दत्ता जाधव

किरकोळ बाजारात कांदा ७५ रुपये किलोंवर गेला आहे. कांद्याच्या दरात ही तेजी का आली आहे? ही तेजी किती दिवस टिकून राहणार आहे? यंदाच्या दिवाळीत कांद्याचा तुटवडा जाणवेल का? याविषयी..

india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
strawberry navi Mumbai marathi news
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
shortage of Wheat flour companies
पीठ कंपन्यांना जाणवतोय गव्हाचा तुटवडा; जाणून घ्या, अन्न महामंडळाची भूमिका किती महत्त्वाची

खरीप कांद्याचे उत्पादन का घटले?

महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही कांदा उत्पादनातील आघाडीवरील राज्ये आहेत. देशातील ६० टक्के कांदा उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकातून होते. यंदाच्या पावसाळय़ात जून महिन्यात पाऊस पडला नाही, तो जुलैअखेर सक्रिय झाला. त्यामुळे खरीपपूर्व आणि खरीप हंगामातील कांदा लागवडीत घट झाली होती. ऑगस्ट महिन्यात देशभरात पावसाने उघडीप दिली, त्यामुळे देशभरात झालेली कांदा लागवड अडचणीत आली. कांदा उत्पादनात मोठी घट झाली, परिणामी अपेक्षित प्रमाणात खरीपपूर्व आणि खरीप हंगामातील कांदा बाजारात आला नाही. अपुऱ्या पावसामुळे यंदाच्या रब्बी हंगामातही कांद्याची लागवड सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>ईडीने बंगालचे मंत्री ज्योतीप्रिया मलिक यांना अटक का केले? नेमका आरोप काय?

दिवाळीत कांद्याची सर्वाधिक टंचाई?

मागील रब्बी हंगामात कांदा पीक पक्व होण्याच्या अवस्थेत असताना फेब्रुवारी महिन्यात उष्णतेच्या झळा बसल्यामुळे कांद्याची चांगली वाढ होऊ शकली नाही. कांदा लवकर पक्व झाला. कांद्याचा आकार कमी राहिला आणि दर्जाही घसरला. मार्च, एप्रिल महिन्यांत कांद्याची काढणी सुरू असतानाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. काढलेला कांदा पावसात भिजल्याने, एरवी साडेचार-पाच महिने टिकणारा कांदा यंदा तीन महिन्यांतच सडला. त्यामुळे तो शेतकरी, व्यापाऱ्यांकडे राहिला नाही. यंदाच्या खरीपपूर्व हंगामात अपेक्षित लागवडी झाल्या नाहीत. त्यामुळे देशभरात ऑगस्ट- सप्टेंबरदरम्यान अपेक्षित कांदा बाजारात आला नाही. खरीप हंगामातील कांद्याची काढणी डिसेंबरच्या अखेरीस होईल. त्यामुळे नवा कांदा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात बाजारात येईल. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत कांद्याचा तुटवडा जाणवेल. बाजारात तुटवडा असल्यामुळे कांद्याच्या दरात तेजी येईल, असा अंदाज कांदा पिकाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७५ रुपये किलो दराने विकला जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांदा ८० ते ९० रुपये किलोपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

देशात कांद्याची किती हंगामात लागवड होते?

देशात खरीपपूर्व, खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी, अशा चार हंगामांत कांद्याची लागवड होते. खरीपपूर्व हंगामात एप्रिल ते मेदरम्यान लागवड केली जाते. हा कांदा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान काढणीला येतो. खरीप हंगामात जुलै ते ऑगस्टदरम्यान लागवड होते, ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये काढणी केली जाते. उशिराच्या खरिपात ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान लागवड होऊन जानेवारी ते मार्चदरम्यान काढणी होते. रब्बी हंगामात डिसेंबर ते जानेवारीमध्ये लागवड होते, एप्रिल ते मेदरम्यान काढणी होते. प्रामुख्याने राज्यात खरीपपूर्व, खरीप आणि रब्बी हंगामात लागवड होते.

हेही वाचा >>>विश्लेषण: इस्रायल-हमास युद्धावरील ठरावावर भारत तटस्थ का राहिला? हमासच्या उल्लेखाचा आग्रह का?

राज्यातील कांद्याच्या क्षेत्रात मोठी घट?

उशिराने सक्रिय झालेल्या आणि अपुऱ्या मोसमी पावसाचा परिणाम म्हणून खरीपपूर्व हंगामातील कांदा लागवड २९,००० हेक्टरने घटली होती. राज्यात खरीपपूर्व म्हणजे जून, जुलैमध्ये सरासरी ९४ हजार हेक्टरवर कांदा लागवड केली जाते. यंदा मोसमी पाऊस जून महिन्यात सक्रिय झाला नाही. जुलैच्या अखेरीस पाऊस सक्रिय झाला. त्यामुळे खरीपपूर्व हंगामातील कांदा लागवडीला मोठा फटका बसला आहे. राज्यात जेमतेम ६५,००० हेक्टरवरच लागवड होऊ शकली. मोसमी पावसात ऑगस्टमध्ये पुन्हा मोठा खंड पडल्यामुळे कांदा पिकाला अपेक्षित पाणी मिळाले नाही. सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणीही पाण्याचा तुटवडा जाणवला. त्यामुळे कमी लागवडीसह उत्पादनावरही परिणाम झाला.

राज्यात कांद्याची लागवड किती होते

राज्यात चार हंगामांत मिळून सुमारे नऊ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होते. राज्यात खरीपपूर्व हंगामात सरासरी ९४ हजार हेक्टर, उशिराच्या खरिपात (ऑगस्ट- सप्टेंबर, पोळा कांदा) सरासरी २ लाख ६ हजार १०७ हेक्टर आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात सरासरी ५ लाख ७८ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. राज्यात एका वर्षांत कांद्याचे तीन हंगामात उत्पादन होते. पण, हे कांदा उत्पादन अपुरा पाऊस, गारपीट, उन्हाच्या झळा आदी कारणांमुळे संकटात आले आहे. यंदा खरीपपूर्व आणि खरीप हंगामात नाशिक विभागात अपेक्षित लागवड होऊ शकली नाही. नाशिक विभाग देशाच्या कांदा उत्पादनात मोठी भूमिका बजावतो.

Story img Loader