प्रत्येक पिढी घडवणारे जसे लेखक, विचारवंत असतात तसेच चित्रपटातील अभिनेतेदेखील पिढ्यानपिढ्या घडवत असतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तरुणांच्या मनात देशाभिमान जागे करणारे मनोजकुमार यांसारखे अभिनेते होऊन गेले. त्या काळात सामन्यांच्या आवाजाला वाचा फोडणारा आवाज म्हणजे अमिताभ बच्चन. दिवारमधला एक साधा हमाल अन्यायाविरोधात पेटून उठतो आणि बघता बघता गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो. ‘जंजीर’ चित्रपटातून पोलिसी खाक्या दाखवणारा अधिकारी, ‘शोले’ चित्रपटात मित्रासाठी प्रसंगी आपला जीव गमवणारा, काला पत्थरमधून खाण कामगार असो, अमिताभ बच्चन नावाचं हे समीकरण गेले सहा दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सुरवातीला फ्लॉप अभिनेता हा ठप्पा लागलेला असताना आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांच्या जोरावर आज हा महानायक आपले मनोरंजन करत आहे. आज अमिताभ बच्चन यांच्यावर लाखो लेख, हजारो मुलाखती झाल्या असतील. प्रत्येक मुलाखतीतून, लेखातून ते आपल्याला नव्याने उलगडत गेले आहेत. मात्र त्यांच्या इतक्या वर्षाच्या या फेम मागे नक्की आहे तरी काय?

अभिनय अभिनय आणि अभिनय :

Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
nitin gadakari in Ichalkaranji
इंदिरा गांधी यांच्याकडूनच घटनेची सर्वाधिक मोडतोड ; नितीन गडकरी
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

बॉलिवूडमध्ये आजही प्रत्येक अभिनेता हा हिरोच्या चष्म्यातून बघितला जातो. अमिताभ बच्चन यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा धर्मेंद्र, दिलीप कुमार, शम्मी कपूर, राजेश खन्ना यांच्यासारखी मात्तबर मंडळी होती. यात बच्चन कुठेच फिट होत नव्हते, कारण बच्चन यांच्याकडे लूक, डान्स, यापैकी काहीच नव्हते मात्र त्यांच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास, बच्चन यांनी सुरवातीला सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले मात्र जंजीर चित्रपटाने त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. ‘विजय’ या नावाने लोक त्यांना ओळखू लागले. सत्तरच्या काळातील चित्रपटांमध्ये बच्चन यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले. आवाजातील चढ उतार, भावनिक प्रसंग, त्यांनी उत्तमरीत्या वठवले आहेत. सलीम जावेद यांच्या संवादांनी त्यांना खरोखर स्टार बनवले. त्यांनी लिहलेले संवाद थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडले. लोकांना हा व्यक्ती आपला वाटू लागला. एका आईला तिचा मुलगा वाटू लागला, शोलेनंतर प्रत्येकाला वाटू लागले असा एक तरी जय आपल्या आयुष्यात असावा. आजतागायत त्यांनी केलेल्या प्रत्येक भूमिका त्यातील अभिनय, भूमिकेतील बारकावे, हिंदी भाषेवरची पकड, मेहनत या जोरावर अमिताभ बच्चन हे आजही अनेकांचे बाप आहेत. अभिनयच नव्हे तर गाणे, नृत्य, आणि निवदेन. ‘कौन बनेगा शोचे सूत्रसंचालन’ ते आपल्या खास शैलीत करतात. ज्यात ते सूत्रसंचालन न करता समोरच्या स्पर्धकाशी गप्पा मारत आहेत असेच वाटते.

विश्लेषण : ‘सरोगेट’ जाहिरात हा काय प्रकार?

आवाज

आवाज चांगला नाही म्हणून त्यांना रेडिओमध्ये संधी मिळाली नाही मात्र खचून न जाता याच आवाजाच्या जोरावर त्यांनी अनेक उत्कृष्ट संवाद म्हंटले आहेत. अगदी करोना काळातदेखील त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. आपल्याला मिळालेल्या आवाजाचा त्यांनी उत्तमरीत्या वापर केला आहे. मग अगदी कवितादेखील ते प्रत्येक शब्दचा अर्थ समजेल अशा पद्धतीने म्हणतात.

राखेतून उभा राहीन :

आयुष्यात चढ उतार असतात, जिंदगी की याही रीत हैं हार के बाद हार के बाद जीत हैं, ज्याप्रमाणे बॉलीवूड स्टार्सचे चित्रपट चालेनासे झाले की एकतर ते सन्यास घेतात किंवा राजकारणात प्रवेश करतात. बच्चन यांनी अभिनयातील कारकीर्द मागे पडत आहे हे लक्षात आल्यावर आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला मात्र त्यात यश आले नाही. चित्रपटाचा हिरो आणि राजकारणी म्हणून लोक कोणत्या नजरेने बघतील यात थोडी त्यांची गल्लत झाली असावी. राजकारणानंतर स्वतःची निर्मिती संस्था काढण्याचा घाट घातला, मात्र त्याच्यात मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. कधीकाळी ओळीने सुपरहिट चित्रपट देणारा हा अभिनेता दिवाळखोरीच्या वाटेवर जाऊ लागला होता. प्रत्येक खडतर मार्गातून माणसाला जावे लागते आणि अखेर सुखाचा रस्ता आपल्याला दिसतोच. कधीकाळी मोठा पडदा गाजवलेला हा अभिनेता आता छोटा पडद्यावर दिसू लागला. बघता बघता ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम हिट झाला. या कार्यक्रमातून बच्चन यांनी पुन्हा एकदा भारतीयांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेला अपघात, त्यातून बरे होऊन पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने ती उभे राहिले.

कामाला वयाचे बंधन नाही

आज बच्चन ८० वय वर्षात एखाद्या तरुणाला लाजवेल इतक्या ऊर्जेने काम करतात मग चित्रपट असो किंवा टीव्हीवरील शो, तितक्याच तन्मयतेने ते काम करतात. सुरवातीला हिरोच्या भूमिकेत दिसणारे बच्चन वाढत्या वयामुळे चरित्र भूमिकेत दिसू लागले. ‘पा’ सारख्या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ सारख्या चित्रपटात केलेली ऍक्शन असो, किंवा ‘कजरारे’ गाण्यात थिरकणे असो बच्चन यांनी आपल्या वयाला कुठेच मध्ये आणलेले नाही.

विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

स्वतःला प्रेसेंट करणं :

प्रेक्षकांची अचूक नस ओळखल्याने ते कायमच प्रेक्षकांना काय हवे आहे तेच कायम त्यांनी दिले. समाजमाध्यमात आपली वर्तवणूक, आपल्यापेक्षा वयाने लहान मोठी व्यक्ती कोणीही असो त्यांना आदरपूर्वक वागणूक देणे. कितीही कामाचे प्रेशर असो, सतत हसमुख चेहरा, कधी चिडचिड न करता समोरच्याचा मान ठेवणे. स्वतःची अशी त्यांनी विश्वासपात्र ओळख निर्माण केली आहे. खासगी आयुष्यात अनेक वादळं आली तरी त्यावर मात करून लोकांच्या मनात त्यांनी आपल्याबद्दलचा एक विश्वास निर्माण केला आहे. पोलिओची जाहिरात असो किंवा मसाल्याची बच्चन यांची प्रतिमा अशी बनली आहे की ती वस्तू अथवा त्यातील संदेश आपण ऐकतोच.

वक्तशीरपणा

आपल्या कामाबाबतीतील निष्ठा, वक्तशीरपणा यामुळे ते जास्त भावतात. आजही अनेक सुपरस्टार्स ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे त्यांनी त्यांच्या वक्तशीरपणाचे दाखले दिले आहेत

आजही त्यांच्या पिढीतील ते एकमेव असे अभिनेते आहेत जे बॉलिवूडमध्ये आजही सक्रिय आहेत. अगदी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळेच त्यांचे चाहते आहेत. वयाच्या ८० वर्षात ते पदार्पण करत आहेत. या वयातला त्यांचा उत्साह बघून ‘एनर्जी मै तो ये सब के बाप हैं’ असच म्हणावं लागेल.