पावसाळा सुरू झाल्यापासून वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात वीज कोसळल्याने ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. राजस्थानमध्येही २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधूनही सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यातील रविवार अत्यंत प्राणघातक ठरला आहे. दरवर्षी वीज कोसळ्याने शेकडो लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झाले आहेत. बर्‍याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने आणि बर्‍याच राज्यांनी विजेच्या कोसळण्याला आपत्ती मानलेले नाही.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी भारतात विजेच्या घटनांशी संबंधित एक अहवाल आला होता. हवामान खात्यासह काम करणारी संस्था हवामान रेझिलेंट ऑब्झर्झिंग सिस्टम प्रमोशन कौन्सिल (सीआरओपीसी) यांनी सांगितले की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान विजेच्या घटनेमुळे १,७७१ लोक मरण पावले. उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू २९३, मध्य प्रदेश २४८, बिहार २२१, ओडिशा २०० आणि झारखंड येथे १७२ आहेत. या पाच राज्यात एकूण मृत्यूंपैकी ६०% पेक्षा जास्त नोंद झाली आहे. २०१९  मधील अपघातांमधील मृत्यूंशी संबंधित अहवालात असे दिसून आले आहे की त्या वर्षात एकूण २,८७६ लोक मरण पावले होते.

western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Explosion at Chandrapur power station 500 MW unit shut down Power station keeps secrecy
चंद्रपूर वीज केंद्रात स्फोट, ५०० मेगावॉटचा संच बंद; वीज केंद्राकडून गुप्तता…
pune pmp bus driver accident news
पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू, वानवडीतील घटना; चालक ताब्यात
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
Jalgaon train accident marathi news
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक
Nepal citizens died , Jalgaon train accident, Jalgaon ,
जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू
tranformer vandalism , copper wire theft,
पुणे : रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड, साडेदहा लाखांच्या तांब्याच्या तारा जप्त

वीज का चमकते म्हणजे काय होते? त्यातून किती ऊर्जा निर्माण होते?

वीज चमकणे एक नैसर्गिक घटना आहे. जेव्हा जास्त उष्णता आणि आर्द्रता असते तेव्हा विशेष प्रकारचे वीजांचे ढग मेघगर्जना करणारे ढग बनतात आणि वादळाचे रुप धारण करतात. पृष्ठभागापासून सुमारे ८-१० किमी वर, या ढगांच्या खालच्या भागात निगेटिव्ह उर्जा आणि वरच्या भागात पॉझिटिव्ह उर्जा जास्त असते. जेव्हा दोनमधील अंतर कमी होते तेव्हा त्यातून वीज वेगाने बाहेर पडणारा बाहेर येते.

आपण ढगांमधील गडगडाट पाहू शकतो आणि त्यात कोणतेही नुकसान होत नाही. मात्र ढगांवरून वीज जमीनीवर आल्यावर मोठे नुकसान करते. वीज कोसळताना पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात ऊर्जा असलेला एक छोटासाच भाग खाली येतो. एकदा वीज कोसळल्याने कित्येक दशलक्ष वॅट्स ऊर्जा निर्माण होते. यामुळे आसपासचे तापमान १०,००० अंशांपासून ३०,००० अंशांपर्यंत वाढू शकते.

आकाशातल्या विजेमुळे मृत्यू कसा होता?

वीज अनेक मार्गांनी खाली पडू शकते. थेट संपर्क इतका नसला तरी तो सर्वात प्राणघातक मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीवर थेट वीज कोसळली तर तो डिस्चार्ज चॅनेलचा भाग बनतो. बहुतेक वेळा थेट संपर्क मोकळ्या जागेत होतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती त्या विजेसाठी शॉर्ट सर्किट म्हणून काम करते. जेव्हा ती व्यक्ती वीज कोसळलेल्या भागापासून एक किंवा दोन फूट अंतरावर असते तेव्हा हा प्रकार घडतो. याचा सर्वात जास्त प्रभाव झाडाखाली आश्रय घेणाऱ्या लोकांवर होतो.

झाडांखाली आश्रय घेणाऱ्यांवर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. या घटनेला ‘साइड फ्लॅश’ म्हणतात. वीजेचा काही भाग पीडित व्यक्तीच्या जवळच्या एखाद्या लांब वस्तूवर पडतो आणि तेव्हा त्यातून ती वीज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. भारतातील एकूण मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभे असणाऱ्यांचे झाले आहेत.

ग्राउंड करंट हा दुसरा मार्ग आहे. वीज कोसळते त्या ठिकाणच्या भागात तिचा प्रवाह पसरतो. अमेरिकेच्या वेदर सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार बहुतेक मृत्यू यामुळेच होतात.

वीज कोसळण्याच्या घटना कधी होतात?

वार्षिक वीज कोसळ्याच्या २०१९-२० अहवालानुसार, २५ ते ३१ जुलै दरम्यान मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण आहे. यादरम्यान, देशभरात वीज कोसळण्याच्या चार लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली.

वीज कोसळणे इतके धोकादायक का आहे?

आकाशातील विजेचे तापमान सूर्याच्या वरच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते. त्याची क्षमता ३०० केडब्ल्यू म्हणजेच १२.५ कोटी वॅट्सपेक्षा जास्त आहे. ही वीज एक मिलिसेकंदपेक्षा कमी काळ टिकते. वीज दुपारी पडण्याची शक्यता जास्त आहे. याचा मानसाच्या डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर सर्वाधिक परिणाम होतो.

वीजेमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी काय करावे?

वीज पडण्याच्या घटना सहसा निश्चित स्वरुपाच्या असतात. पूर्वेकडील भागात, कालबैसाखी नावाचे वादळ आले की तेथे वीज कोसळते. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात पावसाळ्यापूर्वी विजांचा जोर कायम असतो. यामुळे, शेतकरी, पशुपालक, मुले आणि उघड्यावरील लोकांना आधी माहिती देण्याची गरज असते. त्यासाठी स्थानिक पातळीवर योजना आखणे गरजेचे आहे.

ही काळजी घ्या

विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर सुरक्षित ठिकाणी पोहोचा. उंच वस्तूंखाली आश्रय घेणं टाळा. टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नका. रेडिएटर्स, फोन, लोखंडाचे पाईप, स्टोव्ह इत्यादीसारख्या वीज वाहून नेणाऱ्या वस्तूंपासून दूर रहा. ढगाळ वातावरण असल्यास घराच्या आत रहा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नका. वीज चमकत असताना मोबाइल वापरू नका.

Story img Loader