अनोळखी प्रदेशात एखाद्या ठिकाणाचा शोध घ्यायचा असेल तर सर्रास गुगल मॅपचा वापर केला जातो. गुगलने आपल्या फिचरला वेळोवेळी अपडेट केले आहे. मात्र गुगलने आता गुगल स्ट्रीट व्ह्यू (Google Street View) नावाचे नवे फिचर लॉन्च केले आहे. याच्या मदतीने वापरकर्त्यांना एखादे ठिकाण ३६० अशांत पहता येणार आहे. तांत्रिक भाषेत या सुविधेला ३६०-डिग्री इंटरॅक्टिव्ह पॅनोरमा फिचर म्हटले जात आहे. गुगलचे हे नवे फिचर सध्या देशातील दहा शहरात लॉन्च करण्यात आले आहे. यासाठी गुगलने स्थानिक कंपनी टेक महिंद्रा आणि मुंबई येथील जेनेसिस इंटरनॅशनल या कंपन्यांसोबत भागिदारी केली. मात्र, हे फिचर नेमके काम कसे करते आणि गुगलने भारतात हे फिचर का लॉन्च केले आहे? आपण जाणून घेऊयात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलने ३६०-डिग्री इंटरएक्टिव्ह पॅनोरमा फिचर लॉन्च केले आहे. हे फिचर सध्या देशातील फक्त दहा शहारंमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आगामी दोन वर्षांत सात लाख किमी, ५० शहरांचे मॅपिंग करुन या शहरांत हे फिचर लागू केले जाईल. केंद्र सरकारच्या बदललेल्या National Geospatial Policy २०२१ धोरणामुळे गुगलला हे शक्य झाले आहे.

हेही वाचा- विश्लेषण : जागतिक आरोग्य संघटनेनं ‘मंकीपॉक्स’ला रोखण्यासाठी ‘सेक्स पार्टनर’ कमी करण्याचा सल्ला का दिला आहे?

गुगल स्ट्रीट व्ह्यू काय आहे?
गुगल स्ट्रीट व्ह्यू हे एक असे तंत्रज्ञान आहे जे गुगल मॅप आणि गुगल अर्थच्या माध्यमातून रस्त्यांची आणि रस्त्यांवरील ठिकाणांची माहिती देते. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम २००७ साली अमेरिकेच्या शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर जगभरातील शहरे आणि ग्रामीण भागांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. गुगल मॅपमध्ये ज्या रस्त्यांचा फोटो उपलब्ध आहे त्या रस्त्यांना निळ्या रंगाच्या पट्टीने उठावदार करण्यात आले आहे. रस्त्यांव्यतिरिक्त संग्रहालये तसेच रेस्टॉरंट्सचा देखील यात सामावेश करण्यात आले आहे.

भारतातील कोणकोणत्या शहरात हे फिचर उपलब्ध आहे.

सुरुवातीला भारतातील १० शहरांमध्ये हे फिचर लॉन्च करण्यात आले आहे. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, बडोदा, अहमदाबाद, बंगळूरु, चेन्नई आणि अमृतसर शहरांचा सामावेश आहे. या दहा शहरांमधील सुमारे १ लाख ५० हजार किलोमीटर रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ वर्षाच्या अखेरीस जवळजवळ ५० शहरांध्ये हे फिचर लॉन्च करणार असल्याचा दावा गुगलने केला आहे.

गुगल स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यामातून जगातील कोणत्याही शहरातील रस्त्यांची माहिती तुम्ही बसल्या जागी मिळवू शकता. तसेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही शहरातील कोणत्याही रस्त्यांना झूम करुन पाहू शकता. एवढचं नाही तर गुगल अर्थ इंजिनच्या मदतीने त्या शहरातील तापमानाची माहितीही देण्यात येते.

हेही वाचा- विश्लेषण: चीनच्या वुहानमधूनच करोनाची उत्पत्ती? नव्याने समोर आलेला अभ्यास काय सांगतोय?

या फिचरचा वापर कसा करता येईल
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल मॅप अॅप ओपन करावे लागेल. अॅपच्या होम पेजवर तुमच्या लिंक केलेल्या अकाऊंटच्या फोटोखाली एक आयकॉन दिसेल. या चिन्हावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला नकाशाचा प्रकार आणि नकाशा तपशील दिसेल. आता मॅप डिटेलमध्ये स्ट्रीट व्ह्यूचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

२०११ मध्ये भारतात पहिल्यांदा करण्यात आले होते लॉन्च

गुगलने २०११ मध्ये भारतात पहिल्यांदा स्ट्रीट व्ह्यू फिचर लॉन्च केले होते. पण भारत सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव २०१६ मध्ये ते रद्द केले. पण आता गुगलने संपूर्ण काळजी घेत हे फिचर पुन्हा लॉन्च केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार स्ट्रीट व्ह्यू फिचरमध्ये कोणतीही लाईव्ह इमेज दाखवणार नाही. याशिवाय, कोणत्याही संवेदनशील भागाचे फोटो दाखवणार नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.