सध्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांचे लक्ष हे ‘नासा’ (NASA) च्या Artemis 1 या मोहिमेकडे लागले आहे. काही तांत्रिक अडणींमुळे जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेटचे Space Launch System (SLS) चे पहिले उड्डाण काहीसे लांबणीवर पडले असून लवकरच उड्डाणाबाबतची नवी वेळ जाहीर केली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून Orion नावाचे यान चंद्राभोवती पाठवत परत पृथ्वीवर आणण्याचा नासाचा प्रयत्न असणार आहे. या मोहिमेनंतर पुढच्या मोहिमेत प्रत्यक्ष अंतराळवीर चंद्राला प्रदक्षणा घालून पृथ्वीवर परत येतील. तर त्या पुढच्या मोहिमेत २०२५ या वर्षी नासाचे तीन अंतराळवीर हे चंद्रावर पाऊल ठेवतील असं नासाचे नियोजन आहे.

पुन्हा चांद्र मोहिम का?

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!

गेल्या १०० वर्षात माणसाने अचाट असं तंत्रज्ञान विकसित करत मोठी प्रगती साधली आहे. या काळापासूनच पृथ्वीबाहेर मानवी वस्ती करण्याचे आराखडे बांधले जात आहेत. खास करुन पृथ्वीसदृश्य ग्रह असलेल्या मंगळ ग्रहावर अशी मानवी वस्ती होऊ शकते या निष्कर्षापर्यंत सर्वजण आले आहेत. पण तिथे पोहण्यासाठी लागणार विलंब लक्षात घेता पहिला मुक्काम म्हणून चंद्राकडे बघितले जात आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने तिथून उड्डाण करत कमी इंधनात अधिक वेगाने विविध ग्रहांपर्यंत प्रवास करणे शक्य आहे. विविध ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी मोठे आणि विविध उपग्रह पाठवणे शक्य आहे. त्यामुळेच चंद्र हा एकप्रकारे तळ म्हणून विकसित करण्यासाठी आराखडे कागदावर तयार केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून पुन्हा चंद्रावर नवे तंत्रज्ञान वापरत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणूनच नासाच्या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नासाला भविष्यात इथर ग्रहांसाठी मोठ्या मोहिमा हाती घ्यायच्या आहेत.

१९६९-७२ या काळात सोव्हिएत रशियावर मात करत अमेरिकेचे १२ अंतराळवीर हे प्रत्यक्ष चांद्र भुमिवर उतरले होते. शीत युद्धातला हा एक निव्वळ कुरघोडी करण्याचा प्रयत्न होता. अशा मोहिमांवर होणारा अवाढव्य खर्च बघता त्या मोहिमांनंतर चंद्राबाबत एखादा उपग्रह किंवा रोव्हर पाठवण्याव्यतिरिक्त मोठी मोहिम झाली नाही हे विशेष. थोडक्यात तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी त्यानंतर चंद्राकडे दुर्लक्षच झाले असं म्हणावे लागेल.

चंद्राचे आणखी काय महत्व आहे?

चंद्रावर पाणी हे कोणत्या स्वरुपात उपलब्ध आहे याचाही शोध यापुढच्या काळात आणखी घेतला जाणार आहे. तसंच चंद्रावर इंधनासाठी आवश्यक हायड्रोजन किंवा अन्य मौल्यवान मुलद्रव्ये, खनिजे किती उपलब्ध आहेत याचाही प्रत्यक्ष शोध घेतला जाणार आहे. पृथ्वीवरील इंधनाची वाढती भूक भागवण्याचा पर्याय हा चंद्रावर मिळेल अशा विश्वास शास्त्रज्ञ आणि संशोधकांना आहे. त्यामुळे चंद्र हा मानवासाठी भविष्यात मौल्यवान ठरणार आहे.

Artemis 1 मोहिमेत काय केलं जाणार आहे?

या मोहिमेत नव्याने विकसित केलेल्या जगातील शक्तीशाली रॉकेटची Space Launch System (SLS) ची चाचणी घेतली जाणार आहे. ९८ मीटर उंच आणि संपूर्ण इंथन भरल्यावर वजन तब्बल २६०० टन भरेल एवढं अवाढव्य SLS रॉकेट हे एका दमात पृथ्वीच्या वातावरणाबाहेर म्हणजे १५० किलोमीटर च्या उंचीवर १०० टन एवढे वजन वाहून नेऊ शकते. तर Artemis 1 मोहिमेत SLS ची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. अर्थात पहिल्या मोहिमेत एवढे वजन वाहून नेले जाणार नसले तरी चंद्राभोवती पाठवले जाणारे Orion यान हे या रॉकेटच्या अग्रस्थानी असेल. Orion यानातून प्रत्यक्ष अंतराळवीर जरी प्रवास करणार नसले तरी विविध संवेदकांच्या माध्यमातून या सर्व प्रवासाची नोंद घेतली जाणार आहे. यामुळे हा सर्व प्रवास अंतराळवीरांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासलं जाणार आहे.

तेव्हा सध्या नासा ही रॉकेटच्या उड्डाणाची कोणती नवी वेळ जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नासाच्या पहिल्या मोहिमेनंतर अब्जाधीश ‘एलॉन मस्क’ याची ‘स्पेस एक्स’ ही अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आणि अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकणारा चीन हे दोन दिग्गज चांद्र मोहिमेबद्दल काय नवे निर्णय हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यानिमित्ताने पुन्हा एकदा चांद्र मोहिमांची माहिती कानावर पडायला सुरुवात होईल. भविष्यात चंद्रावर जाण्याचे नाविण्य रहाणार नाही असा अवकाश प्रवास आणि अवकाश मोहिमा झालेल्या असतील. त्याची नांदी ही Artemis 1 या पहिल्या मोहिमेने होणार आहे असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही.

Story img Loader