निशांत सरवणकर
दिवाण हौसिंग फायनान्स लि. म्हणजेच डीएचएफएल यांनी १७ बँकांच्या समूहाला सुमारे ३४ हजार ६१४ कोटींचा गंडा घातला आहे. एबीजी शिपयार्डलाही मागे टाकणारा हा देशातील सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा ठरला. या घोटाळ्याच्या तपासादरम्यान ‘बांद्रा बुक’ची चर्चा झाली. या बांद्रा बुकमध्ये अनेक बोगस खाती आढळली. घरखरेदीसाठी किरकोळ कर्ज दिल्याचे भासविण्यात आले. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. ही रक्कम नंतर विकासकांना प्रकल्प कर्जे म्हणून वितरित करण्यात आली. यापैकी काही रक्कम दिवाण हौसिंग फायनान्सने स्वत:साठी वापरली. विकासकांना दिलेली कर्जाची परतफेड झाली नसल्याचे दिसून येते. ‘बांद्रा बुक’मुळे ही बाब उघड झाली. काय आहे हा प्रकार?

डीएचएफएल काय आहे?

डीएचएफएल ही कंपनी अल्प व मध्यमवर्गीयांना घरखरेदीसाठी अर्थपुरवठा करण्याच्या हेतूने राजेशकुमार वाधवान यांनी ११ एप्रिल१९८४ मध्ये स्थापन केली. घरांसाठी कर्ज देणारी ती देशातील दुसरी खासगी कंपनी ठरली. अल्पावधीतच ही कंपनी प्रसिद्ध झाली. देशभरातील ५० अग्रणी बँकेतर वित्तकंपन्यांमध्ये या कंपनीचे नाव घेतले जाऊ लागले. राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणात दिलेल्या देणग्यांमुळेही ही कंपनी प्रकाशझोतात आली. मात्र जानेवारी २०१९मध्ये या कंपनीने ३१ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होऊ लागला. हा घोटाळा ३४ हजार ६१४ कोटींवर पोहोचला. १७ बँकांच्या समुहाकडून या कंपनीने ४२ हजार ८७१ कोटी रुपये कर्ज घेतले. मात्र त्यापैकी बरेच कर्ज अद्यापही फेडलेले नाही. राष्ट्रीय कंपनी न्यायाधीकरणापुढे कंपनीच्या दिवाळखोरीचे प्रकरण गेले. या प्रकरणात न्यायाधीकरणाने मध्यस्थाची नियुक्ती केली. पिरामल कॅपिटल अँड हौसिंग फायनान्स कंपनीने आता या कंपनीचा ताबा मिळविला आहे.

AIIMS Nagpur, AIIMS Nagpur Expands Medical Services, Heart and Liver Transplants in AIIMS Nagpur, All India Institute of Medical Sciences, nagpur AIIMS, Nagpur news, marathi news,
उत्तम उपचारामुळे ‘एम्स’कडे ओढा वाढला.. मूत्रपिंडानंतर हृदय, यकृत प्रत्यारोपणही…
The role of SEBI  SAT is important to maintain investment friendly environment
‘गुंतवणुकीस्नेही वातावरण राखण्यास सेबी, सॅटची भूमिका महत्त्वपूर्ण’; बाजारातील उधाणाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सावधगिरीचा इशारा
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
Medha Patkar Indefinite Hunger Strike,
अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत! बॅकवॉटर लेव्हल्सचा मुद्दा काय आहे?
Mouse Jiggler Sacks People Job
एका ‘माउस जिगलर’ने हजारो लोकांच्या नोकऱ्या घालवल्या! आहे तरी काय हा प्रकार, कर्मचाऱ्यांची हुशारी कशी उलट फिरली?
poor quality liquor cause death
बनावट दारू विषारी कशी होते? पिणाऱ्यांच्या जीवावर का बेतते?
MHADA Mumbai, patra chawl scheme 306 houses price hike, patra chawl scheme houses, patra chawl scheme 306 Home Winners , Maharashtra Housing and Area Development Authority,
पत्राचाळ योजनेतील ३०६ घरांच्या किमतीत वाढ? सात ते दहा लाखांनी वाढ प्रस्तावित; विजेत्यांवरील आर्थिक भार वाढणार
debt recovery marathi news
कर्जवसुली न्याय प्राधिकरण

फसवणूक झालेल्या बँका…

दिवाण हौसिंग फायनान्स कंपनीने १७ बँकांच्या समूहाकडून ४२ हजार ८७१ कोटींची पतसवलत घेतली. या बँकांतील ३४ हजार ६१४कोटी रुपये बुडविले. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या बँका व बुडित रक्कम(कोटींमध्ये) कंसात दिल्याप्रमाणे : बँक ऑफ बडोदा (२०३६), बँक ऑफ इंडिया (४०४४), बँक ऑफ महाराष्ट्र (६३३), कॅनरा -सिंडिकेटबँकेसह (४०२२), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (१०३४), एचडीएफसी (३४९), फेडरल बँक (२०२), आयडीबीआय (९६१), इंडियन बँक- अलाहाबाद बँकेसह (१४९९), इंडियन ओव्हरसीज (६८६), कर्नाटक बँक (१८५), पंजाब अँड सिंध (८१५), पंजाब नॅशनल बँक (३८०२), साऊथ इंडियन बँक (७१), स्टेट बँक ऑफ इंडिया (९८९८), युको (५५७), युनियन बँक ऑफ इंडिया (३८१३)

‘बांद्रा बुक’ काय आहे?

डीएचएफएलने १७ बॅंकांच्या समूहाला गंडा घातला. या प्रकरणी तक्रार करण्याची जबाबदारी युनियन बॅंक ऑफ इंडियावर सोपविण्यातआली. उप महाव्यवस्थापक विपिन कुमार शुक्ला यांनी २९ पानी तक्रार केली आहे. या तक्रारीत ‘बांद्रा बुक’ हा उल्लेख पहिल्यांदा समोर आला. १७ बॅंकांच्या समूहाने प्रकल्प कर्ज म्हणून दिवाण हौसिंग फायनान्स लि. आणि प्रवर्तकांना १४ हजार कोटी रुपये वितरित केले असले तरी ‘बांद्रा बुक’ या नावे असलेल्या स्वतंत्र खात्यात त्याची किरकोळ कर्जे म्हणून नोंद आहे. त्यासाठी एक लाख ८१ हजार अस्तित्वात नसलेले किरकोळ कर्जदार निर्माण करण्यात आले आहेत. या किरकोळ कर्जदारांना कर्ज वितरित केल्याचे दाखविण्यात आले असले

तरी विकासकांना प्रकल्प कर्ज म्हणून देण्यात आले आहे. या १४ हजार कोटींपैकी ११ हजार कोटी प्रकल्प कर्ज म्हणून तर उर्वरित तीन हजार १८ कोटी दिवाण हौसिंग फायनान्सने स्वत:कडे ठेवले आहेच.

हा घोटाळा का?

डीएचएफएल आणि तिच्या प्रवर्तकांनी प्रकल्प कर्ज म्हणून वितरित केलेल्या रकमेची थकबाकी १४ हजार ९५ लाख आहे. फॅाक्सप्रो सॅाफ्टवेअरमध्ये स्वतंत्रपणे बांद्रा बुक खाते असून त्याचे अन्य मोठ्या प्रकल्प कर्जामध्ये विलिनीकरण करण्यात आले. हे बांद्रा बुक स्वतंत्र वरिष्ठ उपाध्यक्ष (प्रकल्प) हाताळत होते. त्यांना लेखा विभागातील दोन महिला अधिकारी मदत करत होत्या. बनावट नावाने वितरीत झालेल्या अस्तित्वात नसलेल्या किरकोळ कर्जदारांचा तपशील स्वतंत्र नोंदवला गेला आहे. ही खाती नंतर डीएचएफएलच्या मुख्य लेखा सॅाफ्टवेअरमध्ये (सिनर्जी) संबंधित दोन महिला अधिकाऱ्यांनी वळती केली. हे १४ हजार कोटींचे कर्ज बुडीत झाले आहे. डीएचएफएलच्या लेखापालांनी या बोगस नोंदीपोटी रक्कम काढण्यात आल्याचे व पुन्हा ते भरल्याचे आढळते. म्हणजे प्रत्यक्षात बोगस किरकोळ कर्जदारांना कर्जाचे वितरणच झालेले नाही.

पैसे गेले कुठे?

बांद्रा बुकमध्ये दाखविलेले कर्ज पुढील कंपन्यांना वितरित करण्यात आले आणि ते बुडीत म्हणून जाहीर झाले. डू इट अर्बन व्हेंचर्स इंडिया (६०० कोटी) ही येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांची पत्नी बिंदू व मुलगी रोशनी यांची कंपनी. डीएचएफएलमध्ये येस बॅंकेने ३७०० कोटी रुपये गुंतविले. त्यानंतर डीएचएफएलने डू इट अर्बन व्हेंचर्सला ६०० कोटींचे प्रकल्प कर्ज मंजूर केले. यामध्ये अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तारण मालमत्ता फक्त २५४ कोटींची दाखविण्यात आली आहे. हे एक उदाहरण झाले. अशा रीतीने काही विकासकांना कर्जवाटप झाले.

किती विकासकांना कर्ज वाटप…?

अमरिलिस रिएल्टॅार्स, गुलमर्ग रिएल्टॅार्स, स्कायलार्क बिल्डकॅान या सुधाकर शेट्टी यांच्या सुहाना समूहाला २५९९ कोटींचे वाटप. थकबाकी – ९८ कोटी. सुहाना समूहाच्याच दर्शन डेव्हलपर्स व सिगशिया प्रा. लि. या कंपन्यांना १४ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी३४९५ कोटींचे वाटप. थकबाकी – ३९७० कोटी. याशिवाय क्रिएटोज बिल्डर्स (कर्ज – १३४८ कोटी, थकबाकी – ११९२ कोटी), टाउनशिप डेव्हलपर्स (थकबाकी – ६००२ कोटी), शिशिर रिअॅल्टी (थकबाकी -१२३३ कोटी), सनलिंक रिएल इस्टेट (थकबाकी – २१८५ कोटी) थकबाकी ही २९ फेब्रुवारी २०२० अखेरीस असून सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांत दिलेल्या माहितीनुसार आहे.

पुढे काय?

डीएचएफएलचे कपिल व धीरज वाधवान यांना सीबीआयने अटक केली आहे. आता संबंधित विकासक, बॅंकेतील अधिकारी, सरकारी अधिकारी आदींची चौकशी होईल. काही जणांना अटक होईल. काही प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली आहेच.

nishant.sarvankar@expressindia.com