झोमॅटोची प्रारंभिक समभाग विक्री किंवा आयपीओची विक्री एक वर्षापूर्वी झाली. एका वर्षाने सोमवारी झोमॅटोच्या शेअरच्या भावानं ५० रुपयांपेक्षाही खालची पातळी गाठली आहे. सकाळच्या सत्रात झोमॅटोच्या शेअरचा भाव ४६ रुपयांच्या म्हणजेच आयपीओच्या ७६ रुपयांच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी पातळीवर येऊन ठेपला आहे.

आयपीओच्या वेळी प्रवर्तक, कर्मचारी व अन्य समभागधारकांसाठी असलेला लॉक इन पीरियड किंवा शेअर्सची विक्री करता येणार नाही असा एक वर्षाचा काळ शुक्रवारी संपला. याचा अर्थ एक वर्ष प्रतिबंध असलेले हे समभागधारक आता आपापल्या ताब्यातले समभाग खुल्या बाजारात विकू शकतात. सोमवारी झोमॅटोच्या शेअर्सच्या भावानं जी आपटी खाल्ली त्यामागे हे एक महत्त्वाचं कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार

सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबी या नियंत्रक संस्थेच्या नियमांनुसार, जर निश्चितपणे दाखवता येतील असे प्रवर्तक नसतील तर आयपीओ आणायच्या आधी असलेले शेअर्स एक वर्षासाठी लॉक केले जातात किंवा विक्रीसाठी प्रतिबंधित केले जातात. “एक वर्षाचा लॉक इन पीरियड संपला की आयपीओ पूर्वीचे समभागधारक बाजारातील स्थिती व त्यांचे गुंतवणूक धोरण यानुसार त्यांचे समभाग विकू शकतात,” झोमॅटोच्या आयपीओ आणतानाच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद करण्यात आले होते.

आजच्या घडीला झोमॅटोचे बाजारमूल्य ३७,९११ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या कंपनीचे भांडवली बाजार मूल्य ४३,२०० कोटी रुपये करण्यात आले होते, त्या तुलनेत ही चांगलीच घसरण आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचा शेअर १६९.१० रुपये इतक्या उंचीपर्यंत गेला होता. ज्या वेळी कंपनीचे भांडवली बाजार मूल्य तब्बल १.३३ लाख कोटी रुपये झाले होते. याचा अर्थ सर्वोच्च स्थानाचा विचार केला तर गुंतवणूकदारांचे ९५ हजार कोटी रुपये या क्षणाला नष्ट झाले आहेत.

गेल्या वर्षी जुलैमध्ये शेअर बाजारात नोंदणी झालेला झोमॅटो हा एक महत्त्वाचा समभाग होता. शेअर बाजारात नोंदणी होतानाच समभागाच्या दराने उसळी घेत ११६ रुपयांचा भाव नोंदवला होता. आयपीओच्या प्रति समभाग ७६ रुपयांवर तब्बल ५३ टक्क्यांची ही वाढ होय. परंतु, १६९.१० रुपये प्रति समभाग या उंचीवर पोचल्यानंतर मात्र या कंपनीच्या समभागाने सातत्याने घसरणच अनुभवलेली आहे. झोमॅटोच्या नंतर आलेल्या अन्य स्टार्ट अप्सनीही अशीच घसऱण अनुभवलेली बघायला मिळाली आहे.

पेटीएमचा आयपीओच्यावेळी दर होता प्रति समभाग २,१५० रुपये. जो समभाग आता ७४० रुपये किंवा तब्बल ६५ टक्के खालच्या दरावर उपलब्ध आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातली स्टार्टअप कंपनी नायका प्रति समभाग ११२५ रुपये दरानं शेअर मार्केटमध्ये आली. बाजारात नोंदणी झाल्या झाल्या कंपनीच्या समभागाने ७८ टक्क्यांची उसळी घेतली. परंतु आता या कंपनीच्या शेअरचा भाव १४०० रुपयांच्या आसपास आहे.