॉटल’च्या धाग्यांची लांबी १५० ते १६५ फूट असल्याची नोंद झाली आहे. मात्र, मुंबईच्या किनाऱ्यावर येणारे ‘ब्लू बॉटल’च्या धाग्यांची लांबी एक ते तीन फूट असल्याचे आढळून आले आहे.

अधिवास काय? त्याचे खाद्य काय?

‘ब्लू बॉटल’चा अधिवास खोल समुद्रात असतो. अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागात, अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागरात ‘ब्लू बॉटल’ आढळून येतात. पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीकडे प्रचंड वेगाने वारे वाहत असल्याने वजनाने हलके असलेले हे जीव वाऱ्यासोबत हेलकावे खात समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतात. ‘ब्लू बॉटल’ हे लहान अळ्या, मासे लहान क्रस्टेशियन, माॅलस्कस खातात.

मुंबईतील कोणकोणत्या ब्लू बॉटल ठिकाणी आढळून येतो?

मुंबईच्या सागरी परिसंस्थेत साधारण तीन प्रकारचे जेलीफिशसदृश जीव आढळतात. ठरावीक वातावरणात ते किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्यापूर्वी ‘ब्लू बटन’, पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पाऊस ओसरल्यावर ‘बॉक्स’ जेलीफिशसदृश जीव किनाऱ्यावर आढळतात. त्यातील ‘ब्लू बॉटल’ हा जीव विषारी म्हणूनच ओळखला जातो. ‘ब्लू बॉटल’ हे समुद्री जीव पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दिसून येतात. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे ‘ब्लू बॉटल’चे पुनरुत्पादन वाढले आहे. तसेच समुद्रातील वाढत्या कचऱ्यामुळे त्यांना भरपूर खाद्यही मिळते. मुंबईतील गिरगाव, जुहू, वर्सोवा, अक्सा, दादर या समुद्र किनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’ आढळून येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी जुहू समुद्र किनाऱ्यावर सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांना, समुद्री जीवरक्षकांना काही ‘ब्लू बॉटल’ दिसून आले. येत्या काही दिवसांत अन्य ठिकाणी ‘ब्लू बॉटल’ आढळून येण्याची शक्यता आहे. ‘ब्लू बॉटल’ची व्यावसायिकदृष्ट्या मासेमारी केली जात नाही. परंतु, जोरदार वारे, लाटांमुळे ‘ब्लू बॉटल’चे जथ्थे किनाऱ्यावर येतात. अनेक वेळा मच्छीमारांना या जिवांचा त्रास सहन करावा लागतो.

‘ब्लू बाॅटल’ विषारी आहे का?

‘ब्लू बाॅटल’ हे फुगासदृश अवयवातून हवा कमी-जास्त करू शकतात. त्यांच्या स्पर्शक (टेंटॅकल्स) पेशींमध्ये विषारी द्रव असते. निळ्या रंगाच्या विषारी धाग्यांना (शुंडक) मानवी स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश अतिशय वेदनादायी असतो. किनाऱ्याला आल्यावर त्यांच्यापैकी बहुतेक जीव मृतावस्थेत वाटले, तरीही ते दंश करू शकतात. मानवाचा या धाग्यांना स्पर्श झाल्यास त्वचेवर लाल चट्टे येतात आणि आग होते. काही वेळा दंश झालेल्या भागावर सूज येऊन प्रचंड वेदना होतात. हे जीव दंशाचा वापर हे शिकार करण्यासाठी आणि स्वतःच्या रक्षणासाठी करतात.

दंश झाल्यास काय करावे?

‘ब्लू बाॅटल’चा दंश झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे. दंश झालेला भाग चोळू नये, दंश झालेल्या भागावर अलगद समुद्राचे पाणी ओतावे किंवा कोमट पाणी ओतावे. त्वचेत रुतलेले काटे, निळे धागे काळजीपूर्वक काढून टाकणे गरजेचे असते आणि लगेच पुढील उपचारांकरिता जवळच्या रुग्णालयाला लवकरात लवकर जावे. योग्य उपचार घेतल्यावर एक ते दोन तासांत वेदना कमी होऊन इजा बरी होते. काही वेळा दंश झालेल्या भागावर कापलेला लिंबू घासणे किंवा त्या भागावर चुना लावणे, शेणाचा वापर करून रुतलेले काटे काढणे असे प्रयोग करण्यात येतात. मात्र, असे प्रयोग करण्यापेक्षा प्रथमोपचार करून वैद्यकीय उपचार घेणे उचित ठरते. हा जीव मानवावर स्वतःहून हल्ला करू शकत नाही. त्यांना स्पर्श झाल्यासच हे जीव दंश करतात. त्यामुळे त्यांना स्पर्श करणे किंवा जवळ जाणे टाळावे.

काय काळजी घ्यावी?

पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक चौपाटीवर जातात. मात्र, त्यांना जेलिफिशसदृश विषारी ‘ब्लू बाॅटल’चा दंश होण्याची शक्यता असल्याने, पावसाळ्याच्या महिन्यांत समुद्रात शिरू नका आणि चौपाटीवर अनवाणी फिरू नका, असे आवाहन समुद्र जीवरक्षकांनी केले आहे. यासह महापालिका, कांदळवन कक्ष आणि प्रतिष्ठान, समुद्री अभ्यासकांकडून इंग्रजी आणि मराठी भाषेतील खबरदारीचे फलक लावण्यास सुरुवात झाली आहे.