कोविड -१९च्या लसींच्या मर्यादित पुरवठ्यामुळे देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. देशभरातील बऱ्याच लोकांना लसीकरणासाठी नोंदणी देखील करता आलेली नाही. त्यामुळे अनेकांना पहिल्या किंवा दुसऱ्या डोससाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल याची माहिती नाही. अशातच आता करोनाच्या संसर्गातून बरे झालेल्यांनी कधी लस घ्यायची याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतात कशा प्रकारे लसीकरण केले जात आहे?
देशात आतापर्यंत १७.७ कोटी नागरिकांनी कोविडशिल्ड (अॅस्ट्राझेनेकाची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित) किंवा कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक लिमिटेड उत्पादित) यापैकी एक लस घेतली आहे. त्यापैकी ९.९ कोटी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजूर केलेल्या नियमावलीनुसार कोविडशिल्डचा दुसरा डोस पहिल्या ४ ते ६ आठवड्यांनंतर आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस पहिल्या २८ दिवसांनी देण्यात येत होता. नंतर कोविडशिल्डसाठी ४ ते ८ आठवडे आणि कोव्हॅक्सिनसाठी ४ ते ६ आठवड्यांपर्यंत कालावधी वाढवण्यात आला. एप्रिलमध्ये केंद्राने कोविडशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ६ ते ८ आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जाऊ शकतो असे सांगितलं आहे.
करोनासंसर्गातून बरं झाल्यावर लसी कधी घ्यावी?
यूएस सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्राने करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ९० दिवसांनी लस घेण्याची सूचना केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चच्या (आयआयएसईआर) इम्यूनोलॉजिस्ट डॉ. विनीता बाल यांनी सांगितले की, “करोनाकाळात केलेल्या उपचारांमधून आलेली रोग प्रतिकारशक्ती काही महिन्यांपर्यंत टिकू शकते आणि बरे झाल्यानंतर ६ ते ८ आठवडे थांबून लसीकरण करावे.”
लस शास्त्रज्ञ डॉ. गगनदीप कांग म्हणाले की “SARS-CoV-२ विषाणूमध्ये ब्रिटनमधील ८० टक्के लोकांमध्ये रोग प्रतिकाशक्ती तयार झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे करोनातून बरे झाल्यानंतर लसीकरणासाठी सहा महिन्यांपर्यंत थांबणेही ठीक आहे.” जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशींच्या अनुषंगाने आकडेवारीचा आढावा घेतला असता संसर्गानंतर लसीकरणासाठी सहा महिने थांबणे योग्य आहे, कारण तोपर्यंत नैसर्गिक प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडी) शरीरात टिकून राहण्याची शक्यता असते.
लस घेतल्यानंतरही संसर्ग झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?
पहिला डोस घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग झाल्यास आठ आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाऊ शकतो, असं कर्नाटकच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरोसायन्सेसमधील न्यूरो व्हायरॉलॉजीचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. व्ही. निम्हंस यांनी सांगितले.संसर्गानंतर शरीरात अॅण्टीबॉडी तयार होण्यास सुरूवात होते. हे दुसरा डोस घेण्यासारखंच असल्याने दुसऱ्यांदा लसीकरणासाठी कमीतकमी आठ आठवडे थांबण्याचा सल्ला तज्ञ देतात. बऱ्याच लोकांमध्ये दुसऱ्या डोसनंतरही संसर्ग होऊ शकतो, परंतु तो संसर्ग सौम्य किंवा मध्यम स्वरुपाचा असू शकतो. हे संसर्ग केव्हा होईल यावर अवलंबून असते. पहिला डोस मिळाल्यापासून एक ते तीन आठवड्यांच्या आत संसर्ग झाल्यास याचा लसीवर परिणाम होण्याची शक्यता नसते.
लसीकरणानंतरही संसर्ग होऊ शकतो. पहिला डोस घेतल्यानंतर तीन आठवड्यांनी करोनाची लागण झाल्यास त्याची लक्षणे सौम्य असण्याची शक्यता असते. शास्त्रज्ञ अद्यापही नैसर्गिक आणि लसीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीबद्दल अभ्यास करत आहेत. सीडीसीच्या (रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र) म्हणण्यानुसार लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती तयार होण्यास दोन आठवडे लागतात आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.
पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतल्यास आणि दुसरी उपलब्ध नसल्याने कोविडशिल्डचा दुसरा डोस घेता येऊ शकतो का?
सर्व लसी वेगवगळ्या स्तरावार विकसित केल्या आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या लसी दोन डोससाठी वापरल्या जाऊ शकतात किंवा नाही याबद्दल बोलण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे डॉ.बाल म्हणाले. अधिक लस उपलब्ध झाल्याने समन्वयाचा अभाव लसीकरणात आहे. मूलत ही प्रशासकीय समस्या असून शैक्षणिक/वैज्ञानिक समस्या नाही असेही ते म्हणाले.