उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात कायमच तणाव दिसतो. एकमेकांचे शेजारी असणाऱ्या या दोन्ही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तान सारखीच कटुता आहे. उत्तर कोरियाने बुधवारी समुद्र किनाऱ्यावरून क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे दक्षिण कोरियात हवाई हल्ल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला होता. या क्षेपणास्त्रांपैकी एक दक्षिण कोरियाच्या एका बेटाच्या दिशेने निघाले होते. मात्र, सुदैवाने ते दोन्ही देशांच्या सागरी सीमेलगत समुद्रात कोसळले. दक्षिण कोरियानेही प्रत्युत्तरादाखल त्याच सीमा भागात क्षेपणास्त्र डागले.

दोन्ही देशांमधील संबंध मागील ७५ वर्षांत कधीच सामान्य राहिले नाहीत. नेहमीच दोन्ही देशांमध्ये कटुता वाढलेली आहे. असे नक्कीच म्हणता येईल की उत्तर कोरियाने आपल्या शेजारील देशाविरोधात नेहमीच त्याला भडकवण्याच्या कुरापतीला सुरुवात केली. सध्या उत्तर कोरियाच्या नाराजीचे कारण होते दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्या सुरू असलेला युद्धाभ्यास. जो साधारणपणे वर्षभरात दोन्ही देशांमध्ये होतच असतो.

Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Impeachment motion against Yoon Suk Yeol rejected south Korea
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना दिलासा; यून सुक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा ठराव नामंजूर
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
book review kashmir under 370 a personal history by j and ks former director general of police
बुकमार्क : काश्मीरचे भूतभविष्य…
Rise and Spread of Naxalite Movement in telangana
विश्लेषण : तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?
south korea president yoon suk yeol faces impeachment after martial law debacle
अन्वयार्थ : काळरात्रीनंतरचा उष:काल!
south korean opposition parties submit motion to impeach president yoon over sudden martial law
यून यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव; आणीबाणी जाहीर करण्याचे धाडस दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या अंगलट

सध्या सुरू असलेल्या दक्षिण कोरिया-अमेरिका लष्करी सरावाचा उत्तर कोरियाने निषेध केला. दोन्ही देशांना याची भयंकर किंमत मोजावी लागू शकते, असे सांगून उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेने उत्तर कोरियाबद्दल शत्रुत्वाची भावना नसून, उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षा रोखण्यासाठी आपण मित्रराष्ट्रांसह काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

अखेर काय कारण आहे की कोरियाच्या फाळणीनंतर वेगळे झालेल्या या दोन देशांचे एकमेकांशी पटत नाही. ते नेमकं कारणही काय होतं की ज्यामुळे अखंड कोरिया दोन देशात विभागल्या गेला आणि त्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती एकदम वेगळी आहे. दोन्ही देशांची सीमा जगातील सर्वात भयानक सीमा मानली जाते. जाणून घेऊयात याबाबतची माहिती.

अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या विकासात मोठी भूमिका बजावली –

कोरियावर १९१० पासून तोपर्यंत जपानची सत्ता राहिली जोपर्यंत ऑगस्ट १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानने आत्मसमर्पण करत शस्त्र खाली ठेवले नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जपानचे आशियाच्या बऱ्याच मोठ्या भागावर नियंत्रण होते. यामध्ये चीन, व्हिएतनाम, कोरियापासून ताइवानचा समावेश होता. यानंतर दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जपानने मित्र देशांसमोर शस्त्र टाकण्याची घोषणा केली, त्यानंतर तत्काळ सोव्हिएत संघाच्या सैन्याने कोरियाच्या उत्तर भागावर ताबा मिळवला. तर दक्षिण भागावर अमेरिकेने ताबा मिळवला. मग उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये साम्यवाद व लोकशाहीवरून संघर्ष सुरू झाला. आता उत्तर कोरिया रशिया आणि चीनचा प्रभाव असणारा साम्यवादी देश नक्कीच आहे, मात्र तिथे नेहमीच एका कुटुंबाची सत्ता कायम आहे. तर दक्षिण कोरिया लोकशाही देश आहे. अमेरिका त्याचा सर्वा मोठा मित्र देश आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. सद्यस्थितीस दक्षिण कोरिया बराच संपन्न देश आहे, तर उत्तर कोरिया किम परिवाराच्या सत्ताकाळात जगापासून वेगळाच पडत गेला आहे.

जेव्हा दुसरे महायुद्ध संपले तेव्हा कोरियाच्या उत्तर भागात सोव्हिएत फौजा जमल्या होत्या आणि तिथे साम्यवादाशी जुडलेल्या लोकांना हवा देत होत्या. सोव्हिएत संघाच्या तत्कालीन शासकाना वाटत होते की सोव्हिएत सीमेशी निगडीत कोरियाचा हा भाग त्यांच्या प्रभावात रहावा. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की कोरियात उत्तर भागात सोव्हिएत संघाच्या फौजा राहिल्या. तर अमेरिकेला वाटत होतं की संपूर्ण कोरियामध्ये पुन्हा निवडणूक व्हावी आणि सरकार तयार व्हावे, परंतु सोव्हिएत संघ याच्याविरोधात होता.

यामुळे अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून कोरियाला एक राष्ट्र बनवण्यासाठी १३ मे १९४८ रोजी निवडणूक घेतली. यामध्ये उत्तरी भागाने निवडणुकीत भाग घेतला नाही. तर दक्षिण भागात निवडणुकीनंतर रिपब्लिक ऑफ कोरिया(दक्षिण कोरिया) बनवण्याची घोषणा करण्यात आली.

उत्तर कोरियाने याला सरकार मानन्यास नकार दिला. सप्टेंबर १९४८ मध्ये या भागात सोव्हिएत संघाच्या नेतृत्वात सर्वोच्च लोकसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणूक होताच उत्तर कोरियाने एक स्वतंत्र देश म्हणून डेमोक्रेटिक रिपब्लिक पीपल्स ऑफ कोरया(उत्तर कोरिया) बनवण्याची सप्टेंबर १९४८ मध्ये घोषणा केली होती. तेव्हापासून उत्तर कोरियामध्ये किम इल-सुंग आणि त्यांच्या परिवाराचे अधिपत्य आहे. जग त्यांच्या शासनाला हुकुमशाही म्हणून पाहते.

Story img Loader