अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत, हे आजपर्यंत आपण ऐकत आलो. मात्र, बदलत्या काळानुसार यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे, असं म्हणायला हरकत नाही. ती गोष्ट म्हणजे ‘इंटरनेट’. आज इंटरनेट आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढतो आहे. जसा इंटरनेटचा वापर वाढतो आहे, तशी सायबर गुन्हेगारीही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सायबर हल्ल्यात बळी पडलेल्यांची संख्या पाहिली, तर यात किशोरवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इयत्ता ९वी आणि १०वीतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमात ‘सायबर सुरक्षा’ हा विषय शिकवण्यात यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. पण, या विद्यार्थ्यांना ‘सायबर सुरक्षा’ हा विषय शिकवण्याची गरज का आहे? आणि ‘सायबर सुरक्षा’ म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : काजोलच्या ‘सलाम वेंकी’मध्ये दाखवलेला, प्रामुख्याने पुरुषांनाच होणारा ‘ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी’ कशामुळे होतो?

loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ

‘सायबर सुरक्षा’ म्हणजे काय?

आपण वापरत असलेले संगणक, मोबाइल इलेक्ट्रॉनिक उपकरणं आदी इंटरनेटशी जोडलेले असतात. या उपकरणांमध्ये आपल्या खासगी माहितीसह विविध प्रकारची माहिती साठवलेली असते. या माहितीचे डिजिटल हल्ल्यांपासून संरक्षण करणे, त्याला ‘सायबर सुरक्षा’ असे म्हणतात. बदलत्या काळानुसार आज आपण तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. त्यामुळे सायबर सुरक्षेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आज बँक, वित्तीय संस्था, कंपन्या, आरोग्य सेवा आदी क्षेत्रांत इंटरनेटचा वापर होत असल्याने आपली बऱ्यापैकी माहिती ही त्यांच्याकडे संग्रहित असते. याला शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. सायबर हल्ल्याद्वारे शैक्षणिक संस्थांच्या संकेतस्थळाशी छेडछाड करणे, त्याद्वारे संगणकात व्हायरस किंवा मालवेअर सोडणे, विद्यार्थ्यांच्या माहितीशी छेडछाड करणे, ती चोरणे आदी प्रकार घडण्याची शक्यता असते. अशा परिस्थिती विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सायबर सुरक्षेविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक शांततेसाठीही ‘सायबर सुरक्षा’ महत्त्वाची आहे. अचानक झालेल्या सायबर हल्ल्यामुळे अनेक विद्यार्थी अस्वस्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अ‍ॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का कढत आहेत?

‘सायबर सुरक्षा’ विषय का महत्त्वाचा?

विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी ‘सायबर सुरक्षा’ हे उत्तम क्षेत्र आहे. Dell, Cognizant, InfoTech, Accenture यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ‘सायबर सुरक्षा’ तज्ज्ञांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच सायबर सुरक्षेत कौशल्यं विकसित केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय गुन्हे एजन्सी, सुरक्षा विभाग आणि पोलीस दलांबरोबर ‘सायबर सुरक्षा’ तज्ज्ञ म्हणून काम करण्याचीही संधी आहे. आज प्रत्येक क्षेत्रात वाढलेले सायबर हल्ले बघता ‘सायबर सुरक्षा’ तज्ज्ञांची मागणी वाढली आहे. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्याकडून आकर्षक पगार दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे. दरम्यान, एका रिपोर्टनुसार आज देशभरात ३९ हजार ‘सायबर सुरक्षा’ तज्ज्ञांची कमी असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : ‘पीएच.डी.’च्या दर्जाचे काय होणार?

केंद्र सरकारकडून इयत्ता ९वी आणि १०वी मध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेसंबंधित नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना १०वी नंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान यासारखे पांरपारिक विषय न घेता तंत्रज्ञान शिकण्याची आवड असते. अशा विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातच ‘सायबर सुरक्षा’ विषय शिकवला गेल्यास त्यांची कौशल्यं विकसित होण्यास मदत होईल. तसेच जे विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेतात त्यांनाही हा विषय शिकता यावा यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. दरम्यान, हा विषय शिकवताना प्रात्यक्षिकावर भर देणेही तितकेच गरजेचे आहे.