नेपाळमधील डोंगराळ मुस्तांग जिल्ह्यात कोसळलेल्या विमानाच्या ढिगाऱ्यातून बचाव कर्मचार्यांनी आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. या विमानात चार भारतीयही होते. नेपाळच्या लष्कराने सोमवारी सांगितले की, रविवारी सकाळी क्रॅश झालेल्या प्रवासी विमानाचे अवशेष उत्तर-पश्चिम नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-२ येथील सनोसवेअर येथे सापडले आहेत. सुमारे २० तास विमान बेपत्ता होते. एकूण २२ जण विमानात होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रविवारी २२ प्रवाशांना घेऊन जाणारे छोटे विमान नेपाळच्या लेटे टेकडीजवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळस्थित तारा एअरद्वारे चालवले जाणारे 9N-AET ट्विन ऑटर विमान पोखरा ते जॉमसनला चार भारतीय, १३ नेपाळमधील नागरिक, तीन जपानी नागरिक, दोन जर्मन, तीन नेपाळ येथील क्रू मेंबरसह प्रवास करत होते, असे तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले.
नेपाळमध्ये उड्डाण करणे धोकादायक का आहे?
नेपाळमध्ये विमान अपघातांचा मोठा आणि दुर्दैवी इतिहास आहे. एव्हिएशन सेफ्टी डेटाबेसनुसार, नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांत २७ प्राणघातक विमान अपघात झाले आहेत. यापैकी २० हून अधिक घटना गेल्या दशकात घडल्या आहेत.
खडबडीत डोंगराळ प्रदेश, नवीन विमाने आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीची कमतरता आणि खराब नियमन यामुळे या अपघातांना कारणीभूत ठरले आहे. याव्यतिरिक्त, हवाई पट्ट्या पर्वतीय भागात स्थित आहेत. तसेच देशात हवामान वारंवार बदलते, ज्यामुळे विमान चालकांना त्रास होतो.
२०१३ मध्ये, युरोपियन युनियनने सुरक्षेच्या कारणास्तव नेपाळ-आधारित सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण करण्यास बंदी घातली.
नेपाळमधील सर्वात प्राणघातक अपघात काठमांडूमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाले आहेत. हे विमानतळ समुद्रसपाटीपासून १,३३८ मीटर उंचीवर आहे. हे एका अरुंद अंडाकृती-आकाराच्या दरीत स्थित आहे आणि उंच पर्वतांनी वेढलेले आहे. त्यात अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानाचा अभाव आहे.
बहुतेक वैमानिक दावा करतात की हिमालयातील उंच आणि अरुंद धावपट्ट्यांवर उड्डाण करणे अधिक कठीण आहे. टर्बोप्रॉप इंजिन असलेली छोटी विमाने, जसे रविवारी कोसळलेल ट्विन ऑटर विमान, येथे येऊ शकते. मात्र मोठे जेटलाइनर विमान येऊ शकत नाही. मात्र या लहान विमानांवर नेपाळमधील हवामानाचा अधिक परिणाम होतो. तसेच हवाई वाहतूक क्षेत्राने भूतकाळातील चुकांमधून धडा घेतला नसल्याचा आरोपही अनेक विमान वाहतूक तज्ज्ञांनी केला आहे.
…अन् त्यानं स्वत:चा मृत्यूच कॅमेऱ्यात केला कैद, नेपाळमधील विमान दुर्घटनेचा थरकाप उडवणारा VIDEO
काही महत्त्वाचे विमान अपघात
फेब्रुवारी २०१९ : एअर डायनेस्टीने चालवलेले हेलिकॉप्टर काठमांडूमध्ये परतण्याचा प्रयत्न करत असताना एका टेकडीवर कोसळले. नेपाळचे पर्यटन मंत्री रवींद्र अधिकारी आणि उद्योजक आंग छिरिंग शेर्पा यांच्यासह सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला. परिसरात दृश्यमानता कमी असल्याने ही घटना घडली होती.
त्यानंतर नेपाळ सरकारने अपघाताची चौकशी सुरू केली. प्राथमिक अहवालात इंधन टाकीच्या स्थितीमुळे वजनाचे असंतुलन आणि प्रवाशांची चुकीची आसन व्यवस्था यासारख्या प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, खराब हवामानात व्हीआयपी प्रवाशांना उड्डाण करण्यासाठी वैमानिकावर कदाचित दबाव होता.
मार्च २०१८ : बांगलादेश एअरलाईनद्वारे संचालित एक Bombardier Q400, US-Bangla ढाका येथून परतत असताना काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रॅश झाले. त्यामध्ये ७१ प्रवासी आणि क्रू मेंबरसह ४९ जणांचा मृत्यू झाला. विमान धावपट्टीवरून घसरले, विमानतळाच्या कुंपणावरून कोसळले. त्यानंतर ते फुटबॉलच्या मैदानात थांबले आणि त्याचा स्फोट झाला. नेपाळच्या इतिहासातील ही तिसरी सर्वात घातक विमान दुर्घटना होती.
काठमांडूचे अधिकारी आणि विमान कंपनी या दोघांनी एकमेकांवर दोषारोप केल्यामुळे या अपघातामुळे बराच वाद निर्माण झाला. विमानतळ अधिकाऱ्यांनी दावा केला की पायलटने कंट्रोल टॉवरच्या सूचनांचे पालन केले नाही आणि चुकीच्या दिशेने धावपट्टीमध्ये प्रवेश केला. यूएस-बांगला एअरचे सीईओ इम्रान आसिफ यांनी पत्रकारांना सांगितले की कंट्रोल टॉवरने पायलटची दिशाभूल केली असावी असा त्यांना संशय आहे.
सप्टेंबर २०११: बुद्ध एअरद्वारे चालवलेले बीचक्राफ्ट १९००डी हे विमान पर्यटकांना माउंट एव्हरेस्टच्या आसपास पर्यटनासाठी घेऊन जात होते. मात्र ते एका टेकडीवर आदळले. विमानातील सर्व १९ जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यात १० भारतीयांचा समावेश होता. प्रतिकूल हवामान हे अपघाताचे कारण होते, कारण अपघाताच्या वेळी काठमांडू विमानतळ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मोसमी ढगांनी व्यापला होता.