अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी २६ मे रोजी कोविड-१९ महासाथीचे उगमस्थान शोधून काढण्यासाठीचे प्रयत्न दुप्पट वेगाने करावेत आणि त्याचा माग चीनमधील प्रयोगशाळेपर्यंत जातो काय याचाही त्यात शोध घ्यावा, असे आदेश अमेरिकेच्या गुप्तवार्ता अधिकाऱ्यांना दिले. चीनने या महासाथीबाबत अधिक खुलेपणाने वागावे याबाबत चीनवर अमेरिकेसह संपूर्ण जगाचा दबाव असून बायडेन प्रशासन त्यानुसार कार्यवाही करत आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासात काय आढळले याची ९० दिवसांच्या आत माहिती द्यावी, असे बायडेन यांनी अमेरिकी गुप्तवार्ता यंत्रणांना सांगितले आहे. या तपासात सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रयोगशाळांना दिले असून, महासाथीचे उगमस्थान शोधून काढण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करण्याचे आवाहन चीनला केले आहे. करोना विषाणू संसर्ग झालेल्या प्राण्याचा मानवाशी आलेल्या संपर्कातून नैसर्गिकरीत्या नव्हे, तर चीनमधील प्रयोगशाळेतील अपघाताने तयार झाला असल्याचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या अनेक लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे. अमेरिकेच्या आजी आणि माजी राष्ट्राध्यक्षांच्या याच दाव्यामुळे नक्की करोनासंदर्भातील ही लॅब थेअरी आहे तरी काय हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रयोगशाळा सिद्धांत काय आहे?

बायडन यांनी अमेरिकेतील गुप्तवार्ता अधिकाऱ्यांमध्ये करोनाचा उमग कोणत्या ठिकाणी झाला यावरुन दुमत आहे. यापूर्वी ‘वुहान लॅब लीक थेअरी’ ही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी मांडलेला सिंद्धांत म्हणून फेटाळूीन लावण्यात आला होता. हा सिद्धांत द्वेष निर्माण करणारा आणि विशिष्ट अपप्रचार करण्याच्या उद्देशाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडल्याचा दावा या सिद्धांताला विरोध करणाऱ्यां केला होता.

नक्की वाचा >> समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

मात्र २०२० साली सप्टेंबर महिन्यात सर्वात आधी जगासमोर मांडण्यात आलेला हा सिद्धांत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार सोडण्याच्या १५ दिवस आधी म्हणजेच १५ जानेवारीच्या आसपास पुन्हा चर्चेत आला. अमेरिकन सरकारने करोनासंदर्भातील माहिती देणारी फॅक्ट शिट जारी केली. यामध्ये यापूर्वी जारी न केलेल्या माहिताचाही समावेश होता. यामध्ये खालील तीन महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता…

> वुहानमधील वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमधील (डब्ल्यूआयव्ही) काही संशोधकांमध्ये करोना आणि बदलत्या वातावरणानुसार होणाऱ्या आजारांची लक्षणं दिसली. विशेष म्हणजे हा प्रकार २०१९ साली डिसेंबरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून येण्याआधी घडल्याचा दावा करण्यात आला.

> वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमधील हे २०१६ संशोधक आरएटीजी १३ या वटवाघुळामध्ये आढळून येणाऱ्या करोना विषाणूवर संशोधन करत होते. हा विषाणू करोनाच्या विषाणूशी ९६.२ टक्के साधर्म्य असणारा आहे. वुहानमधील एका गुहेतून वटवाघुळांच्या विष्टेमधून २०१३ सालीच करोनाशी साधर्म्य असणारा आरएटीजी १३ हा विषाणू २०१३ साली शोधण्यात आला होता. २०१२ साली ज्या खाणीमध्ये सहा कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला तेथेच हा विषाणू आढळून आलेला.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

> वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी प्रयगोशाळेने मिलट्री रिसर्सच्या माध्यमातूनही संशोधन केलं. पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या वतीने काही प्राणीतज्ज्ञही यामध्ये सहभागी झाले होते.

मात्र सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार बायडन प्रशासनाने अमेरिकन सरकारने सुरु केलेली ही चौकशी थांबवली. काही अधिकाऱ्यांनी या अशा संशोधनासंदर्भात शंका उपस्थित केल्यानंतर, हा प्रकार म्हणजेच पैसे आणि संसाधनांचा अपव्यय असल्याचा ठपका बायडन प्रशासनाने ठेवला. मात्र बायडन प्रशासनावर करोनाचे उगमस्थान शोधून काढण्यासंदर्भातील दबाव वाढत होता. करोना विषाणूची निर्मिती कशी झाली यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनामध्ये कोणतेही ठोस कारण आढळून आले नाही आणि त्यानंतर मात्र यासंदर्भात संशोधन करण्यासाठी अमेरिकने पुढाकार घ्यावा यासाठी बायडन प्रशासनावरील दबाव वाढला.

नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?

१४ मे रोजी १८ वैज्ञानिकांनी सायन्स या जर्नलमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महासाथीच्या उगमासंदर्भातील स्पष्टता येणं आवश्यक असून हे संशोधन करणं शक्य असल्याचं म्हटलं. याच संशोधकांनी करोना विषाणूचा उगम नैसर्गिक आहे किंवा प्रयोगशाळेत झाला आहे या दोन्ही शक्यतांची गांभीर्याने पडताळणी करण्याची गरज असल्याचं म्हटलं.

मे २३ आणि २४ रोजी वॉल स्ट्रीट जर्नलने छापलेल्या दोन बातम्यांनंतर बायडन प्रशासन पुन्हा सक्रीय झाल्याचं पहायला मिळालं. यैपीक एका बातमीमध्ये अमेरिकन गुप्तचर अहवालाचा उल्लेख करत फॅक्ट शिटहून अधिक माहिती देत असल्याचं सांगण्यात आलेलं. वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी प्रयोगशाळेतील तीन संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते. तर दुसऱ्या बातमीमध्ये युनान येथील कॉपरच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या सहा कर्मचारीही अशाच प्रकारे आजारी पडल्याचं सांगण्यात आलेलं.

खाण आणि विषाणू

वॉल स्ट्रीट जर्नलमधील बातमीनुसार खाणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये न्यूमोनियाची लक्षणं दिसून आली तसेच करोना रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये करोना रुग्णांमध्ये दिसून येतात असेच काही पॅच दिसून आले. त्यानंतर पुढील वर्षभरामध्ये वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयगोशाळेत संशोधकांनी या खाणींमधून गोळा करण्यात आलेले वटवाघुळांच्या २७६ नमुन्यांची चाचणी केली. यामध्ये त्यांना करोना विषाणूचा स्ट्रेन दिसून आला ज्याला त्यांनी आरएबीटीकोव्ही/४९९१ असं नाव दिलं. यासंदर्भातील संशोधन २०१६ साली छापण्यात आलं. फेब्रुवारी २०२० मध्ये याच संशोधकांना नेचर या जर्नलमध्ये आरएटीजी १३ ची रचना आणि सार्क कोव्ही २ ची रचना ९६.२ टक्के समान असल्याचा दावा करणारा लेख लिहीला होता.

जगभरातील वैज्ञानिकांना चाचण्यांच्या तारखा आणि जनुकीय रचनेचा अभ्यास केल्यानंतर आरएबीटीकोव्ही/४९९१ आणि आरएटीजी १३ मध्ये साम्य आढळून आलं. दोन्ही विषाणू हे सारखेच होते असं वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी सांगितलं. मात्र २०१२ मध्ये खाणकामगारांच्या मृत्यूसाठी हा विषाणू कारणीभूत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोनाविरुद्धची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खरंच गोमूत्र, शेणाचा लेप फायद्याचा ठरतो का?

वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रशासनाने दोन्ही विषाणू सारखेच असल्याचा दावा केला मात्र या संदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांच्या माहितीमध्ये तफावत दिसून येत होती. त्यामुळेच वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीकडून देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये अधिक स्पष्टता असण्याची गरज असल्याचं सांगत जगभरातून यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र याचवेळी वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेमध्ये नवीन विषाणू निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता असं मानणारेही आहेत. वटवाघुळामधील वेगवेगळ्या विषाणूंमधील घटक घेऊन नवीन विषाणू तयार करण्याचे प्रयोग सुरु होते. लसनिर्मितीसाठी हे प्रयोग सुरु होते. मात्र एका अपघातादरम्यान या प्रयोगशाळेत घातक विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं मानणारेही अनेक आहेत.

या सर्व गोष्टींमुळे जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात सादर केलेल्या अहवालामध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होत नसल्याचं सांगण्यात आलं.

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भातील १२० पानांचा आपला अहवाल ३० मार्च २०२१ रोजी प्रकाशित केला. मात्र चार शक्यतांपैकी प्राण्यांमधून मानवाला या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता अधिक असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं. प्रयोगशाळेमधून हा विषाणू आल्याची शक्यता खूप कमी असल्याचं अहवालात म्हटलं होतं. मात्र यासंदर्भातील इतर शक्यतांचा अभ्यास करण्यात आला नव्हता. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी, “जागतिक आरोग्य संघटनेचा विचार करायचा झाला तर सर्व शक्यता आम्ही गृहित धरल्या आहेत,” असं म्हटलं होतं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने प्रयोगशाळेमधून विषाणूची उत्पत्ती झाल्याची शक्यता कामी असल्याचं म्हटलं होतं. “यासंदर्भात अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. जमल्यास या विषयातील तज्ज्ञांचा समावेश असणारी मोहीम हाती घेऊन संशोधन करण्याची गरज आहे. यासाठी परवानगी देण्याची माझी तयारी आहे,” असं टेड्रोस यांनी स्पष्ट केलेलं.

नक्की वाचा >> Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं

जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालासंदर्भात अनेक देशांनी चिंता व्यक्त केली. अमेरिका आणि अन्य १३ देशांनी जागतिक आरोग्य परिषदेमध्ये जारी केलेल्या एका पत्रकामध्ये, “जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये केलेल्या संशोधनासंदर्भात आम्हाला चिंता वाटत आहे. मात्र त्याचवेळी अशाप्रकारे अचानक या विषाणूचा उद्रेक कसा झाला यासंदर्भात तातडीने, परिणामकारक, स्पष्टता असणारी, वैज्ञानिक आधारवरील आणि स्वतंत्र चौकशी आणि मूल्यमापन करुन या विषाणूच्या उगामाचा शोध घेणं गरजेचं आहे,” असं म्हटलं होतं. युरोपियन महासंघाने आपली भूमिका स्पष्ट करताना, “विषाणूच्या उगमासंदर्भातील संशोधन आणि मानवाला त्याचा संसर्ग कसा झाला याबद्दल संशोधन करण्याची गरज आहे,” असं म्हटलं होतं. ज्या १८ संशोधकांनी सायन्स या जर्नलमध्ये लेख लिहिला होता त्यांनाही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर टीका केली. या संशोधनादरम्यान प्रयोगशाळेमधून विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला नसून प्राण्यांमधून मानवाला संसर्ग झाल्याचं फारसा अभ्यास न करता म्हटल्याचं सांगत वैज्ञानिकांनी नाराजी व्यक्त केली.

जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीमध्ये बायडेन यांनी चौकशीचे आदेश दिलेत. चीन वगळात कोणीच बायडेन यांनी चौकशीसंदर्भात दिलेल्या आदेशांना विरोध केलेला नाही.

चीनचा अमेरिकेवर हल्लाबोल

बिजिंगने प्रयोगशाळेमधून प्रादुर्भाव होण्यासंदर्भातील सिद्धांत म्हणजे अमेरिकने निर्माण केलेला गोंधळ असल्याचं म्हटलं आहे. इतकच नाही तर मेरीलॅण्ड येथे असणाऱ्या फोर्ट देट्रीकमधील अमेरिकन लष्करी तळामधून या विषाणूचा प्रादुर्भाव पहिल्यांदा झाल्याचा दावाही चीनने केलाय.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशासंदर्भात बोलताना चीननच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या चौकशीच्या आदेशामधून महासाथीचा वापर अमेरिका दबाव गट निर्माण करण्यासाठी, राजकारणासाठी आणि दोषारोप करण्यासाठी करत असल्याचं म्हटलं आहे. त्यांना विज्ञानाबद्दल प्रेम नाहीय. लोकांच्या जीवाची काळजी करुन या विषाणूविरुद्धचा लढा अधिक सक्षम करण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं यातून दिसून येत असल्याचंही चीनने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

भारताची भूमिका काय?

भारताने कोरना विषाणूची उत्पत्ती शोधून काढण्यासंदर्भातील अधिक तपासाला पाठिंबा दर्शवला आहे. थेट चीनचा उल्लेख न करता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं संसोधन ही पहिली पायरी होती. तसेच पुढील संशोधनासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. त्या माध्यमातून करोनाच्या उत्पत्तीसंदर्भात अधिक निश्चित माहिती मिळू शकते असं भारताने म्हटलं आहे. “जागतिक आरोग्य संघटनेने केलेलं संशोधन ही पहिली पायरी असून यामुळे पुढील संशोधन आणि माहिती गोळा करण्याला आणि निर्णयात्मक संशोधनाला वाव असल्याचं दिसून आलं आहे. पुढील संशोधनासाठी सर्वांचं सहकार्य फायद्याचं ठरेल,” असं भारताने म्हटलं आहे.

प्रयोगशाळेसंदर्भातील सिद्धांतासंदर्भात काय काय घडलं?

२०१९ : पहिल्यांदा दखल घेण्यात आली
३१ डिसेंबर २०१९ : जागतिक आरोग्य संघटनेने वुहान शहरामध्ये न्यूमोनियाच्या नवीन प्रकाराचे रुग्ण आढळून आल्याच म्हटलं. ७ जानेवारी रोजी चिनी अधिकाऱ्यांनी यासाठी करोना विषाणू कारणीभूत असल्याचं सांगितलं.

२०२० : दावे आणि शक्यता
फेब्रुवारी ३ : नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमधील संशोधकांनी सार्क-कोव्ही-२ विषाणूची रचना आणि वटवाघुळांमधील आरएटीजी १३ विषाणूची रचना ९६.२ टक्के समान आहे असं सांगितलं. तीन दिवसांनंतर साऊथ चीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीमधील संशोधकांनी त्यांच्या संशोधन अहवालामध्ये करोना विषाणूचा उगम हा प्रयोगशाळेतून झाल्याची शक्यता व्यक्त केली. नंतर हे संशोधन मांडणारा अहवाल मागे घेण्यात आला.

१९ फेब्रुवारी : द लॅन्सेटने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये २७ वैज्ञानिकांनी करोनासंदर्भातील सिद्धांत मांडत विषाणूचा उगम हा जंगलांमध्ये झाल्याची शक्यता व्यक्त केली. नेचर मेडिसीन या जर्नलमधील संशोधन अहवालानुसार वैज्ञानिकांनी विषाणूच्या उगमासंदर्भातील सिद्धांत पूर्णपणे स्वीकारता अथवा नाकारता येणार नाहीत असं म्हटलं. मात्र त्याच वेळेस प्रयोगशाळेत उत्पत्तीचा सिद्धांत नाकारला.

नक्की वाचा >> समजून घ्या : लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

२७ मार्च : अमेरिकन संरक्षण गुप्तचर यंत्रणेने प्रयोगशाळेमधील अयोग्य कार्यपद्धतीमुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचा दावा करणारी कागपत्रं जगासमोर मांडली.

३० एप्रिल : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण प्रयोगशाळेमधून विषाणूच्या निर्मितीच्या सिद्धांताबद्दल गांभीर्याने विचारप करत असल्याचं म्हटलं. तीन दिवसांनंतर सेक्रेट्री ऑफ स्टेट माईक मॅपो यांनी एबीसी न्यूजशी बोलताना “चीनमधील प्रयोगशाळांमुळे पहिल्यांदाच जगाला अशा विषाणूंचा सामाना करावा लागलाय असं नाही,” असा टोला लगावला.

४ जुलै : द टाइम्समधील वृत्तामध्ये सार्क-कोव्ही-२ सारखा विषाणू चीनमध्ये २०१२ सालापासून निर्जन असणाऱ्या खाणींमध्ये सापडल्याचं आणि नंतर त्यावर वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये अभ्यास करण्यात आल्याचं म्हटलं होतं.

१७ नोव्हेंबर : बायोएसे या जर्नलमध्ये “सार्क-कोव्ही-२ ची जनुकीय रचना पाहता तो प्रयोगशाळेत बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही,” अशा मथळ्याखाली लेख छापला होता.

२०२१ : अधिक ठोसपणे करण्यात आले दावे

१५ जानेवारी : अमेरिकेमध्ये वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसंदर्भात फॅक्ट शीट प्रकाशित करण्यात आली. यामध्ये विषाणूची निर्मिती प्रयोगशाळेत झाल्याचा दावा करण्यात आला.

३० मार्च : जागतिक आरोग्य संघटनेने सादर केलेल्या अहवालामध्ये प्रयोगशाळेतील निर्मिती सिद्धांत अयोग्य असल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्याचवेळी संघटनेच्या प्रमुखांनी सर्व पर्याय संशोधनासाठी खुले असल्याचं म्हटलं.

१४ मे : १८ वैज्ञानिकांनी सायन्स या जर्नलमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महासाथीच्या उगमासंदर्भातील स्पष्टता येणं आवश्यक असून हे संशोधन करणं शक्य असल्याचं म्हटलं. याच संशोधकांनी करोना विषाणूचा उगम नैसर्गिक आहे किंवा प्रयोगशाळेत झाला आहे या दोन्ही शक्यतांची गांभीर्याने पडताळणी करण्याची गरज असल्याचं म्हटलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : प्राणवायू म्हणून ओळखला जाणारा ‘मेडिकल ऑक्सिजन’ घातक कसा ठरु शकतो?

मे २३ आणि २४ : वॉल स्ट्रीट जर्नलने छापलेल्या दोन बातम्यांनंतर बायडन प्रशासन पुन्हा सक्रीय झाल्याचं पहायला मिळालं. यैपीक एका बातमीमध्ये अमेरिकन गुप्तचर अहवालाचा उल्लेख करत फॅक्ट शिटहून अधिक माहिती देत असल्याचं सांगण्यात आलेलं. वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी प्रयोगशाळेतील तीन संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते. तर दुसऱ्या बातमीमध्ये युनान येथील कॉपरच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या सहा कर्मचारीही अशाच प्रकारे आजारी पडल्याचं सांगण्यात आलेलं.