बॉलिवूड अभिनेत्री किंवा अभिनेते आपल्याला चित्रपटांव्यतिरिक्त अनेक जाहिरातींमध्ये दिसून येतात. फक्त बॉलिवूडच नव्हे क्रिकेटजगातील अनेक खेळाडू जाहिरातींमध्ये काम करत असतात. जाहिरातीतून त्यांना भरपूर पैसे मिळतात. एखाद्या कंपनीचे ब्रँड अम्बसेडर बनतात, मात्र याचा तोटादेखील होतो. अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दाशियनला प्रोमोशन करण्याचा फटका बसला आहे. तिच्या एका पोस्टमुळे तिला तब्बल १० लाख रुपयांचा दंड बसला आहे. नेमकी काय पोस्ट होती जाणून घेऊयात
किम कार्दाशियनला दंड का बसला?
किम कार्दाशियन अमेरिकेतील प्रसिद्ध कलाकार आहे. तिची लोकप्रियता अफाट आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटला लाखो लोक फॉलो करतात. तिच्या फॉलोअर्सची संख्या ३३१ दशलक्ष आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये तिने क्रिप्टो पोस्ट टाकली, तेव्हा तिचे २२० दशलक्ष फॉलोअर्स होते. तिने एक पोस्ट टाकली होती ज्यात ती असं म्हणाली होती ‘तुम्ही क्रिप्टोमध्ये आहात का’? EthereumMax वेबसाइटची लिंकदेखील या पोस्टमध्ये शेअर केली होती. ज्यामध्ये गुंतवणूकदारांनाEMAX टोकन खरेदी करण्याच्या सूचना होत्या. पोस्टमध्ये तिने पुढे लिहले होते, ‘माझ्या मित्रांनी मला नुकतेच EthereumMax टोकनबद्दल जे सांगितले ते शेअर करत आहे’. यात #ad हा हॅशटॅग होता याचा अर्थ ही पैसे देऊन केलेली जाहिरात होती.
विश्लेषण : तुमच्या सध्याच्या मोबाईल फोनवर तुम्हाला 5G सेवेचा वापर करता येईल का?
या पोस्टसाठी यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) ने तिला कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. सेलिब्रेटी कलाकारांनी गुंतवणूकीला प्रोत्साहन कंपन्यांचा जाहिरात करताना नियमांचे उल्लंघन करता काम नये. तसेच सेलिब्रेटी कलाकारांनी जाहिरात करताना त्याचा स्रोत, त्यातून मिळणारी रक्कम, भरपाईची रक्कम” लोकांसमोर उघड करणे आवश्यक आहे. असे SEC च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एखादी प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा अशा प्रकार च्या गुंतवणुकीच्या संधींचे, क्रिप्टोबद्दल प्रमोशन करतात याचा अर्थ असा नाही की ती गुंतवणूक उत्पादने सर्व गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत. याबाबत SEC चेअर गॅरी जेन्सलर म्हणाले. ‘आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या संभाव्य जोखीमेचा आणि संधींचा विचार करण्यास प्रोत्साहित करतो.’
किम कार्दाशियनने आरोप मान्य केले असून तिने दंड भरण्यास कोणतीही आडकाठी आणली नाही. तिच्या वकिलाने बीबीसीला सांगितले की रिअॅलिटी टीव्ही स्टारला विवाद टाळण्यासाठी हे प्रकरण तिच्या मागे घ्यायचे होते. तिने SEC बरोबर एक करार केला आहे, ज्यात तिला इतर कामे करण्याची परवानगी मिळाली.
क्रिप्टो जाहिराती आणि कलाकार :
क्रिप्टोकरन्सी मार्केट जगभरात प्रचलित झाले आहे, भारतातातदेखील याचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल असा अंदाज दर्शवला जात आहे. अमेरिकेत SEC संस्थेने असं म्हंटले आहे की ‘जी व्यक्ती अशा पद्धतीचे प्रमोशन करते ती व्यक्ती तरतुदींच्या फेडरल सिक्युरिटीज कायदयातील संभाव्य तरतुदींच्या उल्लंघनासाठी तसेच रजिस्टर नसलेल्या ऑफर्समध्ये सहभागी झाल्याबद्दल जबाबदार ठरवले जाईल’.
भारतात, फेब्रुवारीमध्ये, भारतीय जाहिरात मानक परिषदेने आभासी डिजिटल मालमत्ता (VDA) ला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यामध्ये असे नमूद केले आहे की जाहिरात करताना एक नियमावली त्यामध्ये टाकण्यास सांगितली आहे. ज्यात लिहलं आहे की ‘क्रिप्टो उत्पादने आणि NFTs अनियमित आहेत आणि ते अत्यंत धोकादायक असू शकतात. अशा व्यवहारांमुळे होणाऱ्या नुकसानासाठी कोणताही नियामक उपाय असू शकत नाही’.
विश्लेषण: जगातील अनेक कंपन्यांमध्ये राजीनामासत्र का सुरू आहे? कर्मचारी नोकरीबाबत असमाधानी का आहेत?
मागे घडलेली प्रकरणे :
किम कार्दाशियनच्या आधी बॉक्सिंग खेळाडू फ्लॉयड मेवेदर ज्युनियर, बास्केटबॉलपटू पॉल पियर्स, इथरियममॅक्स यांच्यावर लॉस एंजेलिसच्या फेडरल कोर्टात क्रिप्टो टोकन्सचा प्रचार केल्याबद्दल खटला दाखल केला आहे. दाखल केलेल्या खटल्यानुसार सेलिब्रेटींच्या जाहिरातींमुळे चलनाचे मूल्य त्याच्या सुरुवातीच्या किंमतीपेक्षा १,३०० टक्क्यांहून अधिक वाढले आहे. कार्दशियनच्या पोस्टनंतर हे वाढले आहे असे बीबीसीने एका अहवालात म्हंटले आहे. न्यूयॉर्कमधील एका रहिवाशाने जानेवारीमध्ये केस दाखल केली होती ज्याने EMAX टोकन विकत घेतले आणि पैसे गमावले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लंडनमधील वॉचडॉग या जाहिरात कंपनीने आर्सेनल फुटबॉल क्लबच्या “फॅन टोकन्स” साठी दोन जाहिरातींवर बंदी घातली होती. त्यांच्या अधिकृत वेब साईटवर, तसेच त्यांच्या फेसबुक पेजवर कारण त्यांनी ‘क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याच्या जोखमींबद्दल चाहत्यांची दिशाभूल केली होती’.
आपल्याकडे एका सौंदर्य प्रसाधन करण्यात कंपनीची जाहिरात केली म्हणून अनेक अभिनेत्रींना टीकेचा सामना करावा लागतो. तसेच मध्यंतरी अक्षय कुमारने एका तंबाखू उत्पादन करणाऱ्या कंपनीची जाहिरात केली होती यावरून त्याला ट्रोल केले होते.