जगभरातील शहरीकरणाची प्रक्रिया जसजशी वाढते आहे तसतसा माणूस आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्षही वाढतो आहे. जंगल कापून त्या भागावर माणसाने ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण केले; त्या त्या ठिकाणी हा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. म्हणून अनेकदा नाशिक, मुंबई, ठाणे या सारख्या शहरांमध्येही अधुनमधून बिबळ्याचे दर्शन होते. अलीकडे जुन्नर, सिन्नर, नाशिक आणि गोदाकाठच्या गावांतील शेतांमध्येही तो आढळल्याने काही ठिकाणी भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जंगलातील बिबळ्या आता शेतात स्थलांतरित झाला आहे का ?

आणखी वाचा : विश्लेषण : सिंधू जलवाटप करार; भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवण्यामागचे कारण काय?

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

जंगल हाच बिबळ्याचा अधिवास आहे का?

आपल्याकडे वनक्षेत्र हे २० टक्के आहे तर संरक्षित क्षेत्र हे केवळ पाच टक्के. बिबळे हे प्रामुख्याने वनक्षेत्रात किंवा जंगलातच राहात असावेत, असा आजवरचा कयास होता. कधी तरी ते जंगलाबाहेर येतात आणि मग माणसांवर हल्ले करतात, असा एक साधारण समज होता. मात्र गेल्या १३ वर्षांमध्ये या संदर्भात पार पडलेल्या संशोधनाने या समजाला छेद दिला आहे. बिबळ्या आता प्रामुख्याने मनुष्यवस्तीच्या आजुबाजूस राहणे पसंत करतो असे या संशोधनात लक्षात आले आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: दिपिकाच्या बिकीनीमुळे ‘भगवा’ रंग चर्चेत; पण हा शब्द नेमका आला कुठून? तो खरंच रंगासाठीच वापरला जातो का?

माणसाला भक्ष्य करण्यासाठी बिबळ्या मनुष्यवस्तीच्या शेजारी राहातो का?

नाही. बिबळ्या हा माणसावर हल्ला करणारा प्राणी नाही. किंबहुना तो माणसाला घाबरणारा प्राणी आहे, हे आता गेल्या १३ वर्षांतील यशस्वी प्रयोगांमध्ये पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. डॉ. विद्या अत्रेयी आणि तिच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात पुरेसे संशोधन केले आहे.

पण मग, बिबळ्याकडून माणसांवर हल्ला होण्याच्या घटना घडतात, त्याचे काय?

आजवर माणसांवर बिबळ्याकडून झालेल्या हल्ल्याच्या ज्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या व्यवस्थित वाचल्या तर असे लक्षात येते की, हे हल्ले लहान मुलांवर तरी आहेत किंवा मग बसलेल्या अवस्थेतील माणसांवर तरी. असे का, याचाही उलगडा आता संशोधकांनी केला आहे. लहान मुलांना पाहिल्यावर किंवा बसलेल्या अवस्थेतील माणसाला पाहिल्यावर बिबळ्याला असे वाटते की, आपल्यापेक्षा लहान आकाराचा हा प्राणी आहे. त्याच समजापोटी तो भक्ष्यासाठी हल्ला करतो. आजवर उभ्या अवस्थेतील माणसावर बिबट्याने थेट येऊन हल्ला केलेला नाही. (मनुष्यवस्तीत आल्यानंतर बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा यात समावेश नाही. कारण मनुष्यवस्तीत आलेला बिबट्या मुळातच माणसाला घाबरणारा असल्याने तो अचानक माणसांची आजुबाजूला वाढलेली गर्दी पाहून बिथरतो. असा बिथरलेला कोणता प्राणी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जातो. ) मात्र सामान्यतः बिबट्या उभ्या अवस्थेतील माणसावर कधीही हल्ला करत नाही, असे संशोधनात लक्षात आले आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: आंतरराष्ट्रीय तस्करांकडून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नव्या मार्गाचा वापर; तालिबान्यांचा मोठा हातभार, वाचा सविस्तर!

हे संशोधन कोणी आणि कुठे केले?

या संदर्भातील सर्वात पहिले संशोधन विख्यात प्राणीसंशोधक डॉ. विद्या अत्रेयी यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले. जुन्नर आणि गोदावरीचे कोरे हे या संशोधनाचे क्षेत्र होते. बिबट्याच्या अधिवासासंदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी या प्रकल्पामध्ये बिबट्यांना आरएफआयडी टॅग (कॉलर टॅग) लावून उपग्रहाद्वारे त्यांच्या हालचालींचा माग काढत नोंदी करण्यात आल्या. या संदर्भात महाराष्ट्रात व्यापक सर्वेक्षण संशोधन उपग्रहाद्वारे केले.

आणखी वाचा : विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे?

या संशोधनात प्रामुख्याने काय आढळले?
या संशोधनात असे लक्षात आले की, संपूर्ण दिवसभर या बागायती परिसरात शेतीमध्येच बिबळे असतात. ते ना बाहेर पडत, ना कुणावर हल्ला करत. मात्र रात्रीनंतर त्यांच्या वावरास सुरूवात होते. उकिरड्याच्या आसपास असणारे कुत्री, डुकरे आदी इतर प्राणी त्यांचे लक्ष्य असतात. त्यातही प्रामुख्याने कुत्र्यांवरच ते अधिक पोट भरतात. मनुष्यवस्तीच्या आजुबाजूस असलेल्या बिबळ्याच्या वास्तव्यामागे कुत्रा, मांजर, डुक्कर हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले ‘सहज भक्ष्य’ हेच प्रमुख कारण असल्याचे लक्षात आले.

माणसांवरील हल्ले काही वेळेस अपघातानेही होतात…
या अभ्यासाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. विद्या अत्रेयी संगतात, काही वेळेस अपघाताने माणसावर झालेले असतात. म्हणजे माणसाची हत्या करणे हा त्यांचा उद्देश नसतो. पण त्याच्या मार्गात माणूस आला तर त्याला घाबरवण्यासाठी तो पंजा मारतो. माणसाला ठारच करायचे असेल तर त्याला त्यासाठी अवघे मिनिटभर पुरेसे ठरू शकते. पण तो तसे करता नाही, कारण तो त्याचा उद्देशच नसतो.

आणखी वाचा : विश्लेषण : भारतीयांच्या वांशिक शुद्धतेच्या चाचणीवरून वाद कशासाठी?

गावांतील आणि शहरांतील उकिरडे स्वच्छ असतील तर…
या अभ्यासात असेही लक्षात आले आहे की, गावांमधील उकिरडे स्वच्छ ठेवले, तर तिथे कुत्री- मांजरे आदी प्राणी पोसले जाणार नाहीत. आणि मग पर्यायाने बिबळे त्यांच्या या मानवी अधिवासाच्या सवयी बदलतील अशी शक्यता आहे. आणि मग त्यांना भक्ष्यासाठी केवळ जंगलावरच अवलंबून राहावे लागेल.
मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात ४५ हून अधिक बिबळे आहेत, तेही याच कारणाने मनुष्यवस्तीत येतात का?
मुंबईतील राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेलगतच्या भागातही ‘सहज भक्ष्या’साठी बिबळे अधिवास करतात असे गेल्या १३ वर्षांतील अभ्यासामध्ये लक्षात आले आहे. एकट्या आरे कॉलिनीतील एका भागामध्ये ४०० हून अधिक कुत्रे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुबलक भक्ष्य उपलब्ध असले तर बिबळ्याने त्याच ठिकाणी राहणे हे तेवढेच साहजिक आहे. माणसाच्या अस्वच्छतेच्या वर्तनानेच बिबळ्यांना जंगलांचा अधिवास सोडून मनुष्यवस्तीजवळ येण्याची संधी दिली आहे.