दयानंद लिपारे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मनोबल, शरीरबल, आत्माबल यांचा संयोग घडवणारा कुस्ती हा महाराष्ट्राचा लाडका अन रांगडा खेळ. यातील प्रतिष्ठेची ‘महाराष्ट्र केसरी’ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सध्या सातारानगरीत सुरू आहे. शनिवारी नवा महाराष्ट्र केसरी चांदीची गदा घेऊन मिरवेल आणि हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले-वाहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे मल्ल खाशाबा जाधव यांच्या ताकदीच्या परंपरेला आणखी पुढे घेऊन जाईल. मात्र हा प्रवास महाराष्ट्र केसरीपुरताच मर्यादित राहणार?… की हिंदकेसरीचीही मर्यादा ओलांडून सातासमुद्रापार यशाची पताका महाराष्ट्राच्या लाल मातीतील मल्ल मिळवणार का? हा मल्ल आणि राज्य कुस्तीगीर परिषदेसमोरचा आव्हानात्मक प्रश्न आहे. याचाच घेतलेला वेध
महाराष्ट्र केसरीचा इतिहास काय सांगतो? कोल्हापूरमधील कुस्तीची परंपरा या स्पर्धेत मल्लांना टिकवता आली आहे का?
हिंदकेसरी किताब प्राप्त करणे, हे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. तत्पूर्वी त्यास महाराष्ट्र केसरी खुणावत असते. १९५३ साली राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. परिषदेचे पाचवे अधिवेशन औरंगाबाद येथे १९६१ साली झाले. तेव्हा पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. कोल्हापूरच्या दिनकर दह्यारी यांनी पहिली स्पर्धा जिंकली. सलग पाच दिवस माती आणि गादी अशा दोन प्रकारात ही स्पर्धा रंगते. दोन्ही गटातील विजेता महाराष्ट्र केसरीसाठी झुंज देतो. नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी गेल्या दशकात प्रत्येकी तीनदा ही दोन किलोची चांदीची गदा मिळवली. गणपत खेडकर, चंबा मुतनाळ, दादू चौगुले, लक्ष्मण वडार, चंद्रहार पाटील यांनी ती दोनदा खेचून आणली. दादू चौगुले- विनोद चौगुले, हिरामण बनकर -विकी बनकर या पिता-पुत्रांच्या जोडीने या किताबावर नावे कोरली आहेत. दीनानाथ सिंह, चंबा मुतनाळ, विनोद चौगुले या तिघा कोल्हापूरच्या मल्लांनी महाराष्ट्र केसरी – हिंदकेसरी अशा दोन्हीकडील विजेत्यांचा यादीत नाव गोवले आहे. पण अलीकडे कोल्हापूरच्या वैभवशाली कुस्ती परंपरेलाही ग्रहण लागले आहे. त्यामुळेच तर यंदा महाराष्ट्र केसरी विजेता झालाच तर हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तयारी ठेवली आहे. कोल्हापुरातील मल्लांना अलीकडे पुणे येथील तालमीत सराव करणे भावते. याचे कारण पुण्यात सराव करून प्रगती दाखवली की अनेकांना मोठ्या पदावरील शासकीय नोकऱ्या मिळालेल्या आहेत.
महाराष्ट्र केसरी कसा ठरतो आणि यंदा कोणाची दावेदारी?
माती आणि गादी या दोन्ही गटांतील विजेत्यांमध्ये होणाऱ्या लढतीतून महाराष्ट्र केसरी ठरतो. यंदा माती गटात माऊली जमदाडे -सिकंदर शेख, प्रकाश बनकर – महेंद्र गायकवाड आणि माती विभागात ऋतुराज पाटील – अक्षय शिंदे, हर्षद सदगीर – माऊली कोकाटे यांच्यात उपांत्य फेरीसाठी लढत होणार आहे.
पण हिंदकेसरीवर महाराष्ट्राची पकड ढिली का झालेली दिसते?
भारताचा मर्दानी खेळ ही कुस्तीची ओळख. बुद्धिमान आणि चपळ अशा मल्लाला महाराष्ट्र केसरी आणि पुढे हिंदकेसरी खुणावत असते. १९५८साली राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या साक्षीने कोल्हापूरच्या श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरीचा पहिला किताब मिळवला होता. गणपतराव आंदळकर, मारुती माने, दादू चौगुले, हजरत पटेल, दीनानाथ सिंह, चंबा मुतनाळ, विनोद चौगुले, योगेश दोडके, संतोष वेताळ, सचिन जामदार यांनी हिंदकेसरी गदेवर आपली नाममुद्रा कोरली आहे. त्यानंतर दीर्घ काळ महाराष्ट्राला या स्पर्धेत यश मिळाले नाही.
महाराष्ट्र केसरीचे यश आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत का उंचावत नाही?
लाल मातीचा गुण मोठा आहे. ती धाडस देते. यामुळे महाराष्ट्रातील मल्लांना मातीच्या कुस्तीचे आकर्षण मोठे आहे. जागतिक कुस्तीचा आवाका लक्षात घेता गादीवरील कुस्तीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. लाल मातीच्या मोहात अडकलेला मल्ल तिकडे ताकतीने वळताना दिसत नाही. गादीवरची कुस्ती नियमाने बांधलेली असते. गुणावर निकाल दिला जातो. खेळाडूला कौशल्य, दम, बुद्धिचातुर्य दाखवताना वेळेच्या मर्यादा असतात. जागतिक पातळीवर कुस्तीत यश मिळवायचे असेल तर गादीवरील कुस्तीत कौशल्य दाखवणे अपरिहार्य आहे. परिवर्तनातून याची नियमावली तयार होत असल्याने ही कुस्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित होत गेली आहे. गादीवरील कुस्तीचे चापल्य महाराष्ट्रातील कुस्तीगीरांना साधता आले नाही असे निरीक्षण आहे. यामुळेच खाशाबा जाधव यांच्या नंतर महाराष्ट्राच्या मल्लांना ऑलिम्पिकमध्ये गुणवत्ता सिद्ध करता आली नाही. स्वसीमित मर्यादेचा आखाडा ओलांडण्याची गरज आणि वेळ आली आहे.
महाराष्ट्र केसरी विजेत्याला मान मिळतो, परंतु धन नाही. कुस्तीपटूंची वस्तुस्थिती काय आहे?
महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरल्यानंतर विजेत्या मल्लास खांद्यावर घेऊन नाचवले जाते. पण या मल्लाचा प्रवास शारीरिक, मानसिक तद्वत आर्थिक दृष्ट्याही खडतर आहे. यामुळे मल्लांना शासनाने मानधन सुरू केले आहे. पहिला महाराष्ट्र केसरी ठरला तेव्हा ३० रुपये मानधन मिळत होते; तेव्हा दूध एक रुपया लिटर मिळत होते. आता महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, महान भारत केसरी, अर्जुन विजेत्या मल्लांना ६ हजार रुपये मानधन मिळते. दुसरीकडे महागाईमुळे खुराक खर्च दरमहा १५ ते २० हजार रुपये झाला आहे. मानधनात वाढ करावी अशी मल्लांची, कुस्तीगीर परिषदेची मागणी आहे. शासनाने या फाइलवरची धूळ झटकून सत्वर निर्णय घ्यावा ही अपेक्षा त्यामुळे रास्त म्हणता म्हणता येईल.