पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारत आणि अमेरिकेच्या प्रयत्नांना गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा चीनने आडकाठी केली आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलाह सईद याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत ठेवला होता. हा प्रस्ताव तांत्रिक कारण देत चीनने स्थगित केला आहे. विशेष म्हणजे एक दिवसाआधीच चीनने संयुक्त राष्ट्रात लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी शाहीद महमूद याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला आहे. त्यानंतर आता पुन्हा चीन दहशतवाद्यांची पाठराखण करताना दिसत आहे. ‘१२६७ अल कायदा प्रतिबंध समिती’च्या नियमांनुसार दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्यास चीनने गेल्या चार महिन्यात पाचव्यांदा विरोध दर्शवला आहे. यानिमित्त चला जाणून घेऊयात कोण आहे शाहीद मेहमूद? जागतिक दहशतवादात त्याची भूमिका काय आहे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा