हरियाणाने आपल्या कुरुक्षेत्र कारागृहाच्या आवारात बाहेरील लोकांसाठी इंधन केंद्र (पेट्रोल पंप) उभारले आहे. हे पेट्रोल पंप विशेष आहे. कारण इथे काम करणाऱ्या व्यक्ती तुरुंगातील कैदी आहेत. सध्या कुरुक्षेत्र कारागृहाच्या कैद्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रेट्रोल पंपानंतर आणखी दहा तुरुंगांमध्ये अशाच प्रकारचे ‘जेल फिलिंग स्टेशन’ सुरु करण्याची योजना हरियाणा सरकारने बनवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘जेल फिलिंग स्टेशन’ योजना काय आहे?
हरियाणा सरकारने तेलंगणातील अशाच इंधन केंद्रांच्या धर्तीवर हरियाणातील ११ तुरुंगांच्या बाहेरील आवारात इंधन केंद्रे उभारण्याची योजना आखली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने राज्य ही जेल फिलिंग स्टेशन्स उभारणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून कुरुक्षेत्र कारागृहातील इंधन केंद्र ३१ मे पासून सुरू झाले. कुरुक्षेत्रानंतर अंबाला (दोन इंधन केंद्रे), यमुनानगर, कर्नाल, झज्जर, फरीदाबाद, गुडगाव, भिवानी, या तुरुंगातूनही अशीच इंधन केंद्रे चालवली जातील.

तुरुंगातील सर्व कैद्यांना येथे काम करण्याची परवानगी मिळेल का?
केवळ चांगले वर्तन असलेल्या दोषी कैद्यांनाच ज्यांनी तुरुंगात त्यांच्या बराच काळ घालवला आहे त्यांना इंधन स्टेशनवर काम करण्याची परवानगी दिली जाईल. अंडरट्रायल लोकांना येथे काम करण्याची परवानगी नाही. राज्याचे तुरुंग मंत्री रणजितसिंग चौटाला यांनी सांगितले कैद्यांना या जेल फिलिंग स्टेशनसाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांची कर्तव्य त्यांच्या वर्तनाच्या अधारावर त्यांची नियुक्ती केली जाईल. याची संपूर्ण जबाबदारी ही कारागृह निरीक्षक (जेलर) कडे असेल.

या संकल्पनेमागे काय कारण आहे?
चौटाला यांच्या मते, कैद्यांना समाजाचा एक भाग बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.“जेव्हा लोक या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येतील तेव्हा त्यांना दिसेल की कैदी देखील सामान्य लोकांप्रमाणे काम करू शकतात. कैद्यांमध्ये सुधारणा करून त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते, असा संदेश सगळ्यांना मिळायला हवा यासाठी या पेट्रोल पंपाची निर्मिती करण्यात आली आहे. हरियाणा सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे. इंधन केंद्रांवर काम करण्यासाठी कैद्यांना कारागृहाच्या नियमावलीनुसार वेतन मिळेल. या इंधन केंद्रांमधून मिळणारा नफा कैद्यांच्या कल्याणासाठी वापरण्यासाठी कारागृह कल्याण औद्योगिक निधीमध्ये जमा केला जाईल.

पायलट प्रोजेक्ट स्थिती काय आहे?
कुरुक्षेत्र कारागृहात नव्याने उघडलेले इंधन स्टेशन पिपली-कुरुक्षेत्र रस्त्यावर अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्गापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. कुरुक्षेत्र तुरुंगाचे अधीक्षक सोम नाथ जगत यांच्या म्हणण्यानुसार, सध्या इंधन केंद्र सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालवले जाते आणि दररोज सुमारे ४ लाख रुपयांची विक्री होते. सोमनाथ म्हणतात: “आता, रोज ८ लाख रुपयांच्या इंधनाची विक्री करण्याचा आमचा मानस आहे. सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत इंधन विक्री करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या सायंकाळी ७ वाजता पेट्रोल पंप बंद केला जातो. करण नियमानुसार कैदी संध्याकाळी ७.३० पर्यंत तुरुंगात असणे आवश्यक आहे. उत्तर भारतातील पाच राज्यांमधील असे हे पहिलेच इंधन केंद्र आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why haryana wants to set up fuel stations in jails dpj