आजच्या काळात तंत्रज्ञान भलतंच प्रगत झालं आहे. अगदी एका क्लिकवर हाजरो रुपयांची देवाण घेवाण असो किंवा कोणत्याही गोष्टीची होणारी पायरसी. हे सगळं अगदी आपण सगळे सर्रास करत असतो. सध्या तर टेलिग्रामसारख्या अँपवर आज प्रदर्शित झालेला चित्रपट किंवा वेबसिरीज सहज डाऊनलोड करता येतो, इतकंच काय तर यावर ब्रॅण्डेड तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदी कवडीमोलाचा भावात कार्डींग scam मधून विकत घेतल्या जातात. काहींना त्या वस्तू मिळतात तर काहींना मिळत नाही. अर्थात या सगळ्या गोष्टींना आटोक्यात आणण्यात सायबर क्राईम विभागाला बऱ्यापैकी यश मिळालं आहे. पण पायरसी म्हणजेच (एखाद्या मूळ वस्तूची अवैध कॉपी) चोरी ही मुळापासून उखडून टाकणं कठीण आहे किंवा अशक्य आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.

४जी आणि ५जी हा सगळा प्रकार येण्याआधी ‘टोरेंट’ने या पायरसी क्षेत्रावर एक काळ राज्य केले आहे. सध्या अशाच एका टोरेंट साईटच्या प्रवासावर बेतलेली एक वेबसिरिज नुकतीच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजचं नाव आहे ‘द तामिळरॉकर्स’. या साईटने संपूर्ण भारतीय आणि खासकरून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं धाबं दणाणून सोडलं होतं. हॉलिवूडचे काही निर्मातेसुद्धा यांच्या कामामुळे त्रस्त होते. यामागे काम करणारी टोळी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या बरोबर एक दिवस आधी तो चित्रपट लिक करत असे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

कोण होते तामिळरॉकर्स?

‘तामीळरॉकर्स’ ही एक पायरसी करणारी वेबसाईट होती. जेव्हा pirate bay सारख्या काही टॉरेंट साईटचा सुळसुळाट वाढला तेव्हा या तामिळरॉकर्स टोळीच्या कारवाया हळूहळू उघडकीस येऊ लागल्या. सुरुवातीला ते फक्त तामीळ चित्रपटांचीच पायरसी करायचे त्यामुळे फारसं कुणाचं लक्ष त्याकडे गेले नाही. कालांतराने त्यांनी इतर प्रादेशिक भाषांमधले आणि इंग्रजी चित्रपटसुद्धा लीक करायला सुरुवात केली. त्यांच्या या टोळीत नेमके किती लोकं काम करायचे हे अद्याप न उलगडलेलं कोडं आहे.

आणखीन वाचा : चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो लीक कसा होतो? नव्या वेबसीरिजद्वारे उलगडणार रहस्य

पोलिसांनी हे प्रकरण कसं हाताळलं?

२००८ मध्ये केरळ पोलिसांनी ३ लोकांना अटक केली त्यापैकी एक म्हणजेच कार्थी हा या तामिळरॉकर्सचा म्होरक्या असल्याचं समोर आलं. याबरोबरच त्याचे २ सहकारी प्रभू आणि सुरेश यांनाही अटक करण्यात आली. पोलिसांकडे बऱ्याच चित्रपट निर्मात्यांनी तक्रार केली होती की त्यांचे चित्रपट हे प्रदर्शनाआधीच किंवा नंतर लगेचच ऑनलाईन लिक केले जातात. याच काही तक्रारींच्या जोरावर तपास करून पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक केली. याच ग्रुपने सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘पुलीमुरुगन’ हा चित्रपट ऑनलाईन लीक केला होता, तसेच मोहनलाल यांचा मुलगा प्रणव याचा पहिला चित्रपटही याच टोळीने लीक केला असल्याचं समोर आलं होतं. शिवाय या टोळीने या अवैध मार्गाने १ करोडपेक्षा जास्त पैसा कामावला असल्याचं पोलिसांच्या तपासात दिसून आलं.

तामिळरॉकर्सचं पुढे काय झालं?

यानंतर तामिळरॉकर्स ही साईट अधिकृतरित्या बंद झाल्याच्या बऱ्याच बातम्या समोर आल्या. काही अवैध टॉरेंट साइट्सनी याची पुष्टी केली. पण आजही याच साईटची वेगवेगळी क्लोन व्हर्जन(पायरेटेड व्हर्जन्स) आपल्याला पाहायला मिळतात. याच साईटच्या नावात थोडाफार बदल करून या साईट्स सध्या राजरोसपणे काम करत आहेत. या वेगवेगळ्या साईट्सच्या माध्यमातून नवीन चित्रपट आणि वेबसीरिज सर्रास लिक केल्या जात आहे.

पायरसीचा धोका किती गंभीर आहे?

सध्या कोरोना काळानंतर एकंदरच मनोरंजनसृष्टीला चांगलाच फटका बसला आहे. त्यात या पायरसी प्रकरणाने चांगलीच भर घातली आहे. फक्त चित्रपट, किंवा वेबशोजच नव्हे तर वेगवेगळी पुस्तकं, गाणी यांचीसुद्धा पायरसी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रशिया आणि अमेरिकेनंतर भारताचा पायरसीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. यावरून या समस्येचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. ओटीटी प्लॅटफॉर्म्सना तर या पायरसीचा सर्वात जास्त धोका आहे. काही रिपोर्ट्सनुसार यावर्षी पायरसीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं जगभरात तब्बल ५२ बिलियन डॉलर्सइतकं नुकसान झालं आहे. एवढं होऊनसुद्धा या टॉरेंट साईट चालवणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की ते या व्यवसायात प्रचंड नुकसान सहन करतात. या पायरसीमधून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या साईटचा मेंटेनेंस खर्चसुद्धा फारसा निघत नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

आणखीन वाचा : Video : जेव्हा सुशांत सिंह राजपूतने करण जोहरला मारली होती मिठी, निर्मात्याने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया