राखी चव्हाण

तृणभक्षी प्राणी मांसाहारी नसतात, पण त्यांच्या दैनंदिन आहारात जेव्हा पोषक तत्त्वांचा अभाव जाणवतो आणि शरीराला आवश्यक फॉस्फरस आणि कॅल्शिअमची आवश्यकता भासते तेव्हा ते हाडे चघळतात. हा प्रकार पाळीव जनावरांमध्येदेखील आढळतो. झिम्बाब्वे या देशातील ‘काईल रिक्रिएशनल उद्यानात’ १९८७ मध्ये एका प्रौढ जिराफने जंगली श्वापदाचे हाड कुरतडल्याची अधिकृत नोंद होती. मात्र, भारतात जंगलातील तृणभक्षी प्राण्यांमध्ये अशी अधिकृत नोंद झालेली नव्हती. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात त्याची नोंद आणि त्यावरील अभ्यासलेख प्रकाशित झाल्यानंतर भारतातील ती पहिली अधिकृत नोंद ठरली आहे. शाकाहारी प्राण्यांच्या हाडे खाण्याच्या या प्रक्रियेला ‘ऑस्टिओफॅजी’ असे म्हणतात.

319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrapur district bank latest marathi news
चंद्रपूर जिल्हा बँकेची वादग्रस्त नोकर भरती: आजपासून मुलाखत
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
online exam for post of Clerk and Constable of Cooperative Bank canceled due to technical glitches
चंद्रपूर : परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ; भरती प्रक्रिया…
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा
45 lakh fraud occurred claiming college admission
सिंधुदुर्गातील राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे भासवून, वैद्यकीय प्रवेशासाठी ४५ लाखांची फसणूक

तृणभक्षी, पाळीव प्राण्यांना हाडांची असामान्य भूक का लागते?

जिराफ, झेब्रा, काळवीट यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांना तसेच गुरांसारख्या पाळीव प्राण्यांना हाडांची असामान्य भूक लागते, कारण त्यांच्या जवळपास उपलब्ध असलेल्या गवतसदृश्य खाद्यांमध्ये फॉस्फेटची कमतरता भासते. फॉस्फेट आणि कॅल्शिअम या दोन्हींचे मुख्य कार्य त्यांच्या शरीरातील हाडांचे आरोग्य सुदृढ ठेवणे आहे. शरीरातील सुमारे ९९ टक्के कॅल्शिअम सांगाड्यांमध्ये आढळते तर ८० टक्के फॉस्फरस हाडे आणि दातांमध्ये आढळते. म्हणूनच शाकाहरी प्राण्यांना जंगलातील हाडांमध्ये रुची असते.

‘ऑस्टीओफॅजी’ म्हणजे काय?

‘ऑस्टीओफॅजी’ ही एक प्रत्यक्ष कृती असून यात प्रामुख्याने शाकाहारी प्राणी हाडे खातात किंवा चघळतात. जगभरातील बहुतेक शाकाहारी प्राण्यांमध्ये फॉस्फेटची कमतरता असते. फॉस्फरस हे सर्व प्राण्यांसाठी आवश्यक असून शरीरातील हाडांच्या रचनेत तसेच ऊर्जा, चयापचय, स्तनपान अशा अनेक जैविक प्रक्रियांसाठी ते आवश्यक आहे. फॉस्फेटच्या कमतरतेमुळे प्रजनन प्रणालीत अडथळे, नवीन हाडांच्या निर्मितीत अडथळे असे शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात. प्राण्यांमधील कॅल्शिअम, फॉस्फरसच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी ‘ऑस्टीओफॅजी’ फायदेशीर मानली जाते.

‘ऑस्टीओफॅजी’ची नकारात्मक बाजू काय?

‘ऑस्टीओफॅजी’ ही पद्धती प्राण्यांमधील कॅल्शिअम, फॉस्फरसच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी फायदेशीर मानली जात असली तरीही शाकाहारी प्राण्यांच्या दंतचिकित्सेसाठी ती हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. तृणभक्षी प्राणी ज्या पद्धतीने हाडे पकडतात आणि चघळतात, त्याच्याशी सुसंगत अशी त्यांच्या दातांवरील मांस असते. मात्र, तृणभक्षी प्राण्यांचे दात कठोर पदार्थांच्या नियमित वापरासाठी नसून तंतू चावण्यासाठी बनलेले असतात. त्यामुळे हाडे चघळतांना बरेचदा दात तुटण्याचा प्रकार घडतो. दातांच्या संरचनेतील फरकांमुळे शाकाहारी प्राणी जुनी कोरडी हाडे चघळतात, तर मांसाहारी मऊ ताजी हाडे चघळण्यास प्राधान्य देतात.

कॅल्शिअम, फॉस्फरसच्या कमतरतेमुळे कोणते आजार होऊ शकतात?

प्राण्यांच्या शरीरात कॅल्शिअम, फॉस्फरस यासारख्या घटकांची कमतरता मोठ्या प्रमाणात उद्भवल्यास त्यांना ‘पायका’ हा आजार उद्भवू शकतो. तसेच शरीराचा रंग बदलतो. काळा रंग असेल तर तो राखाडी रंगामध्ये परिवर्तित होतो. प्राण्यांची हाडे ठिसूळ होतात. मातीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस असेल तर ते वनस्पतींमध्ये जाईल आणि त्या माध्यमातून ते प्राण्यांच्या पोटात जाते. मात्र, मातीमध्येच कॅल्शिअम, फाॅस्फरसची मात्रा नसेल तर वनस्पतीच्या माध्यमातून प्राण्यांच्या पोटात ते जात नाही. त्यामुळे ‘पायका’ सारख्या आजारांचा त्यांना सामना करावा लागतो.

‘ऑस्टियोफॅजी’चा प्रकार कधी समोर आला?

हजारो वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन जीवाश्मातील दंत आवरणांच्या पुरातत्त्व अभ्यासातून ‘ऑस्टियोफॅजी’चा अंदाज लावण्यात आला. तर सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळ पाळीव आणि वन्यप्राण्यांमध्ये ‘ऑस्टियोफॅजीक’ वर्तन दिसून आले. विशेषत: शाकाहारी प्राण्यांमध्ये ते दिसून आले. हे पाळीव प्राणी तसेच लाल हरीण, उंट, जिराफ, काळवीट यांत पाहिले गेले आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader