ज्ञानेश भुरे

कॅरेबियन भूमीत २००७ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची अपयशी कामगिरी होत असतानाच भारतात इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) कल्पना प्रत्यक्षात उतरत होती. त्याच वर्षी २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद भारताने पटकावल्यानंतर ‘आयपीएल’ सुरू करण्याच्या प्रक्रियेला अधिकच वेग आला. पुढील वर्षीच (२००८ मध्ये) ‘आयपीएल’चे पेव फुटले आणि एक अत्यंत यशस्वी स्पर्धा म्हणून ती नावारूपालाही आली. पण त्यानंतर भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत यशाने नेहमीच हुलकावणी दिली. असे का घडते याचा आढावा…

Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

‘आयपीएल’मुळे नेमके काय बदल घडले?

ट्वेन्टी-२० हे क्रिकेटचे लघुत्तम प्रारूप. प्रथम पाच दिवसांचे क्रिकेट, नंतर मर्यादित ५० षटकांचे एकदिवसीय क्रिकेट आणि आता ट्वेन्टी-२० क्रिकेट. आयसीसीने सुरुवातीला ट्वेन्टी-२० क्रिकेट हे द्विदेशीय मालिका आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपुरते मर्यादित ठेवले होते. मात्र, चौकार, षटकारांची आतषबाजी, झटपट निर्णय यामुळे ट्वेन्टी-२० क्रिकेटने अल्पावधीत लोकप्रियता मिळविली. पहिली विश्वचषक स्पर्धाही कमालीची लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर लगेचच ‘आयपीएल’चा उदय झाला. क्रिकेटविश्वात या लीगमुळे आमूलाग्र बदल झाले. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे क्रिकेटमध्ये आधीपेक्षा अधिक पैसा आला. क्रिकेटपटू अनुभवाने आणि आर्थिक मिळकतीने समृद्ध झाले. थोडक्यात आयपीएलने खेळण्याच्या अनुभवाबरोबर आर्थिक क्रांती झाली आणि हाच मोठा बदल प्रकर्षाने पुढे आला.

विश्लेषण : अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणार का?

‘आयपीएल’च्या अनुभवाने क्रिकेटला काय फायदा झाला?

‘आयपीएल’च्या माध्यमातून जगभरातील क्रिकेटपटू एकत्र आले. नव्या खेळाडूंना गाजलेल्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी निर्माण झाली. वैयक्तिक मार्गदर्शनापेक्षा या अनुभवाने खेळाडू झटपट प्रगती करू लागले. परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याची सवय खेळाडूंना लागली. मानसिक दडपणाचा सामना करण्याचा अनुभव त्यांना ‘आयपीएल’मधूनच मिळाला. हे सगळे अनुभव देशासाठी खेळताना परावर्तित होणे अपेक्षित होते. यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचा कसा फायदा झाला हे आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. सॅम करन आयपीएलमुळेच उदयास आला.

आयपीएलचा अनुभव देशासाठी खेळताना अंगिकारण्यात भारतीय खेळाडू कमी पडले?

भारतीय क्रिकेटच्या परंपरेत गेल्या काही वर्षांपर्यंत संघनिवड ही रणजी, इराणी आणि दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील अनुभव आणि कामगिरीवर होत असे. मात्र, अलीकडे या स्पर्धा गौण ठरतात. आयपीएलचा वरचष्मा हेच यामागचे खरे कारण. फ्रँचायझी संघासाठी खेळताना विजयासाठी जी धडपड खेळाडू दाखवतात ती धडपड देशासाठी खेळताना दिसून येत नाही. फलंदाजीच्या पद्धतीपासून, उत्तरार्धातील गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सगळ्याच आघाडीवर ‘आयपीएल’मध्ये क्रिकेटपटू एक पाऊल पुढे राहिलेले दिसले. अशक्यप्राय झेल घेताना खेळाडूंची सीमारेषेवरील धडपडही ‘आयपीएल’मध्ये पाहायला मिळते.

मग, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काय घडले?

विश्वचषक स्पर्धाही ट्वेन्टी-२० क्रिकेटची होती आणि ‘आयपीएल’ही ट्वेन्टी-२०. खेळण्याची पद्धतही तीच, नियमही तेच. म्हणजे सर्वकाही सारखे असताना देशासाठी खेळताना खेळाडू आपला व्यावसायिक अनुभव परावर्तित करू शकले नाहीत हेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासावरून स्पष्ट होते. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आयपीएल खेळण्याचा फायदा झाला. तेथील अनुभवाचा फायदा विश्वचषक स्पर्धेत खेळताना झाल्याचे बटलरने आवर्जुन सांगितले. मग, भारतीय खेळाडूंना सर्व सुविधा सहज उपलब्ध होत असताना ते का शक्य झाले नाही, याचा विचार आधी व्हायला हवा. ‘आयपीएल’मध्ये भारतीय खेळाडू सतत खेळले. तुलनेत परदेशी खेळाडू योग्य वेळी सरावासाठी मायदेशी परतले किंवा ठरावीक मुदतीसाठी खेळले हे विसरता येणार नाही.

विश्लेषण: इंग्लंडने विजेतेपदापर्यंत कशी मजल मारली? अष्टपैलूंचे योगदान किती निर्णायक?

‘आयपीएल’मध्ये खेळण्याचा ताण आणि होणाऱ्या दुखापतींचा परिणाम झाला का?

‘आयपीएल’मध्ये खेळण्याने सर्वकाही साध्य होते, त्यापेक्षा विश्वचषक जिंकता येतोच असे नाही. हे भारताच्या कामगिरीवरून सिद्ध होते. ‘आयपीएल’च्या सलग दोन-अडीच महिन्याच्या कार्यक्रमात खेळाडू थकत नाहीत. मात्र, विश्वचषक स्पर्धेच्या मर्यादित कार्यक्रमात खेळाडू थकून जातात. याला ‘आयपीएल’च कारणीभूत आहे. सलग खेळण्यामुळे या वेळी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा हे दोन प्रमुख खेळाडू जखमी झाले. त्यांच्या समावेशामुळे भारत यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकलाच असता असे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, भारतीय संघाने अधिक झुंज दिली असती हे नक्की. ‘आयपीएल’च्या सलग सामन्यांत खेळल्यानंतर खेळाडू थकणे किंवा एखाद दुसऱ्या सामन्यात त्यांना दुखापत होणे हे समजण्यासारखे आहे. पण, कुठे थांबायचे हे खेळाडूला माहीत असायला हवे. फ्रँचायझी की देशासाठी खेळणे महत्त्वाचे हे आता निश्चित व्हायला हवे.

आयपीएलचा उपयोग कसा करून घेता येईल?

आयपीएलमुळे क्रिकेटपटूंना विविध देशांतील खेळाडूंबरोबर खेळता येते. त्यांचा अनुभव प्रगतीसाठी फायद्याचा ठरतो. त्याचवेळी त्यांच्या खेळाचा अभ्यास विश्वचषकासारख्या स्पर्धेत निर्णायक ठरू शकतो. पण, हे सर्व जेव्हा ‘आयपीएल’ काय किंवा देशभरातील अन्य लीग आणि ‘आयसीसी’ स्पर्धा यांच्यामध्ये योग्य कालावधी असेल तेव्हा शक्य होईल. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका, पाकिस्तान आणि आता दक्षिण आफ्रिकेत लीग होतात. या लीगचा कालावधी मर्यादित आहे. ‘आयपीएल’चा कालावधीही कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. प्रदीर्घ चालणारी मोठी लीग म्हणून मिरविण्यापेक्षा कमी वेळेत दर्जात्मक क्रिकेट कसे खेळता येईल याचा विचार होण्याची गरज आहे.