श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे मालदीवमधून सिंगापूरमध्ये पोहोचले आहेत. सौदी एअरलाइन्सच्या विमानाने ते सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, गोताबाया राजपक्षे वैयक्तिक भेटीवर आपल्या देशात पोहोचले आहेत. त्यांना याच कारणासाठी सिंगापूरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या बाजूने आश्रय देण्याची कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. श्रीलंकेची अर्थव्यवस्था हाताळण्यात सरकारच्या अपयशाविरुद्ध सार्वजनिक विद्रोह सुरू झाल्यानंतर राजपक्षे यांनी देश सोडून पलायन केले होते.
मालदीवमध्ये उतरल्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोताबाया आणि त्यांच्या पत्नीला एका खासगी रिसॉर्टमध्ये नेण्यात आले होते. सिंगापूर हे त्यांचे अंतिम स्थान असेल की नाही हे गुरुवारी स्पष्ट झाले नाही.
खासगी भेटीमुळे सिंगापूरमध्ये प्रवेश
सौदी एअरलाइन्सचे एसव्ही ७८८ हे विमान राजपक्षे यांना घेऊन संध्याकाळी सात वाजल्यानंतर सिंगापूर चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, राजपक्षे यांना खासगी भेटीसाठी सिंगापूरमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राजपक्षे यांनी आश्रयासाठी कोणताही अर्ज केलेला नाही किंवा त्यांना आश्रय देण्यात आलेला नाही.
विश्लेषण : जनता रस्त्यावर, राष्ट्राध्यक्ष फरार आणि देशात आणीबाणी; श्रीलंकेत आता नेमकं घडणार काय?
गोताबाया यांनी सिंगापूरला जाण्याचा निर्णय का घेतला?
याबाबत नेमकी कारणे अद्याप कळू शकलेली नाहीत. पण राजपक्षे सिंगापूरच्या घरी असतील यात शंका नाही. राजपक्षे कुटुंबाचे सिंगापूरमध्ये मजबूत संबंध आहेत. महिंदा आणि गोताबाया हे दोन्ही भाऊ वैद्यकीय कारणास्तव सिंगापूरमध्ये लहान शहर-राज्यात वारंवार प्रवास करत आले आहेत.
राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीच्या काही महिने आधी मे २०१९ मध्ये सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया झाली होती. तेथे त्याचे डॉक्टर श्रीलंकन तमिळ असल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये, त्यांनी संसद चार आठवड्यांसाठी स्थगित केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी पुन्हा सिंगापूरला गेले होते.
तसेच माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्यावरही सिंगापूरमध्ये उपचार करण्यात आले आहेत.