मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर सातत्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत असल्याचं बघायला मिळालं आहे. अनेक विमाने उशीरा उड्डाण घेत आहेत, तर काही विमाने रद्ददेखील झाली आहेत. एकंदरीतच प्रवाशांकडून टर्मिनल ३ वर व्यवस्थापनाचा अभाव असल्याची तक्रार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीदेखील सोमवारी (१२ डिसेंबर) दिल्ली विमानळाला भेट दिली असून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढणार असल्याचे म्हणाले. मात्र, दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर सातत्याने गोंधळाची स्थिती का निर्माण होत आहे? टर्मिनल ३ वरून विमाने उशीराने उड्डाण का घेत आहेत? याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : आता प्रवाशांचा चेहराच बनेल बोर्डिंग पास? विमानतळांवर बसवण्यात आलेली ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ नेमकी काय आहे? जाणून घ्या

Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
Nagpur airport loksatta news
नागपूर विमानतळ विस्तार, प्रशासन मिशन मोडवर
Traffic congestion persists despite 33 bridges in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम
Chief Minister Devendra Fadnavis orders to complete airport works at the earliest Mumbai news
विमानतळांची कामे वेगाने पूर्ण करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
flyover Satis , Inspection important flyover thane ,
सॅटीससह तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे मुंबई आयआयटी मार्फत परिक्षण

नागरिकांच्या तक्रारीत वाढ

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर बऱ्याच दिवसांपासून गोंधळ बघायला मिळतो आहे. विमानतळ प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. येथील परिस्थितीचे व्हिडीओ आणि फोटो अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एका प्रवाशाने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला प्रतिक्रिया देताना म्हटले की, त्याला विमानतळाच्या आत प्रवेश करतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच टर्मिनल ३ वरील अनेक उपकरणंही बंद आहेत. या गोंधळाच्या स्थितीमुळे काही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याची तक्रारही प्रवाशांनी केली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ‘Dark Web’ इंटरनेटचे काळे जग ; जिथे लोकांच्या वैयक्तिक माहितीची होते विक्री आणि सुरू असतात ‘अवैध धंदे’

टर्मिनल ३ वर गोंधळाची स्थिती का निर्माण होते आहे?

विमानतळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांच्या करोना काळानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे टर्मिनल ३ वर असलेल्या कांऊटरची संख्या, प्रवाशांसाठी असलेली जागा आणि सुरक्षा रक्षकांसह कर्मचाऱ्यांची कमी असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. तर याबाबत बोलताना, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, ”करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक नागरिक प्रवासासाठी विमानाचा वापर करत आहेत. त्यामुळे विमानतळावरील व्यवस्थेवर ताण पडला असण्याची शक्यता आहे. आम्ही यावर लवकरच तोडगा काढू.” दरम्यान, गोंधळाची स्थितीत टाळण्यासाठी काही एअरलाईन्सकडून प्रवाशांना उड्डाणाच्या तीन ते साडेतीन तासांपूर्वी विमानतळावर दाखल होण्याबाबत सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?

विमानतळ अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

या परिस्थितीवर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. टर्मिनल ३ वरील बंद असलेली यंत्रणा लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून अतिरीक्त कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL ) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत शनिवारी निवेदन जारी करण्यात आले आहे. तसेच टर्मिनल ३ वर सद्यस्थितीत १६ दरवाजे असून दरवाज्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच डिजीयात्रा अंर्तगत ‘फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार?

टर्मिनल ३ देशातले सर्वात व्यक्त विमानतळ

दिल्ली विमानतळ टर्मिनल ३ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. टर्मिनल ३ वरून दररोज ५०० पेक्षा जास्त देशांतर्गत आणि २५० पेक्षा जास्त आंतराष्ट्रीय विमानं उड्डाणे घेतात. टर्मिनल ३ वरून रोज साधारण दोन लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच येथून प्रत्येक तासाला १९ विमाने उड्डाण घेतात.

Story img Loader